साल्हेरगड परिसर गृहउपयोगीवस्तू आणि कपडे वाटप मोहीम (दिवाळी विशेष २०१४)

Submitted by मी दुर्गवीर on 30 November, 2014 - 05:19

खरे तर कोणत्याही कार्याला केवळ प्रयत्नाची गरज असते …
तसाच एक साधा प्रयत्न या बागलाण ,नाशिक प्रांतात शालेय साहित्यांचे वाटप दि .१९-२० जुलै २०१४ वाटप या दरम्यान केला होता …(http://www.maayboli.com/node/50067)
या कार्यातून काही मिळेल याचा कधीच विचार नाही केला .…
आपल्या कडे खूप काही आहे आपण फक्त खूप काही मधील काही अंश वाटप करतोय इतकाच …

त्या कार्यक्रमा मधून बागलाण मध्ये नवीन क्रांतीच घडली असेच म्हणावे लागेल …
प्रत्येकाच्या मनात आपण आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेवू शकतो । हीच नवी भावना तयार झाली . एक एक माणूस मिळत गेला, तेथे दडलेल्या प्राचीन ठेवा स्वतःहून समोर येत

स्वराज्याची उभारणी करतांना जसे शिवप्रभूंना एक एक सोन्यासारखा मावळा लाभला तसेच काही मावळे #दुर्गवीरांना मिळत गेले ……

सह्याद्रीच्या कडेकपा-यात फिरताना अनेक दुर्गप्रेमी कुणाला न कुणाला मदत करत असतात. याच संकल्पनेला विस्तृत स्वरूपात मांडण्याचा विचार मनात ठेवून Mountain Sports Academy Adventure Hub चे नंदू चव्हाण यांनी सर्व भटक्यांना एक आवाहन केले ते “Utensils Kit Challenge” (https://www.facebook.com/photo.php?fbid=797943890258315&set=a.1276400039...)
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत दुर्गप्रेमींनी केलेल्या मदतीमधून नंदू चव्हान यांनी गडाच्या परिसरातील गरीब कुटुंबियांना गृहउपयोगी वस्तूंचा हा संच देण्याचा संकल्प केला आणि हा संकल्प त्यांनी दुर्गवीर च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विचार केला त्या बद्दल श्री नंदू चव्हान यांचे खास आभार ….
(दिनांक ९ नोव्हेबर २०१४ वाटप करण्यात आहे)
10628093_801066673272345_1625285637518621376_n.jpg1511647_801067996605546_5196169085256460959_n.jpg10393554_801066526605693_4380919280694042453_n.jpg1551631_801436746568671_8251893334387330166_n.jpg10671217_801436749902004_1653439632228045815_n.jpg10174927_801067899938889_1190156647295069829_n.jpg10649757_798974373481575_8704359431300595616_n.jpgDSC08096.JPG
तसेच ३० ऑक्टोबर २०१४ रोजी #दुर्गवीर तर्फे साल्हेर किल्ल्यांच्या आवारातील धामणपाडा , भावाडे पाडा असलेल्या गरजू आदिवासी लोकांना दिवाळीच्या दिवसात कपडे वाटप करण्यात वाटप करण्यात आले……

DSC07515.JPGDSC07487.JPGDSC07492.JPGDSC07495.JPGDSC07493.JPGDSC07496.JPGDSC07505.JPGDSC07509.JPGDSC07511.JPGDSC07514.JPG
याच २३ नोव्हेबर तारखेच्या रविवारी साल्हेरगडावर श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते त्यात गडापासून झाडी झुडपांनी व मातीने संपूर्ण नाहीशी झालेल्या मंदिराच्या स्वच्छतेचे काम करण्यात आले ,छायाचित्र लवकरच टाकेन….

उपस्थित शिलेदार
रोहीत जाधव,सचिन खैरनार,प्रविन खैरनार,विजय शिवदे,संतोष हसुरकर , हेमंत साेनवणे,सागर साेनवणे,अजित राणे , राेहीत साेनवणे,पराग साेनवणे,विवेक देवर, प्रशांत वाघरे , राज मेस्त्री , धीरज लोके , सागर टक्के , प्रीतेश शिंदे , अभिजित सावंत , अमित शिंदे , योगेश गवाणकर

यातून काहीतरी" दिल्यावर "खूप काही मिळविण्याचा आनंद आम्हा सर्व शिलेदारंना मिळाला .या आदिवासी / गरीब कुटुंबियांना ह्या वस्तू उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्या चेह-यावरील आनंद हिच दुर्गवीरांसाठी "खरी भेट" होती. यापुढील काही दिवसांमध्ये अजून काही गृहपयोगी संचाचे वाटप करण्यात येईल.….

धन्यवाद ___/\___
''दुर्गवीर''नितीन देविदार पाटोळे : 08655823748
www.durgveer.com
durgveerpatole@gmail.com
durgveer.com@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपक्रम! अभिनंदन, शुभेच्छा आणि कौतुक !
थेट गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे केव्हाही चांगलेच.

अवांतर - शेवटून दुसरा फोटो फार आवडला. Happy

"रोहीत जाधव,सचिन खैरनार,प्रविन खैरनार,विजय शिवदे,संतोष हसुरकर , हेमंत साेनवणे,सागर साेनवणे,अजित राणे , राेहीत साेनवणे,पराग साेनवणे,विवेक देवर, प्रशांत वाघरे , राज मेस्त्री , धीरज लोके , सागर टक्के , प्रीतेश शिंदे , अभिजित सावंत , अमित शिंदे , योगेश गवाणकर " ह्या सर्व शिलेदारांचे आणि ह्या शिलेदारांनी केलेल्या कामाची ओळख करून दिल्याबद्दल "''दुर्गवीर''नितीन देविदार पाटोळे " ह्यांचे आभार.