नमस्कार ,
रायगड जसे संपूर्ण देशाचे प्रेरणा स्थान तसेच आई जिजाऊचा पाचाड येथील वाडा देखील एक शक्तीपीठच, शिवरायांच्या आणि किल्ले रायगडाच्या संपुर्ण हालचालीचे मुक साक्षीदार .…
आपल्या भारत कसे एक समृद्ध देश "संकृती - परंपरा" हा आपला आत्मा त्यात महाराष्ट्र म्हणजे गडकिल्ल्याच्या राष्ट्र , म्हणतात ना " इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाच " असा समृद्ध आणि पराक्रमी आपला महाराष्ट्र .
पण याच महाराष्ट्रात पुरातन वास्तु विषयी नेहमीच उदासीनता जाणवत आली , सरकार काही करत नाही अशी बोंब प्रत्येकाची
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Arcylogic Sarvey of india ) यांच्या अधिपत्या खाली येथील भारतातील अनेक वास्तुचे स्वच्छता व संवर्धन केले जाते .
मध्यंतरी महाराष्ट्र सरकार तर्फे आयोजित "गडकिल्ले संवर्धन कार्यशाळेत" असी भेडसावणारे काही प्रश्न समोर आले होते . पुरातत्व खात्याच्या अंगाखांद्यावर भारतील अनेक वस्तुंच्या जतनीकरणाचे जबाबदारी असते पण अपुर्या "मनुष्यबळा "मुळे काम होण्यास वेळ होते किंबहुना राहूनच जाते , असे अनेक प्रश्न "खात्या"समोर आहेत.
आई जिजाऊचा हा वाडा म्हणजे एक स्वतंत्र किल्लाच, त्याची भव्यता तिथे गेल्याशिवाय जाणवणारच नाही . त्याचा अतिविस्तीर्ण परीसर , एक एक बुरुज अभ्यासाचा विषय .
पुरात्वव खात्याचे श्री शैलेंद्र कांबळे यांना "दुर्गवीर प्रतिष्ठान" च्या आता पर्यन्तच्या कार्य आढावा घेतला आणि संस्थेला संपर्क करुनी "पुरातत्व खाते आणि संवर्धन करणाऱ्या संस्थे मधील अंतर कुठे तरी कमी करण्याचा एक प्रयत्न केला . खाते आणि संस्था याचा वेळीचे योग्य नियोजन बांधुनी "आई जिजाऊ "च्या वाडयाची स्वच्छतेची मोहीम ठरली .
दुर्ग-वास्तु संवर्धनात "मनुष्यबळ" हे यंत्र खुप महत्वाचे असते .आणि त्याचा वापर ही निटसा केला गेला पाहिजे .
पहाटे आईजिजाऊच्या समाधी दर्शन घेऊनी कामाची सुरवात झाली . या मोहिमेत दोन सदरेवरील रान आणि वाडयाच्या उजव्या बाजुच्या असणाऱ्या बुरुजावर वाढलेली झाडी संपुर्ण स्वच्छ करण्यात आली ..
या अश्या पवित्र स्थान स्वच्छता करण्याचे काम आम्हाला मिळाले यातच आम्ही समाधानी आहोत .
पुरात्वव अधिकारी श्री शैलेँद्र कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे अंनत आभार की या कार्यात #दुर्गवीरला सहभागी करुन घेतले ..
आई जिजाऊचां वाडा
तटा वरील वाढलेले रान
स्वच्छ केलेला पुर्ण तट .
धन्यवाद __/\__
नितीनच आहेस का तू? छान काम
नितीनच आहेस का तू?
छान काम करीत आहात. दर पावसाळ्यात गवत वाढतच राहणार, त्यावर एखादा कायमस्वरूपी उपाय असेल का? पुरातत्वखात्याच काय म्हणण आहे.
या अश्या पवित्र स्थान
या अश्या पवित्र स्थान स्वच्छता करण्याचे काम आम्हाला मिळाले यातच आम्ही समाधानी आहोत +१
कुंभमेळ्या सारख्या आयोजना वर करोडो रु.खर्च करण्यापेक्षा अश्या ऐतिहासिक वास्तुचे जतन, स्वच्छता व संवर्धना वर रु खर्च केले जावे.
होय दादा !! दर वर्षी अशीच
होय दादा !!
दर वर्षी अशीच मोहीम करावी लागेल जशी गडावर करतो , पुरात्वखाते हे दर वर्षी करतात पण "निवांत "
मस्त! मनःपूर्वक शुभेच्छा
मस्त! मनःपूर्वक शुभेच्छा
>>कुंभमेळ्या सारख्या आयोजना
>>कुंभमेळ्या सारख्या आयोजना वर करोडो रु.खर्च करण्यापेक्षा अश्या ऐतिहासिक वास्तुचे जतन, स्वच्छता व संवर्धना वर रु खर्च केले जावे.
अगदीच सहमत !
छान उपक्रम. अभिनंदनीय.
छान उपक्रम.
अभिनंदनीय.
सुनटुन्या, जवळपासच्या गावातील लोकांना जर ते गवत मक्त्याने दिले तर ते चारा म्हणुन घेऊन जाऊ शकतात, यात दुहेरी फायदा की जनावरांना चारा मिळतो, व साफसफाईही होते.
प्रॅक्टिकल अडचण अशी की, मक्ता मिळण्यावरुन गावकर्यांच्यात आपापसात वितुष्ट येते/येऊ शकते तसेच इतक्या किरकोळ रकमेच्या किंमतीच्या गवताकरता मक्ता वगैरे देण्याची सरकारी प्रोसेस वेळखाऊ नॉन प्रॅक्टिकल असते. शिवाय, गवत काढणे/वा डागडुजी बाबत सर्वकाही आलबेल होऊनच गेले, तर मंजुर पैका खर्च कशावर करणार या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागु नये म्हणूनही सरधोपट कालच्या पद्धतीप्रमाणे आज असे सालोसाल काम चालते.
छान उपक्रम नितिन. जवळ राहत
छान उपक्रम नितिन.
जवळ राहत असून देखिल अश्या उपक्रमात सहभागी होता येत नाही ह्याचाच खेद वाटतो.
छान उपक्रम
छान उपक्रम
स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा
स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा
अतिशय सुरेख उपक्रम !
अतिशय सुरेख उपक्रम !
अश्याही स्थानांच्या
अश्याही स्थानांच्या स्वच्छतेसाठी मोहिमा आखाव्या लागतात हेच दुर्दैवी आहे. गावकर्यांनी स्वतःहून ते करायला हवे होते. फोटोंकडे बघून, ही जागा कुणाला फारशी माहीत नाही असे दिसतेय.
फार थोर कामाला हात घातला
फार थोर कामाला हात घातला आहात. पुढच्यावेळी तारीख इथे कळवा म्हणजे आवड, इच्छा असेल असे अनेकजण तुमच्या कार्यात योगदान देउ शकतील.
पुढच्यावेळी तारीख इथे कळवा
पुढच्यावेळी तारीख इथे कळवा म्हणजे आवड, इच्छा असेल असे अनेकजण तुमच्या कार्यात योगदान देउ शकतील.
>>
+१००