मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
अफगाणिस्तान
काबूलनामा : श्री.फिरोज रानडे
मला आवडलेले पुस्तक : काबूलनामा, लेखक श्री.फिरोज रानडे
मराठी माणसाची साधारण प्रवृत्ती ही आपल्या पंचक्रोशीत रमण्याची. पण दोन पिढ्यांमागे भाकरीच्या शोधात मूळ गाव सोडून शहराकडे धाव घेणे, हे अपरिहार्य झाले. तरीही बहुधा परीघ मुंबई-पुण्यापर्यंतच राहिला. त्या काळात श्री. फिरोज म्हणजेच पंढरीनाथ रानडे दिल्ली, कलकत्ता, शिलॉंग अश्या सुदूर ठिकाणी कामानिमित्त्य राहिले. तिथल्या अनुभवांनी त्यांचे विश्व विस्तारले गेले. त्यांच्या पत्नी प्रतिभा रानडे ह्यांनी व स्वतः रानडे ह्यांनी त्या अनुभवांवर लेखन केले. श्री. रानडे ह्यांच्या ‘काबूलनामा’ ह्या पुस्तकाविषयी माझे चार शब्द....
मीना (पुस्तक परिचय)
काबूलमध्ये रहात असताना तिथल्या स्त्रियांच्या स्थितीविषयी विश्वसनीय माहिती जाणून घेण्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ मला सापडलं होतं: ते होतं www.rawa.org. ‘रावा’ हा शब्द ‘Revolutionary Association of Women of Afghanistan’ या संघटनेच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांना घेऊन बनवलेला शब्द. (स्थानिक भाषेतलं नाव आहे: Jamiat-E-Inqalabi Zanan-E-Afghanistan). या संकेतस्थळावर एक महत्त्वाचं वाक्य लक्ष वेधून घेत. “जर तुम्ही स्वातंत्र्यप्रेमी असाल, आणि मूलत्त्ववाद्यांच्या विरोधात असाल, तर तुम्ही ‘रावा’सोबत आहात!
आशिया आणि ओबामा!
ओबामाची नुकतीच संपलेली आशिया भेट, त्याचा उद्देश, आशियातील चीनच्या रोलबद्दल केलेली वक्तव्ये याबद्दल प्रसारमाध्यमांत बरीच चर्चा चालू आहे. चीनहे भारत पाकिस्तान संबधात हस्तक्षेप करावा असे थेट विधान केले नसले तरी तसा अर्थ त्यातून निघू शकतो. स्टेटमेन्ट असे आहे-
