ऑफिसात काम नाही, मा बो वर नवीन कथा नाहीत! (मोरपिसे पण संपलेली!!!)
अशावेळी काय करावं काही सुचत नव्हतं. म्हटलं जरा फ्रेश होऊन यावं, बॅग उघडली अन समोर माझं आयलायनर दिसलं! मग क्काय! माझ्यातला लपलेला कलाकार (??????) टुण्णकन उडी मारून बाहेर आला!!!
बघा कसं वाटतंय!
पहिल्यांदाच केलंय बरं!
(ते अर्थातच माझ्या कलेची 'क्वालिटी' बघितल्यावर जाणकारांच्या लक्षात येईलच म्हणा!!)
प्रचि १

प्रचि २
लहानसंच चित्र आहे. ऑइल पास्टेलने कागदावर. स्थिरचित्रणाचा अंदाज येण्यासाठी काढलंय...

किल्मिष, गोंधळ, शंका सगळी...निवळू दे
सुन्या नभावर शुभ्र निळाई पसरू दे
चित्रामध्ये निसर्गास रंगवताना
ऋतू आपल्या मनातलाही मिसळू दे
कुणी आखले? का मीही पळतो यावर?
रुळावरूनी गाडी थोडी घसरू दे
कधी वाटते, घट्ट स्मृतींना पकडावे
कधी वाटते...सगळे काही विसरू दे
तडफड होते त्याची अन आम्ही म्हणतो -
"गझलेमध्ये जरा सफाई येऊ दे"
एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं वर्णन असेल अशा मराठी कवितांचे संदर्भ हवे आहेत. अटी :
- कविता छापील स्वरूपात (पुस्तक/नियतकालिक/अनियतकालिक) पूर्वप्रकाशित असावी.
- कविता मराठीत असावी.
- कवी किमान नावाजलेला असावा.
- कवितेत एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं (म्हणजे चित्र, शिल्प, छायाचित्र, चित्रपटातलं दृश्य वगैरे) वर्णन किंवा उल्लेख असावा. म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो...' बाद आहे.
महाभारतामधील कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र घरात लावू नये असे म्हणतात. त्याने घरात वाद निर्माण होतात, असे काही लोकांचे मत आहे. आपणास काय वाटते? ते चित्र घरात असावे की असू नये? वास्तुशास्त्रवाले तर असे सांगतात, पण वास्तुवर विश्वास नसणारेही बरेच लोक असेच मत मांडतात. याबाबत कुणाला काही अनुभव आहे का?