कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र

Submitted by जागोमोहनप्यारे on 29 May, 2011 - 02:59

महाभारतामधील कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र घरात लावू नये असे म्हणतात. त्याने घरात वाद निर्माण होतात, असे काही लोकांचे मत आहे. आपणास काय वाटते? ते चित्र घरात असावे की असू नये? वास्तुशास्त्रवाले तर असे सांगतात, पण वास्तुवर विश्वास नसणारेही बरेच लोक असेच मत मांडतात. याबाबत कुणाला काही अनुभव आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जामोप्या, मला अनुभव नाही. पण चेंबूरला एका मोठ्या रेस्टॉरंट मधे अनेक वर्षे हे चित्र बघतोय. आणि ते इतकी वर्षे अगदी व्यवस्थित चाललेय. मधे नूतनीकरणासाठी बंद होते पण आता जोरात चालतेय. चित्र अजूनही आहे तिथे. महाभारताचे पुस्तकही घरात ठेऊ नये, ठेवलेच तर त्याचे पहिले पान फाडून टाकावे असाही समज आहे. (मला आनंद वाटतो कि ज्ञानेश्वरीबाबत असा कुठलाही गैरसमज नाही. )

माझ्या मनात एक विचार येतो, कि "त्या" उपदेशाबाबत आपल्या मनात कुठेतरी खंत आहे का ? तो आपल्याला मनापासून पटत नाही का ? यदाकदाचित या नाटकात पण विनोदाच्या अंगाने का होईना, या तत्वज्ञानाला विरोध केलाय.

त्या उपदेशाबाबत खंत असायचं काही कारण नाही.. कुणी कुणाला काय उपदेश करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्या उप्देशावर भिस्त ठेऊन समोरचा माणुस देवाधर्माच्या की निष्काम कर्माच्या नावानं शस्त्रं परजू लागला की आपण कसं वागायचं हा प्रश्न पडून भीती उत्पन्न होते. ! मुळात महाभारत महायुद्ध धर्माची दिशा कशी दाखवते हेही न कळलेलं कोडं आहे. शेवटी बोलुन चालुन एका राजघराण्यातल्या वारसाम्मध्ये इस्टेटीसाठी झालेलं भांडण यापलीकडे त्यात काय आहे, हे समजत नाही... जनतेमध्ये इस्टेटीबाबत काही प्रश्न असतील तर ते राजाने सोडवावेत. आता याना स्वतःच्या इस्टेटीचा प्रश्न आधी २ वेळा द्युत, मग वनवास, तोही १२-१४ वर्षे आणि मग लढाई तीही इतकी प्रचंड मनुष्यशक्ती वापरुन.... इतकं सगळं करुनही सोडवता आला नाही.. यातुन कसला निष्काम कर्मयोग सामान्य जनतेनं शिकायचा?

पण चित्राबाबत मात्र एकंदरच वाद आहे खरा.

शेवटी आपापला दृष्टीकोन आहे. तुम्हाला त्यात इस्टेटीचं भांडण दिसतं; इतर त्यात सत्य विरुद्ध असत्य, धर्म विरुद्ध अधर्म याचा लढा पहातात... असं म्हणतात कि महाभारतात एकुण्-एक मानवी स्वभाव्/वागणुकिंचं (समाजकारण, राजकारण इ.) प्रस्तुतीकरण आलेलं आहे. त्यातुन नेमकं काय उचलायचं हा तुम्हाला चॉइस आहे. Happy

हे चित्र मी बर्‍याच गुजराती, मराठी (कुटुंबवत्सल, भांडखोर नाही) लोकांच्या घरात पाहिलं आहे.

अहो ते काय फक्त इस्टेटीसाठी झालेले युद्ध एवढेच स्वरूप नाहीये. सत् प्रवृत्ती विरूद्ध दुष्प्रवृत्ती.
कृष्णाला विचारले की तू तर ईश्वरी अवतार आहेस, मग एवढे मोठे युद्ध आणि हानी टाळू शकला असतास,
का नाही टाळलेस ?
कृष्ण उवाच : त्या काळात पृथ्वीवर पापी दुराचारी लोकांची संख्या वाढली होती. प्रत्येकाला एक एक करून मारत बसलो तर फार वेळ गेला असता. युद्धाच्या निमित्ताने असंख्य लोक एका फटक्यात मारले जातील. "परित्राणाय साधूनाम्, विनाशाय च दुष्कृताम्"

त्या काळात पृथ्वीवर पापी दुराचारी लोकांची संख्या वाढली होती.

न्हाई पटत, तेंव्हा तर द्वापार युग होते. मग कलियुगापेक्षा जास्त पापी लोक तेंव्हा कसे काय होते बुवा? आणि पापी लोकाना पृथ्वीवरच मारुन कशाला टाकायचे? त्याला हवे ते करु द्यायचे , नंतर मग मेल्यावर पाप पुण्याचा हिशोब घालून पाप फेडायला नरक असतोच की.... पृथ्वीवरच देव हिशोब करायला लागले तर नरकाचा स्वर्गाचा काय उपयोग ? Proud आणि एवढे दुष्ट लोक एकदम मारले म्हटल्यावर मग सगळे साधु लोक रहायला हवे होते आणि सत्ययुग अवतरायला हवे होते.. कलियुग कसे आले?

ते चित्र घरात लावायचे का नको यावरही बोला ना..

आता मला कळले आमच्या कॉलेजात मुंबई गट आणि दिल्ली गट यांच्यात अशी यादवी का माजायची. आमच्या कँटिनात हे चित्र लावलेले होते! Proud

जामोप्या तुझे वरचे पोस्ट आवडले. पण कली,सत्य, द्वापार हे युग आपण जसे गृहित धरतो (म्हणजे नवीन पुराणांत मांडले गेले तसे नाहीत) आधी ते दर चार वर्षांनी आणि नंतर दर पाच वर्षांनी बदलायचे. त्यामुळे २० व नंतर साडेचोवीस वर्षांनंतर परते द्वापार, कली असे ते यायचे. नंतर पब्लीक ने देव ह्या नावाखाली ते चांगले दिवस परत कधी तरी येतील असे समजुन ही अनेक वर्षे त्यात घातली. (जसे आता येशू येणार आहे असा प्रचार चालतो तसेच)

महाभारत घरात ठेवल्यामुळे काहीही होत नाही, तसेच तो फोटो लावण्याने पण! काहीही विचित्र समजुती आपण केल्या आहेत. जसे सीता किंवा तिचे कुठलेही नाव मुलीला द्यायचे नाही कारण तिलाही तसेच जीवन जगावे लागेल म्हणे. (मग तिचा नवरा काय रामचंद्र असतो का?) लोकं कमाल करतात.

असंख्य लोक एका फटक्यात मारले जातील

भीष्म, कृप, द्रोण, घटोत्कच, अभिमन्यु.. हे सगळे मेलेले लोक महापापीच होते की काय?

हे पहा जामोप्या ,तुम्हाला ते चित्र आवडल असेल तर जरूर लावा .ते चित्र तुम्हाला भेट म्हणून तुमच्या प्रीय आप्तानी दिल असेल व ते देणार्‍याची आठवण तुम्हाला सतत डोळ्यासमोर ठेवायची असेल तर ते जरूर लावा .ते चित्र लावल्यावर घरातले अन्य सदस्य जर भांडणार नसतील तर ते चित्र जरूर लावा .तुमची श्रद्धा नसेल ,देणारा नावडता असेल ,महाभारत आधीच प्रेडीक्ट करत असाल्,चित्र आवडल नसेल तर अजिबात घरात चित्र लावू नका .

घरात भांडणे किंवा वाद हे माणसांचा निव्वळ स्वार्थ, अहंकार, घरातील व्यक्तीमधे सुसंवाद नसणे यामुळे होतात. ते महाभारताचे चित्र घरात असणे किंवा नसणे यावर अवलंबुन असतात असे वाटत नाही. खरतर हे चित्र घरात असल्यावर माणसाला कॉन्स्टंट रीमाइंडर सारखे असायला हवे की अविवेकाने आणी स्वार्थी वृत्तीने काय दुष्परिणाम होतात आणि आपण कसे वागायला नको.

mansmi18 ला अनुमोदन...

रच्याकने... मी घरात ह्या चित्राऐवजी झोपाळ्यावर बसलेले राधा-कृष्णाचे चित्र लावले आहे... Happy फारच सुंदर आहे.. Happy

मायबोलीवर असे चित्र लावले गेले आहे काय?? बर्‍याच बाफवर चालत असलेले महाभारत पाहुन अशी शंका येते आहे. Happy

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

झक्की Rofl
जामोप्या, कोणतेही चित्र घरात लावणे न लावणे हे त्या घरातल्या लोकांच्या आवडीनुसार आणि मतैक्यानुसार आहे. अगदीच हिंसक भडक चित्रे लावली तर कदाचित त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. पण या चित्राने तसे होईल असे वाटत नाही.

खरे तर कौरव पांडवांनी मायबोलीकरांची चित्रे घरात लावली असावीत असा मला संशय येतो.>>>>> सलाम !!!!!

>>खरे तर कौरव पांडवांनी मायबोलीकरांची चित्रे घरात लावली असावीत असा मला संशय येतो.
हा खरा झक्की षटकार ! चेंडू सीमेपलिकडे !

खरे तर कौरव पांडवांनी मायबोलीकरांची चित्रे घरात लावली असावीत असा मला संशय येतो. >>> Lol झक्की !

खरे तर कौरव पांडवांनी मायबोलीकरांची चित्रे घरात लावली असावीत असा मला संशय येतो.
झक्की :):)

व्वा झक्कीबोवा, कोणत्याही धाग्याची दिशाभुल कशी करायची याचे उत्तम उदा. दिलेत. प्रश्न काय उत्तर काय?

जामोप्या, मलातरी असे वाटते कि हे चित्र लावण्याने घरात भांडणे होत नसावीत. उलट पेचप्रसंगात माणुस (अर्जुन) अडकला कि त्याची सुटका कशी होईल (कॄष्णोपदेश) याची शिकवण या चित्रातुन मिळेल. अर्थात हे वैयक्तिक मत. शक्य झाल्यास थोडे दिवस हे चित्र घरात लाऊन पहा आणि काही प्रॉब्लेम झाल्यास चित्र उतरवा.

मला तरी ते चित्र प्रचंड आवडते आणि माझ्या घरच्यांनाही... सध्या तरी घरात त्याची छोटी फ्रेम आहे, लवकरच मोठी फ्रेम घेण्याचाही विचार चालु आहे... ते चित्र घरात लावण्याआधीची आणि नंतरची परिस्थिती जवळ जवळ सारखीच आहे... अजुनतरी काही कलह वगैरे झाले नाहीत.. पण घरही वास्तुशात्राप्रमाणे नसल्याने आणि इतर बर्‍याच गोष्टी वास्तुशात्राप्रमाणे नसल्याने, जरी कधी कलह झाले तरी ते या चित्रामुळेच झाले असे म्हणता येणार नाही... मला नाही वाटत की ते चित्र घरात लावल्याने वाद निर्माण होतात.. माझ्या माहितीप्रमाणे वास्तुशात्र घरात देवांचे, माणसांचे इ. फोटो भिंतीवर लावु नयेत असं सांगतं.. या चित्राविषयी आवर्जुन कोणी सांगितलेलं मला तरी माहित नाही...

छाया देसाई आणि mansmi18 यांना अनुमोदन...

खरे तर कौरव पांडवांनी मायबोलीकरांची चित्रे घरात लावली असावीत असा मला संशय येतो. >>>>>>> अफलातुन. Lol

Rofl

माझ्या माहितीप्रमाणे वास्तुशात्र घरात देवांचे, माणसांचे इ. फोटो भिंतीवर लावु नयेत असं सांगतं.. या चित्राविषयी आवर्जुन कोणी सांगितलेलं मला तरी माहित नाही... >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>>या चित्रात देवांचे, माणसांचे इ. फोटो नाहीत का?:फिदी:

वास्तुशास्त्राबद्दल मी फार वाचलेलं नाही, अनुभवलेलं तर अजिबात नाही. प्रत्येकाच्या अनुभवाचा व श्रद्धेचा तो प्रश्न आहे ,म्हणून त्याबाबत बोलणंही योग्य नाही. पण कोकणातल्या एका स्थानिक वर्तमानपत्रात एक वास्तुशास्त्रज्ञ या विषयावर लेखमाला लिहीत. एका लेखात त्यानी आजार, मुलीचं लग्न इ.इ. अडचणींमुळे मुळे भयानक त्रासलेले एक गृहस्थ त्यांच्याकडे सल्ला घ्यायला आल्याचं लिहीलं होतं. मग या वास्तुशास्त्रज्ञ महाशयानी त्याना घराच्या दक्षिणेकडील भिंतीवरील एक फ्रेम उत्तरेकडील भिंतीवर [ किंवा याच्या उलटंही असेल ] लावायला सांगितली. आणि, काय आश्चर्य ! तीन महिन्यात त्या गृहस्थांच्या सगळ्या अडचणीं गायब !!
मी ती लेखमाला वाचायचं मात्र अजिबात चुकवत नसे; इतकी निखळ विनोदी लेखमाला वाचायला मिळणं क्वचितच नशीबात येतं ! Wink

झक्की Lol
काही होत नाही हे चित्र आणि पुस्तकं घरात असल्यानं. आमच्या हॉलच्या मोठ्या भिंतीवर हे चित्र ३-४ वर्षं होतं. रंग द्यायच्या वेळेस काढताना फाटलं. शिवाय माझ्या आजोळी महाभारताचे सर्व खंड बुकशेल्फ मध्ये ओळीने लावलेले होते. आजोबांना कित्येक जणांनी हे सल्ले दिले पण त्यांनी शेवटपर्यंत ती पुस्तके हलवली नाहीत. आता आजी आजोबांच्या पश्चात ती पुस्तके मावशीकडे आहेत. गेल्या ३०-३५ वर्षात काही बिघडले नाहीय.
पुस्तक आणि चित्रांनी अभद्र काही होत असते तर ती बनवायच्या जागीच आधी प्रताप नसते का दिसले? प्रिंटींग प्रेस, विक्रीची दुकाने इथे? Happy

ते चित्र लाऊ नये असा समज कसा पसरला तो श्रीकृष्णच जाणे. पण हा समज पसरण्याचं कारण हे असावं की चित्रात युद्धभूमी आहे. त्यामुळे मनात हिंसक, तामसी विचार येण्याची शक्यता असते. आणि हे असे विचार अशा प्रकारचे कुठलेही चित्र लावले तरी येऊ शकतात. हेच चित्र हवे असे नाही. (मानस)शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा यावर संशोधन झाले असेलच.

मनस्मीला अनुमोदन.

फक्त कुठे हिंसक चित्र, शिल्प असेल तर ते कुणालाही अस्वस्थ करेल. बांद्र्याला 'घरोंदा' रेस्टॉरंटमध्ये एका गिधाड की गरुडाच (जे काही होतं ते व्यवस्थित चितारलं नव्हतं त्यामुळे नक्की काय आहे ते कळत नव्हतं) शिकारीवर झडप घालून मारतानाचं शिल्प नेमकं समोरच्या भिंतीवर लावलेलं असायचं. कधी सटीसमाशी तिथे गेलं तर तिथे नजर जाऊन वैताग येत असे. जेवताना असली कसली चित्रं बघायची? Uhoh

आता ते शिल्प त्यांनी काढून टाकलंय.

Pages