मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
अल्पना यांचे रंगीबेरंगी पान
रंगीबेरंगी (फुलं)
अॅक्रेलिक ऑन कॅनव्हास पॅड
साइझ : ८*१२
गुलमोहर
साइझ - ८*१२
कॅनव्हास पॅड / अनस्ट्रेचड कॅनव्हास
माध्यम - आर्टिस्ट ग्रेड अॅक्रॅलिक रंग
चित्रं
हे आज केलेलं एक चित्र.
हँडमेड कागदावर ओली टी बॅग वापरून जुनाट रंग आणला आणि त्यावर अॅक्रॅलिक कलर्सनी हे रंगवलं. (माझ्याकडे दुसरे रंग नव्हते, म्हणून अॅक्रॅलिक कलर्स वापरले).
या लोणच्याच्या बरण्या. अॅक्रॅलिक कलर्स वापरुन रंगवल्या आणि वरुन ग्लेझिंग लिक्विड लावलं.
हा लायन पोराच्या टी शर्ट वर रंगवलाय.
अॅक्रॅलिक ऑन कॅनव्हास - बॅलेरिना
हे गेल्या आठवड्यात केलेलं नविन चित्र.
कॅनव्हास साइझ - १२" x १६"
रंग - आर्टिस्ट ग्रेड अॅक्रॅलिक रंग.
तिन्हीसांजा - अॅक्रॅलिक ऑन कॅनव्हास
आज हे पेंटिंग केलंय. कॅनव्हासवर अॅक्रॅलिक कलरमध्ये.
पेंटिंगमध्ये अजून शिकण्याच्या स्टेजमध्येच आहे. कॅनव्हासवरचा हा तिसरा प्रयत्न.
कॅनव्हास साइझ - १२" x १५"
रंग - आर्टिस्ट ग्रेड अॅक्रॅलिक रंग
Luwan of Brida - सारंग महाजन
सारंग महाजन हा माझ्या धाकट्या भावाचा मित्र. त्याच्या हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ रिंग्ज प्रेमामूळे आमचं बरं जमायचं. हॅपॉ सिरीजमधलं पुस्तक बाजारात आलं की याच्या हातात आणि नंतर एक-दोन दिवसात त्याच्याकडून माझ्या हातात यायचं. माझ्या लग्नाची इ पत्रिका याने मला बनवून दिली होती.
भावाबरोबर बीएससी करून नंतर एमबीए ( ??) झालेला हा पोरगा. नोकरीच्या भानगडीत न पडता याने वेब पेज डिझायनींग सुरु केलं. सारंग काय करतोय याचं उत्तर दर काही दिवसांनी बदलायचं. वेब पेज डिझायनींग /मेन्टेनंस चालू होतंच. सोबत जीम, फोटोग्राफी, भटकंती, वाचन, लिखाणही चालू होतं.
ऑटो एक्स्पो २०१२
काल गाड्यांच्या कुंभ मेळ्याला भेट देवून आलो. ऑटो एक्स्पो बघण्याची ही माझी तिसरी वेळ. गेल्या दोनही वेळेस ऑटो एक्स्पो संपताना शेवटच्या काही दिवसात बघितला होता. यावेळी मात्र भावाने पहिल्या दोन दिवसातच बघा, नंतर गर्दी वाढेल असं सांगून ठेवलं होतं. पहिल्या दिवशी बरेचसे सेलिब्रटीज असणार म्हणून आम्ही दुसर्या दिवशी बघायचं ठरवलं होतं.
ख्रिसमस एल्फ
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीपण शाळेतून फॅन्सी ड्रेसची नोट आली होती. गेल्या वर्षीच्या अनुभवामूळे यावेळी मी स्वतःच जरा आधी काय काय बनवता येईल याची कल्पना घेतली होती. शाळेतली एक महत्वाची अट नाताळाच्या संदर्भातलीच वेशभुषा असावी अशी होती.
एल्फ, सँटा, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बेल असे काही पर्याय मुलाला दिले आणि नेटवर त्यांची चित्रं दाखवली तर त्याने आधी मला रावण बनायचंय असं सांगितलं. मग सँटा आणि सर्वात शेवटी एल्फ बनूंगा असं उत्तर मिळालं. (वर्गात दरवर्षी बरेच सॅन्टाक्लॉज येत असतात म्हणून एल्फच बन हे मला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगावं लागलं. )
आमचा एंजल
५-६ दिवसांपूर्वी लेकाच्या शाळेतून डायरीवर नोट आली, २४ तारखेला मुलांना सांताक्लॉज, एंजल, फेयरी यापैकी एका वेशभुषेमध्ये पाठवावे.
तर आज एंजलच्या वेशभुषेत आयाम शाळेत गेला होता. त्यासगळ्याची ही कृती.
सर्वात आधी २२ तारखेला पुपुवर चर्चा सुरु केली. बरेच वेगवेगळे सल्ले मिळाले. त्यातला रैनाने सुचवलेला रिसायकल कपड्यातून सरळ सोप्पा सांताक्लॉज बनवण्याचा पर्याय सगळ्यात सोप्पा वाटला. तरीही त्याकडे दूर्लक्ष केलं. नीरजा, प्राची आनि इतरांनी एंजल बनण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे सांगितल्यावर घरात असलेल्या साहित्य शोधून ठेवलं. नसणार्या वस्तूंसाठी पर्यायी काय वापरता येईल याचा अंदाज घेतला.