माझी (उं)चित्रकला...अर्थात उंदीर चित्रकला

Submitted by प्रमोद देव on 8 April, 2012 - 03:13

chitra21.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे पेण्टब्रश मधे केलय का?

काहीही म्हणा, कधीतरी लहान व्हाव, तंद्रीत जीभ थोडीशी बाहेर काढून, थोडे रंग कपड्यांना, थोडे मनगटावर, थोडे जमीनीवर अन थोडे कागदावर अस करत चित्र काढाव माणसान. दोन त्रिकोणी डोंगर; मधून उगवणारा सूर्य; थोडे ढग; त्याच्याबाजूला मराठी चारचे आकडे म्हणजे कावळे, एक नदी; बाजूला एक घर घराला एक दार अन दोन खिडक्या; बाजूला एक झाड; भोवती शेत अन शेतातून घराकडे जाणारा काळा रस्ता,तेच अगदी टिपीकल. पण रोजच्या धबडग्यातून बाहेर पडून माणसान चित्र काढावं.

होय...एमएस पेंटमध्ये काढलंय हे चित्र!
श्रीकांत,आपण म्हणता तसंच होतंय..निसर्गचित्र म्हटलं की आजही तेवढंच आठवतं....वय वाढलं तरी अजून बालपण सरलं नाही हेच खरं. Happy

ज्योतिताई,सगळी चित्र इथे टाकली तर माबोकर त्या धक्क्यातून सावरणं कठीण आहे. Wink
म्हणून एक नमुना टाकला इथे. Wink

काका... बाकी चित्र पण येऊ दे.. हवंतर काहीच्या काही चित्रकला (काकाचि) असां बाफ काढू.. Wink तुम्ही टाका.. Happy

रोहन नको रे! जास्त मानसिक अत्त्याचार नको उगाच.
तरीही ज्यांना तो सहन करण्याची क्षमता म्हणा किंवा तयारी आहे त्यांच्यासाठी जालनिशीचा दुवा देतो. Happy
http://reghotyaa.blogspot.in/

काका खरेच काहीच्या काही चित्रकला असा धागा काढाच Happy
तुमच्या उत्साहीपणाबद्दल शब्दच नाहीत माझ्याकडे Happy

प्रिया, दोनचार नारळाची झाडं चित्रात आली की केरळ,गोवा किंवा कोकण..काहीही समजू शकतो आपण. Wink
एक ताजं चित्र...चित्र म्हणण्यापेक्षा..व्यंगचित्र!
chitra55.JPG

देवकाकांनी फारच मनावर घेतलेलं दिसतय चित्रकलेचं! Happy
लगे रहो देवकाका! मागच्या रेषांपेक्षा सध्याच्या रेषांमधे बरीच इंप्रुवमेंट आहे.