स्मृती

Submitted by pulasti on 7 February, 2013 - 15:49

किल्मिष, गोंधळ, शंका सगळी...निवळू दे
सुन्या नभावर शुभ्र निळाई पसरू दे

चित्रामध्ये निसर्गास रंगवताना
ऋतू आपल्या मनातलाही मिसळू दे

कुणी आखले? का मीही पळतो यावर?
रुळावरूनी गाडी थोडी घसरू दे

कधी वाटते, घट्ट स्मृतींना पकडावे
कधी वाटते...सगळे काही विसरू दे

तडफड होते त्याची अन आम्ही म्हणतो -
"गझलेमध्ये जरा सफाई येऊ दे"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रामध्ये निसर्गास रंगवताना
ऋतू आपल्या मनातलाही मिसळू दे

शेर आवडला.

कुणी आखले? का मीही पळतो यावर?
रुळावरूनी गाडी थोडी घसरू दे<<< अप्रतिम

तडफड होते त्याची अन आम्ही म्हणतो -
"गझलेमध्ये जरा सफाई येऊ दे"<<< मस्त शेर

एकुण गझलच सुंदर

सर्व शेर आवडले

त्याही पेक्षा तुम्ही इतक्या दिवसांनी गझल पेश करताहात याचा खूप आनंद आहे

चित्रामध्ये निसर्गास रंगवताना
ऋतू आपल्या मनातलाही मिसळू दे>>>> सर्वाधिक आवडला
............ तुमची सर्व निसर्गचित्रे ...इथे प्रकाशित केलेली ...इतकी का छान आहेत त्याचे मर्म या शेरात आहे तर ....ऋतू आपल्या मनातलाही मिसळू दे!! >>वा वा प्रामाणिक शेर

अजून येवुद्यात

कुणी आखले? का मीही पळतो यावर?
रुळावरूनी गाडी थोडी घसरू दे

मस्त शेर आहे. गझल आवडली.

सर्वांचे धन्यवाद!
२-३ वर्षांनी गझलेला हात घालतोय. ही गझल कमकुवत आहे याची मला जाणीव आहे. तुमच्या प्रोत्साहनाने, आपुलकीने बरं वाटलं.

चित्रामध्ये निसर्गास रंगवताना
ऋतू आपल्या मनातलाही मिसळू दे apratim sher ,lajawab ,khup aawadala

कुणी आखले? का मीही पळतो यावर?
रुळावरूनी गाडी थोडी घसरू दे kya bat hai

कुणी आखले? का मीही पळतो यावर?
रुळावरूनी गाडी थोडी घसरू दे
.
कधी वाटते, घट्ट स्मृतींना पकडावे
कधी वाटते...सगळे काही विसरू दे

जानदार शेर. Happy

आवडेश हो Happy

वा !!!

अप्रतिम शेर आहेत एक चढ एक

मतला, शेवटचा...

कुणी आखले? का मीही पळतो यावर?
रुळावरूनी गाडी थोडी घसरू दे

अफलातून !

धन्यवाद!