पूनम यांचे रंगीबेरंगी पान

चित्रकला- घर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मुलाच्या चित्रकलेत हळूहळू (मनात असेल तर) प्रगती होत आहे.
ह्या चित्रामध्ये उजवीकडचं चित्र प्रिन्टेड होतं, आणि मुलाने फक्त रंग भरले होते.
आता तेच चित्र त्याने संपूर्णपणे पहिल्यापासून काढून रंगवले आहे. ही प्रगती आहे असं वाटले, आणि ह्या आधीचीही चित्र इथे दिली असल्याने, हे चित्र इथे देत आहे. कसे वाटले हे सांगा, जाणकारांना काही प्रगती वाटत आहे का?

drawing-house2.JPG

हे जरा जवळूनः

drawing-house1.JPG

प्रकार: 
शब्दखुणा: 

Miss you.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

लॅच उघडून विकी आत आला. बाहेरचा लोखंडी दरवाजा उघडा होता, म्हणजे अंकिता घरी आलेली होती. हे जाणवताच हळूहळू त्याचा पारा चढायला लागला.
अंकिता स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होती. तो तिथे गेल्यावर तिनेही त्याच्याकडे बघितल्यासारखं केलं, पण बोलली काहीच नाही.
घरात एक कृत्रिम शांतता पसरली. एक दबलेली शांतता. कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकेल अशी शांतता.
आजकाल सर्रास अशी शांतता पसरायची. भडका कधी उडेल, ह्याची वाट पाहणारी अस्वस्थ शांतता...

विषय: 
प्रकार: 

लेकानं केलेली कविता

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'मराठी भाषा दिवस'निमित्ये लेकानं कविता केली होती. 'मायबोली'च्या उपक्रमाअंतर्गत ही कविता 'बालकवी'मध्ये द्यायची असेही ठरले होते. पण ऐनवेळी बरेच घात झाले आणि ही कविता त्या उपक्रमास वेळेत देता आली नाही. म्हणून ही आता इथे देत आहे.

कवितेतल्या सर्व कल्पना लेकाच्या आहेत. मी काही ठिकाणी यमकं जुळवायला मदत केली आहे. त्याचे मराठी शुद्धलेखन म्हणजे शुद्ध भाषेत सांगायचं तर बोंब आहे! Proud पण मी मुद्दामच त्यात बदल/ सुधारणा नाही केले. काही अवघड शब्द जसे की एल्ड्रॅगो, सॅजिटेरिओ वगैरे (ही विविध बेब्लेड्जची नावं आहेत) मी पाटीवर लिहीले आणि त्याने ते बघून उतरवलेत. त्यातही परत काही चुका आहेतच! Uhoh

प्रकार: 
शब्दखुणा: 

आई नावाचं अजब रसायन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दर वेळी आईकडे रहायला गेलं की हक्कानं लाड करून घेते, इकडची काडी तिकडे करत नाही, समोर आलेलं आयतं खाते वगैरे वगैरे. पण ह्या वेळी आईकडे अचानक जायचा योग आला (म्हणजे, इट वॉजन्ट प्रीप्लॅन्ड यू नो!). आई जराशी आजारी होती, त्यामुळे ’मी किती कामाची आहे’ हे तिला दाखवून द्यायचा मी चंग बांधला. ठरवलं, की यंदा आईकडे जाऊन आईचंच माहेरपण करायचं. एकही काम तिला करू द्यायचं नाही. एरवी मीच नाही का माझ्या घरात सगळं करते? तिकडेही करायचं. वगैरे वगैरे.

विषय: 
प्रकार: 

माझी आई आणि तिची आई

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मी माझ्या आईवर खूप जास्त अवलंबून आहे. आधीही होतेच, पण लग्न, स्वतःचा संसार, स्वतःचं मूल झाल्यानंतरही आई अजूनही सारखी लागतेच. जरा कुठे खुट्ट झालं, एखादा पदार्थ करायचा असला, चार लोक येणार असले, लेक आजारी पडला, ऑफिसात/ घरी वाद झाले की सगळे आईच्या कानात ओतल्याशिवाय चैन पडत नाही! प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा फोनचं प्रमाण अर्थातच जास्त. कारण फोन कानाला लावणं सोपं. आता एकाच गावात रहातो, सर्व सुविधा हाताशी आहेत म्हणून आईशी सतत बोललं जातं असंही नाही. ती सवयच आहे, किंवा नैसर्गिक ओढ- सगळं आईला सांगायची.

विषय: 
प्रकार: 

अजून एक निसर्गचित्र

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

२००९च्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने नचिकेताने पहिल्यांदा हातात सीरीयसली रंगपेटी घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या साथीमुळे पुणं गप्पगार पडलं होतं, तेव्हा घरात नुसतंच खेळताना हा चाळा लागला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं हे पहिलं सीरीयस चित्र त्याने काढलं-
http://www.maayboli.com/node/10456

प्रकार: 

तुझ्या नसानसांत मी..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

१.

"हाऽऽऽऽऽय ऑल माय यंग ऍंड लव्हली फ्रेन्ड्ज!! ओळखलात ना आवाज? येस्स! यूअर अमि इज बॅक! मला किती आनंद होतोय इथे परत यायला, तुमच्याशी बोलायला, मी सांगू शकणार नाही फ़्रेन्ड्ज.. पण तुम्हाला कळेल नक्कीच.. गेला एक-दिड महिना मी टोटल झोपून काढला, इतकं फ्रस्ट्रेटींग असतं ते माहित्ये, पण तुमच्या, केवळ तुमच्यामुळे मला परत यावंसं वाटलं.. फ्रेन्ड्ज, आय कान्ट रियली थँक यू फॉर यूअर सपोर्ट, तरी पण मनापासून मनापासून थँक्स.. थँक्स त्या असंख्य ईमेल्स आणि मेसेजेससाठी, त्या प्रार्थनांसाठी, आशीर्वादांसाठी आणि शुभेच्छांसाठी!!

विषय: 
प्रकार: 

मृदू आवाज

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एखाद्याचा जसा गोड, गाता, फिरता गळा असतो ना, तसा एखाद्याचा मृदू आवाजही असतो म्हणे! म्हणजे नुसता गोड आवाज नाही (तो माझाही आहे म्हणे, हेहेहे), गोडही आणि शिवाय हळूवार, तलम असाही! कळला म्हणजे कसा ते? कर्रेक्ट! विविधभारतीवरच्या निवेदकांचा असतो तसा (एफेम चॅनेलवरच्या सो-कॉल्ड आरजेंना अजिबात नसतो गोड-बिड आवाज, ओरडत असतात नुसते!).. हां, तर असा गोड आवाज ऐकून समोरची ऐकणारी व्यक्ती खुश होऊन जाते म्हणे, तिला आपण खूप स्पेशल आहोत वगैरे असे वाटायला लागते म्हणे.. ती व्यक्ती असा गोड आवाज ऐकून काहीही करायला तयार होऊ शकते म्हणे- म्हणजे नजरेचा कटाक्ष असतो, ना तसा मृदू आवाजाचाही ईफेक्ट असतो म्हणे!

विषय: 
प्रकार: 

ऑफलाईन लेखन 'बरहा'मध्ये कसे कराल?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

'ऑनलाईन' असताना 'मायबोली'त लेखन कसे करायचे, ते आपण इथे- http://www.maayboli.com/node/9728 पाहिले. आता 'ऑफलाईन' लेखन कसे करायचे ते पाहू.
विविध मराठी फॉन्ट आपल्याला उपलब्ध आहेत, जसे की 'मंगल', 'गार्गी' इत्यादी, जे वापरून आपण वर्डपॅड किंवा नोटपॅडमध्ये मराठीत लिहू शकतो. 'बरहा' हे सॉफ्टवेअर वापरूनही मराठीत उत्तम प्रकारे लिहिता येतं.

'बरहा'त कसे लिहायचे हे पायरीपायरीने पाहूया-
१) बरहा लिहिण्यासाठी 'बरहा' सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागते. www.baraha.com वर टीचकी मारा. तिथून बरहा संगणाकावर डाऊनलोड करा..

3.JPG

विषय: 
प्रकार: 

'मायबोली'मध्ये अपूर्ण लेखन कसे कराल?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

बरेचदा असं होतं, की आपल्याला काहीतरी लिहायची सुरसुरी येते, पण योग्य ती सॉफ्टवेअर्स उपलब्ध नाहीत म्हणून किंवा त्या बाबत फारशी माहिती नाही, म्हणून लिहिले जात नाही.

मायबोलीवर आपल्याला आपले लिखाण लिहून, ते सेव्ह करायची सोय आहे. मदतपुस्तिकेमध्ये असलेल्या http://www.maayboli.com/node/1523 दुव्याच्या अनुषंगाने आणि वेळोवेळी या विषयावर आलेल्या प्रश्नांकडे पाहून असं वाटलं, की मायबोलीच्या 'अप्रकाशित लेखन' या सुविधेचा लाभ बरेच मायबोलीकर काही ना काही कारणाने घेऊ शकत नाहीयेत/ घेत नाहीयेत.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - पूनम यांचे रंगीबेरंगी पान