सिडनी फेस्टीवल.. भारतीयत्वाचा जय हो!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या शनिवारी सिडनी ला सिडनी फेस्टीवल च्या निमित्ताने ए. आर. रहेमान ह्यांची लाईव कॉन्सर्ट आयोजीत केली होती. न्यु साउथ वेल्स राज्य सरकार, भारतीय उच्चायुक्त अन इंडियालिंक इन्क. यांच्या संयुक्त प्रयत्नाने हा सोहळा घडवला गेला.

ऑस्ट्रेलियातील भारतीयांवर गेल्या दीड वर्षाच्या काळात झालेल्या/वाढलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुधारण्याचा एक भाग म्हणुन ह्या सोहळ्याकडे पाहिले गेले. हजारोंच्या संखेने भारतीय नागरीकांनी उपस्थिती लावली. सुरक्षेची काळजी घेतल्याचे पदोपदी जाणीव व्हावी इतके पोलीस अन खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केलेले होते. पुर्ण कार्यक्रम चालु असताना दोन टेहेळणी हेलिकॉप्टर तैनात केलेले होते.

इथल्या मुख्यमंत्रीन बाईं क्रिस्तीना केनली (Kristina Keneally) यांनी भारत अन ऑस्ट्रेलियातील समान गोष्टींची उजळणी केली. सांस्कृतीक विविधता, शिक्षण, संगीत याच सोबत भारतीय प्रजासत्ताक दिन अन ऑस्ट्रेलिया दिन (दोन्ही २६ जानेवारी ला असतात!) यांचा उल्लेख केला. सिडनी, न्यु साउथ वेल्स अन एकुणात ऑस्ट्रेलिया हे भारतीयांसाठी खुले आहेत ह्याचा पुनरुच्चार केला! भारतीयांवरील हल्ल्याचा निषेध अन दिलगीरी व्यक्त केली.

स्टीव वॉ अन मॅत्थ्यु हेडेन ह्या दोन क्रिकेटपटुंना लोकाच्यात मिसळुन टीव्ही वर अ‍ॅन्करिंग्/सुत्रसंचालन करण्यासाठी बोलावले गेले होते. भारताला आपले 'दुसरे घर' असा तर कार्यक्रम स्थळाला 'ईडन गार्डन, कलकत्ता' अशी उपमा दिलेल्या स्टीव वॉ यांचे मनोगत खुपच मनस्वी वाटले! त्यांच्या मताला ते भारतात अन ऑस्ट्रेलियात करत असलेल्या सामाजित कार्याची जोड असल्याने जास्त महत्व (टाळ्या देखील) मिळाले.

एकुण, भारतीय लोकांना आपलेसे करण्याचा हा एक प्रयत्न होता! भारतीय विद्यार्थ्यांचा येथील शिक्षणाच्या अर्थकारणावर असलेला प्रभाव हेच यामागील कारण होते.

न्यु साउथ वेल्स च्या मुखमंत्रीण बाईंचे मनोगत. (सुरुवातीलाच मोठ्या तोर्‍यातला 'वेलकम टु पॅरॅमाट्टा पार्क.. ' हा तिचा पंच मिस झाला. मला वाटले खुप रटाळ बोलेल, म्हणुन विडीओ सुरु केलाच नव्हता!) नंतर स्टीव वॉ चे मनोगत..
http://www.youtube.com/watch?v=x4YUJG-6r2Q

ए आर रहेमान ह्यांचे मनोगत!
http://www.youtube.com/watch?v=FtnCDRodP-Y

प्रकार: 

सहीच कार्य्क्रम झाला तुमच्याकडे! आमचा एक मित्र केवळ कार्य्क्रमासाठी रात्रभर ड्राईव्ह करुन गेला होता. मला वाटतय हल्ले ईथे जास्त प्रमाणात होताहेत त्यामुळे कार्यक्रम ईथे पण व्हायला हवा!!!