लेखनसुविधा

कप - बशी ( कविता)

Submitted by salgaonkar.anup on 14 January, 2020 - 00:01

कप - बशी

माझं नाव तुझ्याशी कायम जोडलेलं
जशी प्रत्येक पुरुषापाठी स्त्री
तशीच तुझ्यासाठी मी...
नाविण्याने परीपूर्ण
तुझा रंग,आकार,रुप
मीही तुला साजेशी
तु माझा कप मी तुझी बशी

हवाहवासा वाटतो
तुझा उबदार स्पर्श
वाफाळलास कि तापतोसही फार
मग मीच होते तुझा आधार
कधी वर कधी खाली
सोबत तुझ्या तुला हवी तशी
तु माझा कप मी तुझी बशी

किती जन्मांची सोबतही
आठवतही नाही...?
आजकाल तु तुला
माझ्यात साठवत नाही
"आजन्म साथ देईन" म्हणालास खरं
कुठे शिंकली रे माशी
तु माझा कप मी तुझी बशी

मनातलं

Submitted by salgaonkar.anup on 13 January, 2020 - 05:07

सांगशील का तू मनातलं ????
जे ओठावर येऊन थांबलेलं
काय सांगू ? आणि कसं सांगू ??
म्हणून अनेक दिवस लांबलेलं
शब्द जमेना, शब्द सुचेना
तरी निर्भयतेनं मांडलेलं
सूर्य झाकून दिवस सरता
तुझं काहीसं तुलाच उमगलेलं
तू आधी कि मी आधी
या विचारांना तू मागे टाकलेलं
नाही सांगितलं तर हरवून जाईल
मनात काठोकाठ साठलेलं
बघ ........ सांगून टाक
कदाचित प्रेमचं म्हणतात याला
जे नकळत तुलाही झालेलं

Indian Navy Ship रणवीर

Submitted by भागवत on 9 December, 2019 - 01:27

लहानपणा पासून मला भारतीय सैन्य आणि नौदल बद्दल प्रचंड आकर्षण होत. मी लहानपणी सातारा सैनिक स्कुल साठी परीक्षा सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मी विशेष क्लासेस सुद्धा लावले होते. परंतु मी सातारा सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा काही चांगल्या मार्काने पारित होऊ शकलो नाही. पण एखादा आर्मी/नौदल ऑफिसर भेटल्या नंतर त्यांचा पोशाख, चालण्यात एक प्रकारचा रूबाब, आणि बोलण्यात आत्मविश्वास बघून भारतीय नौदला बद्दल प्रचंड आदर आणि आकर्षण वाटते. मला भारतीय नौदला विषयी जाणून घ्यायला खूप आवडते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे.

शब्दखुणा: 

मायबोली वरील झणझणीत अनुभव

Submitted by Swamini Chougule on 18 November, 2019 - 12:48

प्रथम मायबोली च्या व्यवस्थापकांचे आभार मला तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर माझे लेखन प्रकाशित करण्याची संधी दिली . त्या मुळेच माझे नाव व लेखन अनेक रसिक वाचकां पर्यंत पोहोचले

मायबोली वासीयांना नमस्कार ,

मी सौ स्वामिनी चौगुले ,

मी मायबोली कुटुंबात नवीन आहे .मला इथे फक्त आठ दिवस झाले असतील तरी मला या ठिकाणी या लेखाच्या माध्यमातून इथे आलेले तिखट व गोड अनुभव तुमच्या सर्वांन बरोबर शेअर करायचे आहेत .

गोड अनुभवा पासून सुरवात करते .मी लिहलेल्या कविता , कथा व लेखांना भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.

शब्दखुणा: 

शुभं करोती

Submitted by पुरंदरे शशांक on 30 October, 2019 - 01:01

शुभं करोती

दिव्या दिव्या दीपत्कार
मनात घडव चमत्कार

जावो दैन्य अंधःकार
उजेड पसरो सभोवार

स्वार्थ निपटून भारंभार
मनात जागो परोपकार

अज्ञान पूर्ण दूर सार
ज्ञान सागर हेचि सार

मतदान

Submitted by Asu on 20 October, 2019 - 06:33

मतदान

मतदानाचे कर्तव्य पवित्र
लोकशाहीला नमन करा
ठोकशाहीला टाळून तुम्ही
निर्भयतेने मतदान करा
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान

परीक्षा ही अजब कुणाची
मतदान करणाऱ्या मतदारांची
निवडणुकीस उभ्या उमेदवारांची
की शांत झोपल्या लोकशाहीची?
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान

शब्दखुणा: 

पोया

Submitted by Asu on 30 August, 2019 - 09:36

माझे चित्रकार मित्र श्री.लीलाधर कोल्हे यांनी काढलेल्या सुंदर चित्रासह माझी कविता-
      *पोया*
(लेवा गणबोली)

शब्दखुणा: 

चमचा !

Submitted by झुलेलाल on 17 August, 2019 - 04:12

चमचा!
आपण पुनर्जन्म वगैरे मानत असू किंवा नसू. पण एक प्रश्न मात्र आपल्याला खूप आवडतो. तो म्हणजे, ‘पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल?’… कारण, या प्रश्नाचं उत्तर एका मानसशास्त्राशी जोडलं गेलेलं असतं. बऱ्याचदा, या जन्मात न जमलेली किंवा राहून गेलेली एखादी गोष्ट जमविणे किंवा पूर्ण होणे हे आपल्या पुढच्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे, असंच अनेकांना वाटतं. ‘पुनर्जन्म असलाच, तर पुढच्या जन्मी मला अमुक व्हायला आवडेल’, असं या प्रश्नावरचं उत्तर मिळतं, ते त्यामुळेच...

ती

Submitted by पुरंदरे शशांक on 30 July, 2019 - 23:45

ती

पानांवर अलगद थेंबी ती आरसपानी होते
.......ती अशीच उमटत जाते

कुसुमांच्या बहरातूनही काटेही पेरीत जाते
......ती अशीच वेडी असते

सुंदरता हाती धरुनी ओंगळास थारा देते
......ती सदा मनस्वी असते

सुंदरासुंदरापलिकडली व्यक्तता केवळ असते
....... ती कधीही कृत्रिम नसते

प्रिय स्पर्शाने अनामिक भावना मनी उमटते
....... ती अशीच बहरत जाते

जावळातून तान्हुल्याच्या ती गंधीत होत रहाते
.......ती अशीच शब्दी येते

भाकरीत दिसते कधी ती, भुई सारवताना येते
.....ती कविता अविरत असते

प्रगतीचा हव्यास

Submitted by Asu on 26 July, 2019 - 06:03

प्रगतीचा हव्यास

हव्यास प्रगतीचा नडतो
ग्लोबल वॉर्मिंग चहूकडे
हिमालये सागरास मिळती
प्रलयाचे घुमती बोल खडे

जमीन घटली नगरे वाढली
पाऊस पाणी जिरेल कुठे
घरादारात शिरते पाणी
प्रलयाचे घुमती बोल खडे

नद्या नाले तुडुंब भरले
पाणीच पाणी चोहीकडे
गुरेढोरे माणसे बुडाली
प्रलयाचे घुमती बोल खडे

माणसे मरती उजाड धरती
आकांडतांडव चोहीकडे
प्रगतीच्या हव्यासापोटी
प्रलयाचे घुमती बोल खडे

राज्याच्या हव्यासासाठी
कौरव-पांडव सैन्य लढले
कोण वाचले काय मिळाले
प्रलयाचे घुमती बोल खडे

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा