लेखनसुविधा

साने गुरुजी यांच्यावर निबंध

Submitted by Rahul Zajari on 7 September, 2022 - 09:27
essay-on-sane-guruji-in-marathi

आज आपण या लेखामध्ये साने गुरु यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. आज आपण साने गुरुजी यांच्या जीवन चारित्र्या विषयी, ते कोण होते आणि त्यांनी काय केले या बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. साने गुरुजी हे नाव कोणाला माहित नाही असे नाही कारण हे नाव सर्वांना माहित आहे कारण ते एक लोकप्रिय साहित्यिक होते आणि त्यांच्या अनेक कविता आणि पुस्तके खूप प्रसिद्ध होती. चला तर आता आपण साने गुरुजी यांच्याविषयी जाणून घेवूयात.

चिरुमाला (भाग ११ ते १५)

Submitted by मिरिंडा on 5 July, 2022 - 00:34

पो.स्टेशनचा माझा अनुभव पहिलाच असल्याने मी थोडा नर्व्हस होतो. गेलो तेव्हा इन्स्पे. कानविंदे मोहंती साहेबांशी बोलत होते. मला मोहंती साहेबांचं आश्चर्य वाटलं एवढा मोठा धक्का बसूनही ते थंडपणे घेत होते. फक्त उठताना मात्र ते धमकीवजा म्हणाले, " ऑफिसर ध्यानमे रखना अगर मेरी बेटी नही मिली या उसके साथ कुछ हुवा तो तुम तुम्हारे कुर्सीकी फिकर करना चालू करो, समझे " हे बोलणं अर्थातच कानविंदेंना आवडलं नाही. " सर हम पूरी कोशिश करेंगे, आप फिकर नही करना " मग मोहंती म्हणाले, " फिकर मुझे नही आपको करनी है. " असं म्हणून मोहंती गेले. कानविंदेंची चर्या उतरली. त्यावर त्यांनी राग माझ्यावर काढायला सुरुवात केली.

एक कवी

Submitted by अक्षय समेळ on 29 June, 2022 - 09:46

नखशिकांत भिजतात पावसात वेदनांच्या
गुंफतात भाव-भावना मैफिलीत शब्दांच्या
एकांतात कुठे कुरवाळतात कवी दुःखाना
जाहीर प्रदर्शन मांडतात सभेत प्रेक्षकांच्या

वेळ त्यांचा संपूर्णपणे समर्पित एकांताच्या
चित्त त्यांचे सदा अधीन इंद्रधनू कल्पनेच्या
लेखणी वेगवान पळते पवनापरी जेधवा
मन घाली प्रदक्षिणा भ्रमरापरी वसुंधरेच्या

यत्न करुनी थकल्या मेनका नानापरीच्या
तरी न भंगते विश्वमित्रापरी कवींची तपस्या
निश्चल असते ध्येयाप्रती त्यांची मानसिकता
काय करणार तिथे अप्सरा स्वर्गलोकाच्या

© अक्षय समेळ

गुगल सर्विसेस (ड्राईव्ह/डॉक्युमेंटस इत्यादी) वापरून मराठी लेख लिहिणे

Submitted by अतुल. on 21 April, 2022 - 13:22

मराठी लिहिण्यासाठी विविध पद्धती आहेत. पूर्वी बरहा म्हणून एडिटर होता. बराच लोकप्रिय झाला होता. सवयीमुळे अजूनही अनेक लोक तो वापरत असतील.

एका गप्पांच्या धाग्यात याबाबत एका प्रश्नाला उत्तर देता देता हे सगळे लिहिले गेले. याचा इतरानाही उपयोग होईल असे वाटल्याने हा धागा. या छोट्याश्या लेखात गुगलच्या सर्विसेस द्वारे मराठी कसे लिहिता येईल हे मांडत आहे. गेली अनेक वर्षे मी स्वत: या सर्विसेसचा वापर करत असल्याने व मला त्या फारच उपयुक्त वाटल्याने त्याबाबत इथे लिहित आहे. मायक्रोसॉफ्ट, ऍपल व इतर कंपन्यांच्या सुद्धा अशा सेवा असतील. पण मला त्याबाबत फार कल्पना नाही.

अकांशाचा भुंगा...

Submitted by अक्षय समेळ on 15 November, 2021 - 23:11

अकांशाचा भुंगा पोखरी मनास
नश्वर असे सर्वकाही आठवी मनास
परी चालताना मार्गावरून सत्याच्या
खेचेल गोडी ऐहिक सुखाची मनास

वासना उठाठेव करिती मनास
उरेल का सत्य चिंता जाळसी मनास
मनाचेच हाल होती मनाच्याच हातून
दुसरा कोण विरोध करिसी मनास

अस्मितेचा मृत्यू रडवी मनास
दुःख काय असते जाणवी मनास
"मी" पणा सोडाया मन धाजावत नसे
तेव्हा मिथ्या अहंकार फासी देई मनास

काय काय करावे, संभ्रम आडवी मनास
गृहीत धरले सारे, चूक आकळी मनास
नश्वर वस्तूंचा मोहापाश सुटणार नाही
सत्य जाणून गल्यानी मारे मिठी मनास

- अक्षय समेळ

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा