पूर्ण रात्रभर एक चांदणी होती जागी
आसपास रेंगाळत होता चन्द्र विरागी !
अर्ध्यावरती बोट सोडले प्रत्येकाने
आश्रयास माझ्या आला एकांत अभागी
उठता-बसता इथे-तिथे काष्ठी-पाषाणी
एक चेहरा खुणवत असतो जागोजागी
अतातरी तू वाग स्वतःच्या मनासारखे
मनासारखे जर त्याच्या अवघे जग वागी
अखंड होतो तेव्हा जो तो निरखत होता
तुकडे झाल्यावर जो तो टाळाया लागी
झिजून गेल्या कातळास हे विचारले मी
काय मिळवले शेवटास तू बनून त्यागी ?
तुझे देवपण तुझी थोरवी मान्य मला, पण...
कधीतरी तू ठेव स्वतःला माझ्या जागी
सुप्रिया
माझ्यासारख्या नवख्या लेखकाला मायबोलीवर लेखन करण्यासाठी अतिशय क्लिष्ट अश्या प्रक्रियेतून इक्डून तिकडे उड्या मारल्यावर देखिल 'नवीन लेखन कसे करावे' हे सापडायला खूपच वेळ लागला. मी पूर्वी १-२ लेख लिहिले अस्ल्यामुळे हट्टाने ती सुविधा शोधून काढली (ह्यात काही कर्तृत्व गाजवले असे नसले तरी), नवीन लोक एव्ढे सगळे दुवे वाचत बसतील आणि त्यात लाखो दुवे आणि प्रतिसादांच्या जंजाळातून पाहिजे ती माहिती शोधून काढतील ही अपेक्षा करणे चूक आहे. तरी कृपया खालील सूचनांचा विचार करावा ही विनंती:
असे म्हणतात दर १२ कोसाला भाषा बदलते. शब्दाचे काय आहे पावसाचे पाणी जसे जमिनीत मुरते तसे शब्द आप-आपल्या भाषेत मुरतात. कधी एखाद्या शब्दाने माणसाला वजन प्राप्त होते तर कोणाच्या बाणेदार बोलण्याने शब्दाला धार चढते. शब्दाची श्रीमंती तुमच्या भारदस्त उच्चारात नसून शब्दाच्या आपलेपणात आहे. एखादा विशिष्ट शब्द एखाद्या माणसाची ओळख सुद्धा होऊ शकते.
कलेवर माणुसकीचे, बेवारस पडले होते
देवांवरती दगडांच्या पुष्पघोष सडले होते
ही प्रेते जीवंत सारी, सरणावर आयुष्याच्या
पाहुन स्मशानामधले थडगेही रडले होते
तु दुरुन गेलीस जेव्हा, टाळुन जवळचे नाते
या उरातल्या र्हदयाचे मनसुबे रखडले होते
त्या उनाड वाटासंगे, मी जरा आगळीक केली
ते भले चांगले रस्ते, यावरती अडले होते
एका माझ्या मरणाची, ही कथाच नव्हती वेड्या
हे जगणे कित्येकांना, असेच नडले होते
मी इथे केंव्हाचा ,उभा उतावीळ आहे
त्या तिथे कुणी माझी ,वाट पाहुन गेली
काय तिला इतकाही, विश्वास नसावा आला,
बेताल रात्र ही माझी, स्वप्नें तपासुन गेली
कोरड्याच नयनांनी, ऐकुन घेतले सारे,
उल्लेख तुझा होताना, अश्रु पिसाळुन गेली
ही उदंड दौलत मझी, वादळी स्थिरावत आहे
हा तुझा आवाका नव्हता, तु कुठली लागुन गेली
मी हेच शेवटी माझे गार्हाने मांडत होतो
माझीच माणसे मजला मेल्यावर जाळून गेली
आस
चित्ती असो द्यावा येक
बरवा वैकुंठनायक ।।
नाम मुखी वसो सदा
लोपो ऐहिक सर्वदा ।
संतसंगती लाभावी
बुद्धी गोविंदी वसावी ।
हरीरूप व्हावे सारे
नयो मागुते अंधारे ।।
अास हीच जागो चित्ती
दान द्यावे रखुमापती ।।
........................................
आस = इच्छा
आळवणी
तुजविण वाटे । असार संसार । व्यर्थ बडिवार । भोवताली ।।
तुज नाठविता । त्रासले हे मन । व्याकुळले प्राण । तुझ्याविना ।।
सुटू पाहे धीर । भाराभार चिंता । घाला अवचिता । पडिला का ।।
नव्हे अाराणूक । तुजविण देवा । धाव रे केशवा । लागवेगी ।।
धाव धाव अाता । वेगे हात देई । येई लवलाही । ह्रदंतरी ।।
सुखावेल जीव । रूप देखताच । अाळी करी साच । बालकाची ।।
[लेखाचे शीर्षक आपणास खटकले असल्यास लेख आपल्यासाठी नाही
]
वॉट्सअॅप व आंतरजालावरील सर्व मराठी संस्थळांवरचे मराठी लेख /चर्चा/ प्रवासवर्णने/ कविता / पा.कृ. / प्रतिसाद वगैरे वाचताना बर्याचदा अशुद्धलेखनाचा इतका सर्रास वापर झालेला दिसतो की एखादे शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहिलेले लिखाण वाचताना चुकल्या-चुकल्या सारखे वाटू लागते.