रणांगण गाजवत प्रत्यक्ष कोणी वीर होतो
कुणी ती वर्णने ऐकूनही खंबीर होतो
हवेवर गंध मातीचा जसा वाहून येतो
मनामधला तुझा वावर तसा जाहीर होतो
अचानक भेटल्यावर बोलणे सुचते कुणाला ?
अवांतर बोलण्यामध्ये जरी माहीर होतो
विसंगत वागल्याचे शल्य बोथट होत जाते
पुरस्सर मारलेला टोमणा खंजीर होतो
स्वतः व्यतरिक्त हल्ली बोलते कोठे कुणाशी ?
तुझ्यापाशी मनातिल बोलण्याचा धीर होतो
मनांना जिंकणारा एक वेडा पीर होतो
युगे लोटून गेल्यावर कुणी साहीर होतो
-सुप्रिया
चॅप्टर तिसरा
"आश्रमाची ओळख "
झुंबर ढगांचे
झुंबर ढगांचे
झुलते तालात
गाणे पावसाचे
पेरते वनात
सावळे सावळे
घन आभाळात
सल उकलवी
भुईचे अल्लाद
थेंब पावसाचे
येती आवेशात
मुग्ध रान सारे
बेहोशी उरात
दाटला कल्लोळ
गगनी अवनी
जलरुप घेई
स्वये नारायणी
विनवणी
क्षणाक्षणाला पडतो खाली
उठुनी पुन्हा उचलतो पाऊली
नसे साथीला दिसे कुणीही
रणरण अवघी नसे सावली
बघुनी सारे राजमार्ग ते
वाटबिकटशी हीच निवडली
तुम्हासारखे दिग्गज कोणी
कधी चालले याच दिशेनी
केशर-बुक्का खुणा पाहुनी
दिशा हीच ती नाही चुकली
गाथेमधल्या शब्दांना मी
कधी मस्तकी उरी सांभाळी
त्या बोलाच्या साथीने तर
चालतोच ही वाट निराळी
आळी पुरवा एक एवढी
करी विनवणी माथा लवुनी
नसेल उत्कट भाव तरीही
घ्या ओढूनी घ्या हो जवळी
-------------------------------
आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी .........
नुकत्याच तुकोबांच्या आणि माऊलींच्या पालख्या पुणे मुक्कामी आल्या होत्या तेव्हाचा प्रसंग. संभाजी पुलावरुन बुवांची पालखी येण्याचा अवकाश - कुठल्याशा लाऊडस्पीकरवरुन मोठ्ठा जयजयकार झाला - संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय ....
आणि बुवांचा एक जोरकस अभंग मनात तरारून उठला ...
आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |
झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |
अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |
अवघे सावळ
उतरले पूर्ण | तुकोबा जीवन | यथार्थ दर्शन | गाथेमाजी ||
चिंतनी मननी | भक्तांसी तुकोबा | नवल विठोबा | करीतसे ||
अभंग तुक्याचे | निरखी विठ्ठल | मनी कुतुहल | फार दाटे ||
कैसी ही आगळी | भक्तिची माधुरी | शब्दी खरोखरी | सामावेना ||
मिटूनी नयन | बैसे स्वस्थचित्त | श्रीहरि एकांत | भोगतसे ||
तुकोबा तुकोबा | गजर अंतरी | आनंद सागरी | देव बुडे ||
विठ्ठल का तुका | तुका कि विठ्ठल | अवघे सावळ | एकरुप ||
संतांचे उपकार
भक्तासाठी देव | होतसे प्रगट | येरा तो अदृष्ट | आकळेना ||
भाव ऐसा थोर | देवापायी नित्य | जीवभाव सत्य | लुप्त होई ||
आठविता चित्ती | एकमात्र हरि | लौकिक विसरी | पूर्णपणे ||
वेड लागे देवा | भक्ताचेच पूर्ण | सांडिले निर्गुण | अरुपत्व ||
ठाकतसे उभा | भक्ताचे ह्रदयी | निर्गुण सामायी | सगुणत्वे ||
आकळावे वाटे | कोणासी श्रीहरि | अभंग उच्चारी | सप्रेमाने ||
ज्ञानेश्वरी गाथा | मनन - चिंतन | स्वये नारायण | दृष्य होई ||
सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा.
सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 2
सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग- 3
ह्या मागील तिन्ही भागात आपल्याला सुयुध्द त्रिनेत्री व त्याच्या भुतकाळाची माहिती कळाली. हे तिन्ही भाग मिळुन कथेचा पहिला चॅप्टर 'शोध' पुर्ण झाला आहे. मागील भाग- 3 मध्ये आजोबांनी सुयुध्दला त्यांच्या घराण्याचा खरा इतिहास सांगितला पण सर्वकाही सांगायच्या आत. त्यांच्या घरात दैत्य घुसले. काया ती पहिली व्यक्ती होती जी त्यांना दाराच्या फटीतून पाहते व प्रचंड घाबरते. तिला घाबरलेले पाहुन चिरंतर तिला विचारतो.
सांगावा
आले सांगावा घेऊन
ढग गहिरे जरासे
येई पाऊस मागून
सोड मनाचे निराशे
येतो हवेत गारवा
वारा वाभरा दुवाड
किलकिले करुनिया
ठेव मनाचे कवाड
नवलाची येई खास
मत्त वळवाची माया
घेई ऊरात भरून
भुई-अत्तराचा फाया
पखरण थेंबुट्यांची
होत राही अविरत
सल कोरडे विरु दे
ओल राख अंतरात ....