नमस्कार.
'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण.
लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून ओळखला जातो. मायबोलीवर 'मराठी भाषा दिवस' साजरा करण्याचं यंदाचं हे चौथं वर्ष. यानिमित्ताने पुढील कार्यक्रम आयोजित करणार आहोत. या सर्व कार्यक्रमांना दरवर्षीप्रमाणेच मायबोलीकरांचा भरभरून प्रतिसाद मिळेल याची आम्हांला खात्री आहे.
खालील दुव्यांवर उपक्रमांची माहिती मिळेल.
बोल बच्चन बोल
सा. न. वि. वि.
मनमोकळं
'अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१३' हे सिडनी येथे मार्च २०१३ मधे संपन्न होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील मराठी मंडळी मोठ्या संखेने एकत्र येतात. नवीन-जूना मित्रपरीवार, मनसोक्त गप्पाटप्पा, बहारदार सांस्कॄतीक कार्यक्रम यांची तर रेलचेल असतेच पण त्याबरोबर असते अस्सल मराठमोळं जेवण; आपल्या माबोच्या भाषेत 'खादाडी'!
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून मागच्या वर्षी पहिल्यांदा आपण मायबोलीवर साजरा केला. यापुढे करत रहाणार आहोत. यंदाही 'संयुक्ता' हा कार्यक्रम सादर करीत आहे..
यावर्षी खालील उपक्रम/स्पर्धा निवडल्या गेल्या आहेत. सर्व मायबोलीकर भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री आहे.
१. केल्याने भाषांतर..
२. ये हृदयीचे ते हृदयी
३. "बाल"कवी