तत्वज्ञान
लिओ ऑप्टसची दंतकथा (भाग सहावा) : अगोरा टेकडीवरचे मंदिर
लिओ ऑप्टसची दंतकथा (भाग पाचवा) : ज्ञानगर्भ सभामंडप
लिओ ऑप्टसची दंतकथा (भाग चौथा) : एल्युसिसचे अरण्य
पुन्हा एकदा आम्ही स्मिथच्या दारात उभे होतो. महत्वाचं म्हणजे, यावेळी त्यांच्या दाराला कुलुप नव्हतं. जोसेफने दारावरची बेल वाजवली, स्मिथनी दार उघडलं. स्मिथ आता विश्रांती घेऊन बरे झाले होते आणि बॅग घेऊन तयारी करून आमचीच वाट पाहत बसले होते. आम्हीही आपापल्या खांद्यावर काही जुजबी सामान घेऊन पुढच्या मोहिमेच्या तयारीत होतोच.
लिओ ऑप्टसची दंतकथा (भाग तिसरा) : एडविनचे पलायन
“आता काय करायचं ? या स्मिथनी तर मोठाच गेम केला आपल्यासोबत.”, जोसेफ चिडून म्हणाला.
तशी काहीअंशी कल्पना होतीच आम्हाला, कारण आमचा हस्तक्षेप दोघांनाही आवडला नव्हता. नाईलाजाने आमच्यासमोर संमती दाखवल्यासारखे भासवून आमच्या मागे त्यांनी आपला हेतू पूर्ण केला होता.
“ मला वाटते त्यांना पुढील रहस्यभेद झाला असावा. ”, मी म्हणालो.
लिओ ऑप्टसची दंतकथा (भाग दुसरा) : बारा देवता आणि कृष्णवर्णीय नोकर
लिओ ऑप्टसची दंतकथा ( भाग पहिला) : मिस्टर स्मिथ यांचे पत्र
रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?
रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?
.
या प्रश्नाचे एक मला पटणारे एक उत्तर वाचायला मिळाले, ते पुढे सांगतोय.
.
मला हा प्रश्न नेहमी पडायचा की उदाहरणार्थ लॉगॅरिदम, कॅलकुलस सारखे विषय अभ्यासात का शिकवले जातात. जर रोजच्या आयुष्यात जगतांना या गोष्टी लागणारच नाहीयेत तर हे शिकण्यासाठी वेळ का वाया घालवायचा? शिक्षण पद्धती अशी बदलायला नको का की ज्यात खरेच आवश्यक असतील तेच विषय आणि कौशल्ये शिकवले जातील. तसे केल्याने वेळ आणि ऊर्जा वाचणार नाही का?
.
गेम (सायन्स फिक्शन)
हा खरं तर नेहमीचा रस्ता! बाहेर पडलं, की पहिली राईट आणि नंतर लगेच लेफ्ट. लाखो वेळा ड्राइव्ह केलं असेल इथून. आज मी लेफ्ट घेतली आणि गुगल मॅप्सची बाई लागली कोकाटायला 'री-राऊंटिंग' म्हणून. म्हटलं हे असं का? बघतो तर मी पहिल्याच टर्नपाशी होतो; तिला मी राईट घेणं अपेक्षित होतं. मला चांगली आठवतेय मी आधी राईट टर्न घेतलेली. मग आलं लक्षात; डाऊनलोड डिलेज! म्हणजे, माझी गाडी जातेय तसा बाजूचा प्रत्यक्ष परिसर बदलायला हवा ना, त्याला डिले झाला. स्लो डाऊनलोड किंवा स्लो रीफ्रेश... आजकाल हे फार होत चाललंय. मी लगेच बग रजिस्टर केला; कामात आपुन चोख!
अंतरंग - भगवद्गीता - राजविद्याराजगुह्ययोग
बघता बघता, भगवद्गीतेचे अंतरंग समजून घेण्याच्या प्रयत्नात आता आपण जवळपास अर्धे अंतर पार केलं. १८ अध्यायांच्या गीतेच्या मध्यभाग म्हणजे नववा अध्याय असं मानायला हरकत नाही. (याच अध्यायातील १३ वा आणि १४वा श्लोक हे गीतेच्या मध्यभागी येतात. त्याबद्दल पुढे कधीतरी) 'राजविद्याराजगुह्ययोग' असे भले मोठे नाव असणारा हा अध्याय, अक्षय कुमारच्या ओह माय गॉड (Oh My God) या सिनेमामुळे अचानक प्रकाशात (मराठीत - लाईमलाईट!) आला. या सिनेमात परेश रावल आपल्या युक्तीवादात नवव्या अध्यायातल्या आठव्या श्लोकाचा उल्लेख करतो. त्यामुळे या अध्यायाच्या वाचकात अचानक वाढ झाली!
Pages
