उझबेकिस्तानमधल्या समरकंदमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची (Shanghai Cooperation Organisation) 22 वी शिखर परिषद 15-16 सप्टेंबर 2022 ला पार पडली. या परिषदेला 14 देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. सध्या SCO मध्ये निरीक्षक असलेल्या इराणने समरकंद परिषदेत पूर्ण सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.
समरकंद शिखर परिषद-2022
SCO सदस्य देशांमध्ये पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय समरकंद-2022 मध्ये घेण्यात आला आहे. त्यासाठी वाराणसी शहराची 2022-23 साठीची SCO ची पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
लहान मुलांना फटके मारावेत का?
गेले चार वर्षे या प्रश्नाचे उत्तर शोधतोय.
मी स्वत: एकेकाळी लहान मुलांना मारू नये या मताचा होतो. सोशल साईटवरील चर्चात मी या माझ्या मताला बरेचदा डिफेंडही केले. एकेकाळी जैसे बोलावे तैसे वागावे म्हणत कधी मुलांवर हात उचलला नव्हता. पण पुढे जाणवले हे काम करत नाहीये. त्यामुळे सध्या आमच्या घरात गरजेनुसार मुलांना मारणे अलाऊड केले आहे.
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती,
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती
ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK
---------------------------------------------------
विकेंडचे प्लान शुक्रवारी रात्रीच ठरवले जातात.
बायको सहज विचारते, "ब्रह्मास्त्र बघायची ईच्छा आहे का?"
आपण तर्जनी कपाळावर लाऊन विचारमग्न होतो. जणू ध्यान लाऊन संपुर्ण ब्रह्मांडाचा विचार करत आहोत.
पण आपल्या डोळ्यासमोर तरळत असतात गेले आठवडाभर वाचलेले रिव्यूज. ज्याचे ठळक हायलाईट्स खालीलप्रमाणे असतात,
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
एका युगाचा अंत . हा आठवडा काय घेऊन आलाय . सेरेना रिटायर झाली आणि आता रॉजर . काय बोलणार आणि लिहिणार त्याच्या विषयी . १०० पुस्तके तरी होतील त्याच्यावर .
आम्हाला अप्रतीम टेनिस पाहिल्याचा आनंद दिला . भारताच कोणी नसले तरी आम्ही त्याच्या साठी सगळे सामने पहायचो . सुरुवातीला तू चिडकी होतास . पण नंतर Humility personsonified .
असो .
तुझ्या जुळ्या मुलांना आणि मुलींना तू घडवत असशीलच . तुझ्या सारखेच असोत . वाट बघतोय .
आजपर्यंत कित्येक लोकांनी "कालप्रवास" करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं. काहींनी प्रत्यक्षात कालप्रवास केल्याचा दावा केला. पण संशोधनांती, त्यांच्या दाव्यात खरेपणा आढळून आला नाही.
नुकताच एक जुना व्हिडिओ बघण्यात आला. त्यानुसार "माईक मार्कम" नामक इसमाने प्रत्यक्षात कालप्रवास केला. त्याच्या ह्या दाव्याला वैज्ञानिकांनी अजूनतरी खोडून काढलेले नाही.

तरी निव्वळ रोमान्स म्हणजेच मोरपिशी दिवस असतील तर आमचे लांडोरपिशी गोड मानून घ्या 
----------------------------------
कॉलेजचे ते मोरपिशी दिवस !!
हा विषय वाचल्यापासून मनात एकच विचार. आजवर ईतके यावर लिहीले आहे. आता आणखी काय लिहीणार...
आता ह्या किस्याला मोरपिशी का म्हणायचे हे सगळे रामायण वाचले कि कळेल.