अवांतर
मन
माझा जीव अडकतो एका गावरान भाषेतील मराठी पुस्तकात,
खिशाला काही परवड नाही आणि हिसकावून घ्यायला जमत नाही..
माझा जीव अडकतो एका स्वैर वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेत,
पकडायला काही जमत नाही आणि बंदिस्त तर मुळीच करता येत नाही..
माझा जीव अडकतो एका संथ वाहणाऱ्या नदीच्या गोड पाण्यात,
थोड्याने पोट भारत नाही एव्हडया मोठया पाण्याला अडवण्याची ताकद माझ्यात नाही ..
आणि ,
माझा जीव अडकतो प्रचंड गडगडाट करून बरसणाऱ्या सारीं मध्ये ,
बघून मन भारत नाही मिठीत त्या क्षणभररही टिकत नाही ....
पण वेड मन अडकायचे काही थांबत नाही ....
परवानगी (शृंगारिक)
आधी गुंततील डोळे
डोळ्यातून इशारा मिळालाच तर
मग तुझ्या काळ्याशार लांबच लांब केसात शिरत तो आकडा काढून तुझ्या बटा मोकळ्या करीन मी.. एकामागून एक.
डोळ्यांनी बोलता बोलता जर तू पुढे केलेस तर, तुझे मऊ गुलाबी सायी सारखे ओठ, त्यांची परवानगी घेईन मी उजवा अंगठा फिरवून..
तुमचा आवडता सुपरहिरो कोण?
अदभुत आणि अविश्वसनीय, पण मानवीय सत्यघटना!
शहर मुंबई, काळ नव्वदीचा.
उपनगरात विक्रोळी इथे राहणारा एक लहान मुलगा त्यादिवशी फार खुश होता. कारणही तसेच होते. परीक्षा झाल्यावर त्याला त्याच्या आईवडिलांनी एक गाडी गिफ्ट केली होती. गाडीचा फोटो गूगलवरून शेअर करतो. कारण ती बघितल्याशिवाय किस्स्याची मजा नाही.

मुलांमधील कलागुणांना योग्य न्याय मिळावा यासाठी जागरुक पालक
फार पूर्वी कधीतरी लहान मुलांचा रियालिटी शो बघत होतो. निकालाचा दिवस होता. तीन-चार मुलांपैकी ज्याला कमी मते मिळणार तो मुलगा बाहेर पडणार होता. निकाल जाहीर झाला. एक मुलगा बाहेर पडला. सोबत त्याला किती मते मिळाली ते सुद्धा सांगितले गेले. त्यावर त्याचे आई-वडील तावातावाने भांडायला आले. आमच्या मुलाला इतकी कमी मते मिळणे शक्यच नाही. तुम्ही फसवणूक करत आहात.
परतीचा पाऊस - ए शॉर्ट ऍण्ड स्वीट लव्ह स्टोरी :-)
त्या दिवशी परतीचा पाऊस होता. संध्याकाळी ऑफिस मधून परतायची वेळ झाली होती. पण अंधारून इतके आले होते की नाईट शिफ्ट करून बाहेर पडलो की काय असे क्षणभर वाटून गेले. रात्री अंधाराची भीती वाटत नाही. कारण मुळात तो नसतोच. रस्त्यावरचे दिवे परिसर उजळवत असतात. पण अकाली अंधारून आले की त्या दिव्यांची सुद्धा सोबत नसते. पक्षी सुद्धा बावरून जातात आणि वेगळाच किलकिलाट करू लागतात. काळजात थोडेसे धस्स व्हावे असे वातावरण. बस याच वातावरणात मी ऑफिसमधून बाहेर पडलो.
"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम"
"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम"
.
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी (हिंदुस्थान फिल्म कंपनी च्या माध्यमातून) निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट, पहिला भारतीय मूक चित्रपट , राजा हरिश्र्चंद्र हा ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला गेला.
भारतीय इतिहासातील ही एक महत्वाची घटना, म्हणावी लागेल.
मुळात चित्रपट कला , तिची विविध अंगे ही भारतीयांना नवीन होती.
लौकिकर्थ आणी दिव्यार्थ....
भा. रा. तांबेंजींचे 'नववधु प्रिया' गाणे (कविता) ऐकत होतो की ज्याचा सरळ अर्थ अगदी साधा वाटला तरी त्याचा खरा अर्थ वेगळाच व उच्च पातळीचा आहे.
त्याचळेस कुमारजींच्या निर्गुणी भजनातील ' कौन ठगवा नगरिया...' ह्याच्या दिव्यार्थात आणी वरच्या गीत / कवितेतला अर्थ जवळपास सारखा आहे असे मला वाटले.
अशी अजून काही उदहरणे असल्यास जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद!
असेच एक कबिराचे माझे आवडते भजन
https://www.youtube.com/watch?v=0vzS1Sdwccs
बाडेन - वुटम्बर्ग , जर्मनी
आज वृत्तपत्रात बाडेन - वुटम्बर्ग , जर्मनी बद्दल पानभर जाहिरात पाहिली.
चालु घडामोदिबद्दल जेवढी (मर्यादित) माहिती आहे त्यप्रमाणे युरोपमध्ये स्थलांतरासठी दिवसेन्दिवस कठोर नियम होत आहेत व ते शक्यतो मर्यादित करत आहेत. त्यासंदर्भात ही जाहिरात एक कुतुहल जागवणारी वाटली.
कुणास ह्याबद्दल अधिक माहीती असल्यास, जाणून घ्यायला आवडेल.
काही चांगल्या संधी असल्यास माझ्या संपर्कात असलेल्या व नवीन - चांगल्या संधीच्या शोधात धडपडत असलेल्या तरुणाई पर्यंत त्या पोहोचव्या ह्यासाठी प्रयत्न करावे असे वाटते.
धन्यवाद!



