मायबोली गणेशोत्सव २०२५

पाककृती स्पर्धा ३ -व्हेजिटेबल स्टर फ्राय विथ पायनॅपल - अल्पना

Submitted by अल्पना on 8 September, 2025 - 02:05

स्पर्धा जाहिर झाल्यावर वाड्यावर अमितव ने एक एशियन / थाई पदार्थ सुचवला होता. त्याने कोणतेतरी थाई चिकन खाल्लं होते ज्यात काजू होते. आणि तो पदार्थ सफरचंद आणि मनुके घालून शाकाहारी करता येईल असं त्याला वाटलं होतं. तिथूनच हा पदार्थ सुचला. सफरचंद, तोफू आणि भाज्या घालून अशियन चवीची आंबट -गोड तिखट स्टर फ्राय भाजी किंवा ग्रेव्ही करावी असा विचार होता.

विषय: 

तुमच्या विभागातील बाप्पा - २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 September, 2025 - 08:47

लोकांनी एकत्र यावे म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. साधारण हाच उद्देश ठेवून हा धागा काढत आहे.

इथे तुमच्या विभागातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो शेअर करा. गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्ती आणि गणपती मंडळाने केलेले छान छान देखावे येऊ द्या.

@ admin - सामान्य सभासदांनी गणेशोत्सव ग्रूपमध्ये हा धागा काढणे योग्य की कसे ते माहीत नाही. पण अयोग्य असल्यास कृपया इतर विभागात दाखल करावा.

विषय: 

पाककृती स्पर्धा ३- अननसाचा गोज्जू - कविन

Submitted by कविन on 5 September, 2025 - 14:28

अननसाचा आमटी सदृश्य वापर आपल्याला अजिबात नवीन नाही. पाठारे प्रभूंचे अननसाचे सांबार असो अथवा कोकणी/ गोवन लोकांचे सासव असो किंवा असो कर्नाटक प्रांताची खासियत असलेला गोज्जू नावाचा पदार्थ, अननसाच्या आंबट गोडपणाला सौम्य मसाल्यांची जोड दऊन बनणारा हा पदार्थ त्या त्या ठिकाणी थोडेफार बदल होत केला जात असला आणि प्रत्येक ठिकाणचा त्याला खास टच असला तरी त्यातले समान सूत्र हे "आंबट गोड तिखट' या तीन चवींचा समतोल साधणे हेच आहे.

मी आज केलाय तो कर्नाटक स्टाईल अननसाचा गोज्जू. ज्याला मेनस्काई/मेनास्काई असेही नाव मी नेटवर वाचलेय.

शशक ३ – मागोवा – प्राचीन

Submitted by प्राचीन on 5 September, 2025 - 09:46

दशकानुदशकं मायबोलीवरील गणेशोत्सव
गवसलेले काही स्पर्धा \उपक्रम अभिनव.
कथासाखळी, स्वरचित आरत्या फुलविती प्रतिभा,
मुलाखती, चित्रचारोळ्या वाढविती शोभा.
फोटोंना नाव, कवितेवरून चित्र, एकपानी कथा आवडती सकळां,
हास्य चित्र, आमंत्रण लेखन यांतून खुलती नाना कळां.
ठो - उपमा, अतरंगी जाहिराती, ‘उंदीरमामा टोपी हरवली’ हे विषय आगळे,
माझी युक्ती, कथापूर्ति, बकेट लिस्ट अन् हस्तलेखनाने रमती सगळे.
अप्रसिद्ध गणपती मंदिरे, लॉकडाऊनचे अनुभव अनिवार्य,
लेकरांसाठी खास उपक्रम, पाककृतींचे फोटो नसती अपरिहार्य.

शशक ३ - संयोजक रॉक्स! गणेशभक्त शॉक्स!! – ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 September, 2025 - 17:49

वर्ष २०२६, गणेशोत्सव – मुंबई!
----------------------------------------

आदल्या वर्षी मायबोलीकर ऋन्मेषने गणपती दर्शनासाठी होणाऱ्या तुफान गर्दी विरोधात मोर्चा उघडल्याने सरकारला जाग आली.

ऋन्मेषला त्याच्या राहत्या घरातून उचलले गेले.

पण समस्येकडे लक्ष वेधणाऱ्या ऋन्मेषकडे समस्येचा तोडगा नव्हता. त्याच्या धाग्यांप्रमाणे त्याच्या कथादेखील अभ्यासू नव्हत्या.

यावर आमचे सल्लापेशालिस्ट मायबोलीकर उपाय सुचवतील अशी शिफारस त्याने केली.

विषय: 

शशक २ – बदल -प्राचीन

Submitted by प्राचीन on 4 September, 2025 - 13:44

सन १८५७
स्थळ - ब्रह्मावर्त
लाल कमळ आणि रोटी वस्तीत सगळीकडे फिरवले गेले. हा ‘निरोप’ आणि 'सब लाल हो जाएगा'..ही कुजबूज, हळुहळूगलबला बनत गेली. मीरतमधून बातमी येताच तोही योजनेप्रमाणे सैन्य घेऊन सोजिरांवर चालून गेला. अंगावरचे घाव जणु अलंकाराप्रमाणे मिरवत मातृभूमीपुढे लीन झाला..
सन १९२४, १९४२...क्रांतीची ज्वलंत पावले टाकणारा तो..
सन १९४७..भारतमातेच्या बंधविमोचनामुळे आनंदविभोर झालेला तो.. भारतमातेच्या प्रगतीच्या मार्गावरील पावलांचं अवलोकन आणि अनुकरण करणारा तो..
नंतर वेगवान विसाव्या, एकविसाव्या शतकाशी मेळ जुळवताना मात्र..

पाककृती स्पर्धा १ - शिरा सजावट- अल्पना

Submitted by अल्पना on 4 September, 2025 - 04:05

नेहेमीच्या रव्याच्या शिर्‍या ऐवजी हा मुगडाळीचा शिरा

साहित्य - १ वाटी मुग डाळ, १ वाटी साखर, १ वाटी तुप , २ चमचे रवा, २ चमचे बेसन, २ वाट्या पाणी, १ वाटी दुध, अर्धी वाटी साय , १/२ वाटी केशर घातलेले दुध, वेलची पुड, आवडीप्रमाणे सुकामेवा
सजावटीसाठी थोडा आंब्याचा पल्प, केशराच्या काड्या, सुकामेवा (पिस्ते, काजू, बदाम), फुलं / पाकळ्या - झेंडू / गोकर्ण, तुळशीचे पान, वेलची पुड
कृती :
मुगाची डाळ १५-२० मिनिटे भिजवून नंतर वाळत ठेवली. वाळलेली मुग डाळ नंतर मंद आचेवर परतली. थंड झाल्यावर मिक्सरच्या पल्स सेटींग वर डाळीचा रवा काढला. हे सगळं शिरा बनवायच्या आदल्या दिवशी करून ठेवलं.

विषय: 

शशक २ - सत्वपरीक्षा-आशिका

Submitted by आशिका on 4 September, 2025 - 02:41

ज्यासाठी सगळा अट्टाहास केला होता तो 'पुनर्मिलनाचा' क्षण समीप येऊन ठाकला.... कर्तव्यपूर्तीचे समाधान, पराक्रमाची विजयगाथा, सत्धर्माचं राज्य सारं काही मिळालं.

सर्वत्र विजयोत्सव जल्लोशात साजरा होत होता. दोघांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमत होता...... हो, तिच्याही जयजयकाराने.....नुकतीच तिने 'सत्वपरीक्षा' यशस्वीरित्या पार पाडली होती ना !

त्या परीक्षेने तिला देवी बनवून मखरात सजवले. तोच आदर्श मानून तिच्या कित्येक लेकी, सुनांनाही निमुटपणे तीच वाट चालावी लागली....पुढची कित्येक वर्षे......

तो धिम्या गतीने पावले उचलत तिच्या समोर ठाकला....

मात्र

विषय: 

पाककृती स्पर्धा ३ - ग्रीन स्मुदी आणि चटकदार फृट टोकरी - कविन

Submitted by कविन on 3 September, 2025 - 12:21

चटणी करता मला व्रताची कहाणी ऐकावी आणि सांगावी लागली. आज म्हंटल "बाप्पा तू कुठे मुर्तीत असतोस? तू कुठे नैवेद्य खातोस?, सगळ तर आम्हीच असे नंतर संपवा संपवी करत असतो. " तो फक्त हसून म्हणाला, "प्रत्येकात मी असतो हेच ना आत्ता खरडून आलीस तिथे देवमाणसावर लिहीताना" म्हंटल बॉस पॉईंट है, इस बात पे. अब ये बताना आज मै क्या बनाके मेरे अंदर बसे तुम्हे खिलाऊ?

तो म्हणे गोडाने कंटाळलोय फार, कर असच काही हलक फुलक पण तरी पोटभरीचं आणि अगदी बॉर्डरलाईन स्पायसी टॅन्गी सॉल्टी आणि फिकुट गोडूस.

बाप्पाची अज्ञा झाली म्हणून कविन कामाला लागली.

शशक - १ - दोन पायांचा गणपती – ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 September, 2025 - 11:47

गेले कित्येक तास राणी तहानभूक विसरून बाबांसोबत दर्शनाच्या रांगेत उभी होती.
मात्र बाप्पा नजरेस पडताच तिला भरून आले.

त्यांच्या "एका" पायापाशी तिच्याच वयाची दोन मुले बाप्पांसोबत सेल्फी घेत होते. पुन्हा पुन्हा त्या पायावर डोके टेकवत होते.

इतक्यात तिचा नंबर आला..
याचसाठी केला होता..!

तिने अधिरतेनेच बाप्पांच्या "दुसऱ्या" पायाला हात लावला आणि चरणी माथा टेकवणार इतक्यात..

कोणीतरी तिचे बकोट पकडून खेचल्याचे तिला जाणवले...
आईं ग्ग! काही समजायच्या आतच ती मंडपाच्या बाहेर होती.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२५