अवांतर

असमान

Submitted by अंबज्ञ on 31 May, 2018 - 06:46

.

.

काहीतरी एक समान धागा जुळल्या शिवाय मैत्री होत नाही असे म्हणतात.
मग भलेही दोन वेगळ्या दिशेने जाणारे काटकोनातील प्रवाह ज्या एका बिंदुला एकमेकास छेदतात तो सामायिक असल्याने निव्वळ त्याच एका गोष्टीमुळे त्यांची नाळ एकमेकांना बांधून ठेवली जाते. मृदुला आणि मुकेशची मैत्री अश्याच एका बिंदुपासून सुरु झाली.

फणस

Submitted by विलास गोरे on 27 May, 2018 - 14:02

मे महिन्यातील ती एक संध्याकाळ, दिवेलागणीची वेळ. तळकोकणातील आमचे घरात आमची आई रात्रीच्या जेवणाची तयारी करीत होती, तर दादा म्हणजेच आमचे वडील ओसरीत त्यांच्या आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत होते. मी व माझा मोठा भाऊ सुरेश अभ्यास करीत होतो. एवढ्यात आमच्या शेजारी राहणारी पार्वती सांगत आली की तिचा नवरा महादू रात्री घरी येताना कोणाला तरी बघून घाबरलाय व त्याला ताप पण भरलाय. सर्वच घाबरून गेलेत. आईने पार्वतीला धीर दिला. दादानी माझा मोठा भाऊ सुरेश याला शहरातील डोंगरे डॉक्टरांना घेऊन यायला सांगितले. दादा व मी पार्वतीबरोबर महादूच्या घरी गेलो. महादूच्या घरी तशी बरीच माणसे जमली होती.

विषय: 

कथा लेखन

Submitted by विलास गोरे on 27 May, 2018 - 13:36
तारीख/वेळ: 
27 May, 2018 - 13:31 to 10 June, 2018 - 13:31
ठिकाण/पत्ता: 
पुणे
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 

२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
तारीख/वेळ: 
9 June, 2018 - 10:00 to 18:00
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

हातांचे आरोग्य, निगा इ. अनुशंगाने चर्चा

Submitted by योकु on 15 May, 2018 - 07:42

माझे तळहात मुळात फार राठ आणि स्पर्शाला कडक आहेत. आजकाल तळहाताच्या मागील भागही कडकसर आणि राठ जाणवतो, स्पेशली नखांच्या जवळ आणि बोटं. इनफॅक्ट संपूर्ण लोअर फोरआर्म (मनगटापासूनचा हाताचा पुढला भाग) राठ आणि खरखरीत झालेत. नेहेमी कोरडे ठक्क जाणवतात.
यावर काही उपाय आहे का?

स्पेशली माझ्या बाळाला हाताळतांना हे मलाच फार जाणवतं... म्हणून उपाय विचारतोय.

हॅलो S... 'मी' बोलतोय !

Submitted by अंबज्ञ on 11 May, 2018 - 00:11

.

.

आज सकाळी एक गंमत झाली, म्हटलं चला जरा फोन लावू अन् काय करतोस विचारू ! पण हाय रे देवा, फोन सतत एंगेज लागला. बर्र थोड़ा वेळ वाट पहावी म्हणून थांबलो सुद्धा , तरीही पुनः आपले तेच ― "ज्या व्यक्तिशी आपल्याला संपर्क करायचा आहे ती व्यक्ति सध्या दुसऱ्या कॉल वर बोलत आहे ... धन्यवाद !"

लेख - उत्तर कोरिया - मीमांसा

Submitted by भागवत on 8 May, 2018 - 06:23

एखादा गुंड किंवा द्वाड मुलगा जो प्रत्येक अरे ला कारे करतो आणि कारण नसताना धिंगाणा घालतो अचानक तो जर समजूतदारपणे वागायला लागला तर आपल्याला नवल वाटते. त्या कडे आपण संशयाने पाहतो. असेच काहीसं "किम जोंग-अन" या उत्तर कोरियाच्या हुकूमशहा बद्दल झाले आहे. मी काही आंतरराष्ट्रीय घडामोडीचा जाणकार नाही पण या घटनेकडे एक सामान्य व्यक्तीच्या नजरेतून बघतो. मागील काही महिन्यांपासून हुकुमशहाचा कल बघितल्यास आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील.

विषय: 

बेशिस्त मुले

Submitted by akki320 on 6 May, 2018 - 01:39

अरे इतक बेशिस्त असाव का एखाद्या मुलाने, काल हाँटेलात गेलो वेटरला चक्क काका म्हणुन संबोधले आजुबाजुचे लोक बघतच बसले. काल ह्या कारट्याला बागेत घेऊन गेले तेव्हा तिथल्या म्हातार्या आजोबांना मदत करत बसला. मी लहान असतांना रोज काहीतरी कारणाने मार खायचो आणी हा कारटा खोट सूद्धा बोलत नाही. माझा मुलगा जाम बिघडलाय. तुमच्या घरी आहेत काहो असली कार्टी????

विषय: 
शब्दखुणा: 

मुका मार अनवरत झेलुनी

Submitted by अनन्त्_यात्री on 5 May, 2018 - 21:34

काव्यतडागी जलपर्णीसम
प्रतिभा बहरून आली
पाहू न शकतो रवी, सकल ते
कवीस दावुनी गेली

कवी लेखणी सरसावून मग
मांडी ठोकुनी बसला
इथे मोडुनी तिथे जोडुनी
कविता पाडुनी गेला

पामर रसिकांच्या तोंडावर
कविता मग आदळली
मुका मार अनवरत झेलुनी
जुनी जखम हुळहुळली

हे कविराजा, एक विनंती
ऐक जरा रसिकांचे
काव्यप्रपाती बुडवू नको रे
आवर कढ प्रतिभेचे

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर