अवांतर

‘नॅनो’ला टाटा

Submitted by टोच्या on 11 October, 2019 - 07:42

‘नॅनो’ला टाटा
‘लाखात एक’ किंवा ‘लाखात देखणी’ असे वर्णन करण्यात आलेल्या बहुचर्चित, आम आदमीची म्हणून ओळख बनलेल्या ‘नॅनो’ या कारचा प्रवास जवळपास थांबला आहे. या वर्षात सप्टेंबर अखेर अवघी एक नॅनो कार विकली गेली असून, पूर्ण वर्षात एकाही कारचे उत्पादन करण्यात आले नाही. स्पेअर पार्ट, मनुष्यबळ महाग होत असतानाही कारची किंमत नियंत्रणात ठेवण्याची कसरत कंपनीला करावी लागली. मात्र, त्यामुळे या कारमध्ये अनेक ‘अॅडजेस्टमेंट’ कराव्या लागल्या. यामुळे ग्राहकांमध्ये असलेली नॅनोची क्रेझ कमी होत गेली आणि पर्यायाने उत्पादनालाही आहोटी लागली.
--

विषय: 
शब्दखुणा: 

आमचे ते लिंबू. राफेलचे ते कडूलिंबू?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 October, 2019 - 14:51

भारत सरकारने देशाचे संरक्षण करायला राफेल विकत घेतले.
आणि मग त्या राफेलचे रक्षण करायला काही लिंबू विकत घेतले.

सोशलसाईटवर या प्रतापाची फारच खिल्ली उडवली जात आहे. आणि अर्थात ते स्वाभाविकच आहे. जिथे वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक असतो तिथे या श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा, शोभत नसल्याने उठून दिसतात. भले खिल्ली उडवणारे स्वत:च्या दाराखिडक्यांना लिंबाचे तोरणच का लावत असेना, ट्रोलिंगच्या या वाहत्या गंगेत यथेच्छ हात धुवून घेतात. त्यातही जर प्रकरणाला राजकीय झालर असेल तर विचारायलाच नको. समर्थनार्थ दुसरी पार्टीही उतरते आणि तुंबळ ट्रोलयुद्ध पेटते.

विषय: 

आमच्या पिढीचं अर्धवट राहिलेलं (लैंगिक) शिक्षण.

Submitted by Charudutt Ramti... on 8 October, 2019 - 14:36

साधारण अर्धा पाऊण किलो शेंगदाणे सहज मावतील एवढ्या आकाराची एक काचेची बरणी आहे. त्यात एक रसरशीत लाल चुटुक कांतीचा पूर्ण पिकलेला टोमॅटो टाकला जात आहे. मग त्या बरणी वर फिरकीचे झाकण घट्ट लावून बरणी बंद केली जाते. परंतु झाकण बंद केल्यानंतर विशेष असे काहीही घडत नाही. मध्ये दोन क्षणांचा अवधी. मग आणखी एक दुसरा लालचुटुक टोमॅटो बरणीत टाकला जातो. आणि बरणी चे फिरकी लावून बसवण्याचे झाकण पुन्हा एकदा फिरवून बरणी परत घट्ट बंद केली जाते. परंतु तरीही उल्लेखनीय असे काहीच घडत नाही. परत ते बंद केलेले फिरकीचे झाकण उघडून तिसरा टोमॅटो बरणीत टाकला जातो.

विषय: 

इथे लिहिणाऱ्यांनी मायबोलीशीच एकनिष्ठ असावे की असू नये?

Submitted by सोमा वाटाणे on 4 October, 2019 - 21:12

अजून काही नवीन सुचलं नाही. तर म्हटलं एखादं पिल्लू सोडून देऊ या. बरेच ज्येष्ठ आणि माबोवर मान्यता पावलेले लेखकू आणि लेखिकू आपलं लिखाण फक्त इथेच प्रकाशित करताना मला आढळले आहेत. काही प्रसिध्दीला हपापलेले ( यात मी पण आलो, पण मी स्वत:ला लेखक समजत नाही, लिंबुटिंबू समजतो) इथलं लिखाण अन्यत्र सुध्दा प्रकाशित करत असतात.
मला वाटतं की आपण माबोप्रति एकनिष्ठ ( लॉयल की काय) असलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं लेखक/ लेखिका/वाचक मित्रांनो?
धागा आवडला नसल्यास माझा आगाऊपणा माफ करून लेखाला इग्नोर मारण्यास हरकत नाही.

विषय: 

त्याचा येळकोट राहीना.

Submitted by कृपाचार्य on 30 September, 2019 - 18:50

एके दिवशी एक दारुडा यथेच्छ दारु पिऊन, गटारात लोळून आपल्या घरी आला आणि त्याला एक नविनच शोध लागला. आज तो ज्या रस्त्याने घरी आला तो रहदारीने भरलेला रस्ता चक्क सुनसान झाला होता. त्याने रुबाबात शर्टची कॉलर सरळ केली आणि बायकोने वाढलेला शिळा भात तिच्या शिव्यांसोबत खाल्ला. आता दारुडा रोजच मनसोक्त पिऊन, गटारात लोळून त्या रस्त्याने जाऊ लागला. त्याला पाहून रस्ता बदलणाऱ्या लोकांना पाहून शेफारु लागला. एखाद्या दिसणाऱ्या पादचाऱ्यावर स्वतःच्या अंगावरील गटारातली घाण उडवायला लागला. दिवस चालले होते, दारुड्याचा माज वाढत होता. एक दिवस मस्तीत झुलत जात असताना त्याने समोरुन एक माणूस येताना पाहिला.

विषय: 

रमा

Submitted by जयश्री साळुंके on 30 September, 2019 - 09:41

डॉ. रमा आज तब्बल दहा दिवसांनी घरी येणार होत्या. भूकंपग्रस्त लोकांना मदत होतं म्हणुन गेल्या दहा दिवसांपासून त्या गुजरात मध्ये गेलेल्या होत्या. इकडे लक्ष्मीकाकी वाट बघत होत्या. रमा त्यांची रक्ताची कोणी नव्हती, पण गेल्या कित्येक वर्ष सोबतीमुळे ती देखील आता त्यांच्या मुलीसारखीच होती. तिच्या जन्मापासून तिला सांभाळलं काकींनी आणि आता ती स्वतः साठीच्या घरात होती. आज कोणास ठाऊक का, पण काकींच्या डोळ्यासमोर रमाचे सगळे रूपं दिसत होते. लहान असतांना बोबडे बोल बोलणाऱ्या रमा पासुन ते कित्येक लोकांचा जीव वाचवणाऱ्या रमापर्यंत. पोरगी शिकून मोठी झाल्याचा आनंद घरातल्या सगळ्यांना झाला होता.

सावळी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 23 September, 2019 - 14:53

सावळ्या रातीचं दुधाळ चांदणं
दिलंय आभाळानं तुलाच आंदण
बहरे तुळस सारल्या अंगणी
तसंच वाटे तुझं गं बोलणं

नजर तुझी शांत आसमंत सारा
सांजंच्या पारंला जणू फुलतो मोगरा
काळ्याशार केसांत जीवच अडतो
खट्याळ तुझं हसू जणू मोर तो नाचरा..

चेहरा गं तुझा पाडी चांदव्याला खळं
पाहून तुझ्याकडं सये जीव त्याचा जळं
नाजूक जिवणी तुझी उमलती कळी
लोभस गं रूप तुझं लावी नजरेला टाळं

रात रात न ये झोप सये फक्त तुझी याद
कसा लागलाय जणू माझ्या जिवा तुझा नाद
रुपानं या तुझ्या मांडलाय असा छळ
फक्त तूच की समोर काय दिस काय रात

विषय: 
शब्दखुणा: 

काळजी - (शतशब्दकथा)

Submitted by Yogita Maayboli on 23 September, 2019 - 04:29

रोज नवीन दिवशी नवीन विचार येतात त्या मनात.... कालची दुःख कालची काळजी कालचे टेन्शन विसरण्याचा प्रयत्न करतो नवीन दिवस....मनाला वाटते बहुतेक यशस्वी झालो....पण नंतर कळून चुकते कि काही नाही विसरलो....... तेच दुःख तेच टेन्शन तेच विचार मनात पुन्हा घर करतात....मनाचा भुगा होतो....मेंदूच्या शिरा फाटतात.... आजूबाजूचे जग वेगळ्याच जगात असते.... आपण त्यांच्यात असतोही आणि नसतोही ..उगाचच स्मित हास्य देऊन त्यांच्यात असण्याचे पुरावे द्यायचे.....उगाचच वेगळे विषय काढून विषय वाढवायचे...... पण तो मूळ विषय मनात तसाच राहतो....ते दुःख नाही सोडत तुम्हाला .....

विषय: 

लंबी रेस का घोडा - ब्राईट हॉर्स ऋषभ पंत !

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 September, 2019 - 17:25

एक तो डार्क हॉर्स असतो. जो उमदा असतो पण डार्क असल्याने कोणाच्या नजरेत येत नाही. आणि सुमडीत रेस जिंकून जातो तेव्हाच प्रकाशझोतात येतो.

विषय: 
शब्दखुणा: 

Cat adoption बद्दल

Submitted by CherryBlossom on 21 September, 2019 - 20:45

माझा भाऊ जून महिन्यात मांजर आणि तिची नुकतीच जन्मलेली पाच पिल्लं घरात घेऊन आला.
आता ती पिल्लं जवळपास 3 महिन्यांची झाली आहेत.
त्यामुळे एवढी पिल्लं घरात सांभाळणे जरा कठीण आहे.
आम्ही आमच्या जवळच्या एका व्यक्तीला पिल्लू दिले होते पण एवढे आठवडे बाकीच्या पिल्लांसोबत राहिल्याने कदाचित ते तिथे राहायला तयार नव्हते.
शेवटी त्याला पुन्हा घरी आणावे लागले.
त्यांना Ngo मध्ये सोडायला मन तयार होत नाहीये.
तुमच्या ओळखीच्या व्यक्तींपैकी कोणी असे आहे का जे पिल्लांना दत्तक घेऊ शकतात.
असेल तर प्लीज सांगा __/\__

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर