अवांतर

हाऊसफुल

Submitted by तुषार विष्णू खांबल on 30 May, 2020 - 02:38

हाऊसफुल
शब्दरचना :- तुषार खांबल
 
परशुराम शिवलकर…. म्हणजेच आबा शिवलकर… जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील, घरातूनच कलेचा वारसा लाभलेले आबा 70 च्‍या दशकात दशावतारामधुन नाव गाजवीत होते.
 
उंच धिप्पाड आणि रांगडा व्यक्तिमत्त्व असलेल्या आबांनी अनेक दशावतारात असुरांच्या भूमिका उत्तमरीत्या साकारल्या होत्या. ‘गजासुरचा वध' या नाटकातील त्यांची भूमिका तर खुप लोकप्रिय होती. त्यांचें नाव फलकावर लागलें की प्रयोग "हाऊसफुल" होणार हे निश्चित असायचे.
 

विषय: 

काळ आला होता पण वेळ नाही...

Submitted by रवींद्र दत्तात्... on 25 May, 2020 - 08:45

रात्रपाळीवर असतांना एकेदिवशी झोपेतच सुट्‌टी झाली असती...डायरेक्ट तिकीट जवळ-जवळ कापलंच गेलं हाेतं...कुणास ठाऊक एकाएकी कशी काय जाग आली...

ती सीमेंट फॅक्ट्री होती... मी स्टीम इंजीनमधे फायरमेन होतो...आमचे इंजीन ड्रायव्हर रेल्वे मधून सेवानिवृत्त झालेले ड्रायव्हर होते...

फॅक्ट्री ते एक्सचेंज यार्ड...तेरा किलोमीटरचं सेक्शन होतं....

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

शौच - सकाळी, रात्री कि प्रेशरनुसार? पाश्चात्य कि भारतीय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2020 - 17:56

हा धागा टवणे सरांच्या आंघोळ धाग्यातील चर्चेच्या ओघात विषय आला म्हणून स्वतंत्र चर्चेला घेतला असला तरी विरंगुळा वा विडंबन या कॅटेगरीत चर्चा अपेक्षित नाही. झाल्यास हरकतही नाही.

लहानपणापासून मनावर ठाम कोरलेले की सकाळी उठल्यावर दात घासायचे, मग टू नंबरला जायचे, मग आंघोळ आणि त्यानंतर न्याहारी. कॉलेजला जाईस्तोवर यात कधीही खंड पडला नाही. जे लोकं कधीही प्रेशर आले की जायचे ते मला बेशिस्त वाटायचे. एक भाऊ होता जो रोज रात्री झोपायच्या आधी जायचा त्याला मी शौचालयातले घुबड असे नाव ठेवले होते. एकूणच कुठली वेगळी सिस्टम मला पटलीच नव्हती.

विषय: 
शब्दखुणा: 

मोठी हो म्हणावंसं वाटत नाही

Submitted by अजिंक्यराव पाटील on 22 May, 2020 - 01:08

नाजूक निळे डोळे
शोधतात कुणाला,
श्वासांमागचे निःश्वास
बोलवतात कूणाला..

निरागस भाव किती,
झाले डोळ्यात गोळा,
चाफेकळी नाक ते
कित्येकांना लावे लळा...

का कुणास ठाऊक,
तू अशीच राहावीस वाटते..
कसं सांगू तुला दुनियेत,
काळोखी कशी दाटते...

बरबटलेल्या दुनियेत तुला,
हे लोक लहान राहु देणार नाहीत
पण खरं सांगु पोरी तुला,
मोठी हो म्हणावंसं वाटत नाही..

राव पाटील!

विषय: 
शब्दखुणा: 

पुस्तक

Submitted by शोधयात्री...... on 21 May, 2020 - 00:43

रडले कि तू आठवतोस
हसले कि तू आठवतेस
विचारातही तूच असतोस
कृतीतही तूच घडतोस

मनात तू कायम साठून राहतोस
भावनांमध्ये दाटून येतोस
वळणावळणा वर खुलवत राहतोस
जगणे हे माझे फुलवत राहतोस

कोणीच नसले तरी तू असतोस
काहीच नसले तरी तूच दिसतोस
टप्याटप्यावर जाणवत राहतोस
क्षणाक्षणाला खुणवत राहतोस

कधी डोळ्यात पाणी ,कधी ओठात हसू
नकळत सगळ्यांना रमवत राहतोस
पुस्तका असा कसा रे तू ???
अलगद तुझ्याच दुनियेत घेऊन जातोस

विषय: 

खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व.. (यूट्युब आणि इंन्स्टा)

Submitted by निरु on 19 May, 2020 - 23:43

खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व..
(यूट्युब आणि इंन्स्टा)

अनन्या

Submitted by Charudutt Ramti... on 19 May, 2020 - 13:38

‘अनन्या’ रात्री बराच वेळ उशीवर निपचित डोकं ठेवून आणि छताकडे शून्यात नजर लावून निश्चल पणे अंथरुणावर पडली होती. अविरत पणे फिरत असलेल्या पंख्याच्या अस्थिर पात्यांच्या पारदर्शी वर्तुळाकडे एक…टक…पहात. निर्विकार भावनेने. नक्की कितीवेळ? ते तिलाच माहिती नव्हतं. कदाचित तासभर तरी सहज झाला असेल. तासभर कसला? चांगले दीडेक तास सुद्धा उलटून गेले असतील. मानेला आणि खांद्याला मुंग्या याव्यात असं काहीतरी झालं अनन्याला. बराच वेळ एकाच स्थितीत अवघडल्या सारखी पडून राहिल्यामुळे.

विषय: 

आईचे पत्र

Submitted by मंगलाताई on 19 May, 2020 - 09:41

एक आई व्रुद्धाश्रमातून स्वतःच्या मुलाला पत्र पाठवते. फोनला उत्तर देते.
चिरंजीव,..............
कसा आहेस. कालपरवा तुझा फोन आला होता आश्रमात. मला ऑफिसमधली क्लार्क सांगत होती . आमची केअरटेकर आली होती मला बोलवायला ,पण काठी शोधून चष्मा काढून खोलीबाहेर पडेस्तोवर तू फोन ठेवलास. मला फक्त तुझा निरोप मिळाला.

शब्दखुणा: 

माझा लाँकडाऊन मधील प्रवास

Submitted by मंगलाताई on 19 May, 2020 - 09:37

मी मार्चमध्ये पुण्यात मुलाकडे सहज गेले आणि तिथेच अडकले लाँकडाऊन मुळे.9 मेला रात्री 9:00 वाजता आम्ही दोघे कारने पुण्याहून निघालो. पूणे शहर ,चाकण, शिरूर, औरंगाबाद, जालना, सिंदखेडराजा, सुलतानपूर, मालेगाव,वाशिम, अमरावती, नागपूर असा प्रवास करत दुसर्या दिवशी साडेअकराच्या सुमारास घरी पोहचलो
ड्रायव्हर गोरोबा टेकाळे (पुणे) अतिशय निष्णात ,गंभीर व्यक्तीमत्व. त्यांच्याशी गप्पा करत आम्ही सुखरुप पोहचलो.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर