अवांतर

मी चुप्प

Submitted by तन्मय शेंडे on 25 August, 2012 - 20:29

कविता - 'मी चुप्प'

येताना खुपत
जाताना बोचत
कितीही दुखलं तरी मी चुप्प !!

स-दैव सुज्ञ
विचारात महात्म्य
घर जळलं तरी मी चुप्प !!

संस्कृती दक्ष
केल लक्ष
झालो भक्ष तरी मी चुप्प !!

रांगेत सुस्त
प्रगतीचा अस्त
सगळच फस्त तरी मी चुप्प !!

मंत्र्यानचं तंत्र
हाती जातीचा मंत्र
केल माझ यंत्र तरी मी चुप्प !!

दाखवलं संत्र
हेच हल्लीच सूत्र
मोडक्या स्वप्नांची रात्र तरी मी चुप्प !!

करून कष्ट
शून्य प्राप्त
वेळ समाप्त तरी मी चुप्प !!

पाणी लुप्त
वीज गुप्त
सारे होती असे आसक्त तरी मी चुप्प !!

गप्प, गप्प
आवाज ठप्प
मजले गर्दीत हुप्प तरी मी चुप्प !!

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

Submitted by ज्योति_कामत on 25 August, 2012 - 12:21

बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

विषय क्र. १ -- पिच्चर देखेंगे क्या?

Submitted by नंदिनी on 24 August, 2012 - 02:27

"तुम्ही सिनेमा का बघता?" मास मिडीयाच्या कोर्समधे विचारलेला हा असाच एक प्रश्न. कुणी म्हणे टाईमपास, कुणी म्हणे कलासक्तता, कुणी म्हणे मनोरंजन. माझ्या मते, तरी मला आवडतं सिनेमा बघायला म्हणूनच मी बघते. त्यासाठी कसल्याच लेबलची आवश्यकता मला वाटत नाही. बरं सिनेमा पहायचा म्हणजे तो उच्च अभिरूचीसंपन्न वगैरे हवा अशी माझी अपेक्षा कधीच नसते. उलट सिनेमा जितका जास्त फालतू, तितका तो बघण्याची मजा अजून जास्त. Happy

विषय: 

नेताजींचे काय झाले?

Submitted by षड्जपंचम on 21 August, 2012 - 02:21

नेताजी सुभाषचंद्र बोस हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला एक ज्वलंत आणि तेजस्वी अध्याय म्हणता येईल. ते फक्त एक सच्चे देशभक्त नव्हते तर एक क्रांतिकारी, जनसामान्यांपर्यंत पोच असलेले आणि भविष्याचा विचार करणारे सुधारणावादी नेते होते. ते एक असे नेते होते की ज्यांना जाती, धर्म, भाषा इ. बंधने तोडून लोकांनी स्वीकारले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक स्वतंत्र सेना स्थापून मोठ्या स्तरावर ब्रिटीशांशी युद्ध पुकारणारा हा पहिलाच नेता!

सार्वजनिक गणपती वर्गणी

Submitted by टकाटक on 18 August, 2012 - 07:15

सध्या सार्वजनिक गणपती वर्गणी गोळा करण्याचे काम जोरात चालु आहे पण वर्गणीच्या नावाखाली खुप गुन्डागर्दी चालु आहे ते योग्य नाही. वर्गणी ही आपल्या मनाप्रमाणे द्यायची असते हे लोक विसरलेले दिसतात; वर्गणी मागतात की खन्डणी हेच कळत नाही. शिकलेले लोक सुदधा अडाण्याप्रमाणे वागतात. दुस-यान्च्या आर्थिक परीस्थितीचा विचार करत नाहि. कमी वर्गणी दीली तर भान्डायला लागतात.

विषय: 
प्रांत/गाव: 

सोसायटीचे अकाउंट्स आउटसोर्स करण्यासंबधी

Submitted by मी अमि on 15 August, 2012 - 13:40

काही सोसायट्यांमध्ये अकाउंट्स बनवण्याचे काम आउटसोर्स केले जाते, असे ऐकण्यात आहे. ज्याला outsource केले जाते तो टॅलीमध्ये अकाउंट्स मेंटेन करतो. तो जेव्हा गरज पडेल तेव्हा सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना भेटून आवश्यक माहिती देतो/ घेतो. (म्हण्जे कायम स्वरूपी सोसायटीच्या कार्यालयात बसत नाही).

माझ्या भावाच्या सोसायटीत अशा व्यक्तीची नेमणूक करायची आहे. अशा प्रकारे अकाऊट्सचे काम करणारी व्यक्ती माहित असल्यास क्रूपया सांगा. सोसायटी माहिममध्ये आहे.

गणेशोत्सव २०१२: पूर्वतयारी आणि सूचना

Submitted by संयोजक on 14 August, 2012 - 17:34

मायबोलीकरांनो,

यंदाच्या गणेशोत्सवाला आता फक्त एक महिना राहिला आहे. संयोजक मंडळानी जोरदार तयारी सुरु केली आहे. तुमच्याकडूनही सूचनांचे स्वागत आहे.

अहंकार...

Submitted by बागेश्री on 10 August, 2012 - 08:04

तो घरात येताच नोकरावर ओरडला,
"ए, बघतोस काय माझे बूट काढ"

पत्नी तिथे येऊन विचारती झाली,
"कधीपासून तुम्हांला विचारावे म्हणते, तुम्ही रोज कुठे जाता, की तुमचे बूट इतके बरबटतात.. पाऊस पाणी नसताना बुटांना चिखल कसा लागतो, आणि हा चिखल असा रंगबिरंगी, आकर्षक कसा?"

मोठ्याने हसत, उर्मटपणे तो म्हणाला,
"हे जाणून घेण्याची गरज तुला काय? माझ्या मोठ्या पदामुळे, आलेली सत्ता, संपत्ती हे सगळे तू उपभोगायचे आणि आनंदी रहायचे..."
ताड ताड पाऊलं टाकत तो आपल्या खोलीत निघून गेला...

नोकराला त्याच्या बाईसाहेबांची विमनस्क स्थिती पाहवली नाही, तो खालमानेने उत्तरला,
"बाई,

विषय: 

अवान्तर [२] : मनातलं :(२,३): २९ ऑगस्ट २०१२ : ध्यानचंद यांचा आज जन्म दिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन

Submitted by मी-भास्कर on 9 August, 2012 - 08:38

अवान्तर [२] : मनातलं : (२,३):
२९ ऑगस्ट २०१२ : ध्यानचंद यांचा आज जन्म दिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन

१५ ऑगस्ट १९३६ या दिवशी भारताच्या हॉकी संघाने म्युनिक येथे ऑलिंपिक्समध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम केल्याचे मी १५ ऑगस्ट २०१२ ला , १५ ऑगस्ट ची आणखी एक संस्मरणीय घटना म्हणून येथे लिहिले होते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर