मी चुप्प

Submitted by तन्मय शेंडे on 25 August, 2012 - 20:29

कविता - 'मी चुप्प'

येताना खुपत
जाताना बोचत
कितीही दुखलं तरी मी चुप्प !!

स-दैव सुज्ञ
विचारात महात्म्य
घर जळलं तरी मी चुप्प !!

संस्कृती दक्ष
केल लक्ष
झालो भक्ष तरी मी चुप्प !!

रांगेत सुस्त
प्रगतीचा अस्त
सगळच फस्त तरी मी चुप्प !!

मंत्र्यानचं तंत्र
हाती जातीचा मंत्र
केल माझ यंत्र तरी मी चुप्प !!

दाखवलं संत्र
हेच हल्लीच सूत्र
मोडक्या स्वप्नांची रात्र तरी मी चुप्प !!

करून कष्ट
शून्य प्राप्त
वेळ समाप्त तरी मी चुप्प !!

पाणी लुप्त
वीज गुप्त
सारे होती असे आसक्त तरी मी चुप्प !!

गप्प, गप्प
आवाज ठप्प
मजले गर्दीत हुप्प तरी मी चुप्प !!

जन्माचंच कुत्र
मुतायला पण भीतं
काढलीयेत लक्तरं तरी मी चुप्प !!

मूल्य जप्त
भ्रष्टाचार मुक्त
मी अशक्त म्हणून देव चुप्प !!

पैशाचे भक्त
पिऊन रक्त
मोडले तक्त तरी मी चुप्प !!

- तन्मय -
२५/०८/२०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केल माझ यंत्र तरी मी चुप्प !!>>>>खरय हे,
आपल्या भावना समजल्या,ठीक आहे कविता.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!

तन्मयजी, हे काव्य वेगळ्या बाजाचे व सुंदर शैलीचे आहे.
परंतू काही काही ठिकाणी किरकोळ चुका आहेत. साहित्यीक विचारसरणी महत्वाची मानुन---

कवितेच्या सातव्या कडव्यापर्यंत खुप छान आहे. परंतू नंतर ---

श्वासासाठी घेतलाय कर्ज तरी मी चुप्प !!

मी अशक्त म्हणून देव चुप्प !!

मारली खोलून चक्क ... तरी मी चुप्प !! ...इत्यादी ओळी या तुमच्या सुंदर काव्याला त्या-त्या संदर्भानुसार रुचणार्‍या नाहीत.

कृ.गै.न.

विभाग्रज - धन्यवाद !

सुधाकर -
प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
वरील नमूद केलेल्या ओळी या काव्याला त्या-त्या संदर्भानुसार रुचणार्‍या नाहीत. आजून स्पष्टीकारण दिल्यास सुधारायला मदत होईल.

मी काही बदल म्हणून खालील ओळी देत आहे. पहा. व आपले मत कळवा.

पाणी लुप्त
वीज गुप्त
सारे होती असे आसक्त तरी मी चुप्प !! ..इथे 'मूल्य जप्त' ही आपलीच एक ओळ लागू होतेय. Happy

गप्प, गप्प
आवाज ठप्प
मजले गर्दीत हुप्प तरी मी चुप्प !!

पैशाचे भक्त
पिऊन रक्त
मोडले तक्त तरी मी चुप्प !!