शहरीकरणाच्या लाटेमध्ये टुमदार घर, बंगला इत्यादी संकल्पना आता कालबाह्य होऊ लागल्या आहेत. आजकाल तर स्वप्नात सुद्धा बंगला परवडत नाही. पोर शिकून कमवायला लागलं की त्याचं पहिलं स्वप्न असतं एक छानसा फ्लॅट! मध्यम वर्गीय पोराचं स्वप्न.. इतकंच परवडू शकतं. माझ्या माहितीतल्या समस्त मित्र व नातेवाईकांनी त्यांच्या कुवतीनुसार किमान एखादातरी फ्लॅट घेतलेला आहे. 1BHK असो वा 4BHK असो.. प्रत्येकाला आपापल्या फ्लॅटचे प्रचंड अप्रूप असते. क्षेत्रफळात फरक असला तरी मालकीहक्काच्या भावनेत नसतो. पुलंच्या शत्रूपक्षात सर्वांची टुमदार स्वतंत्र घरं होती. आमच्या पिढीत मात्र प्रत्येकाची ओळख ही विंग आणि फ्लॅट नंबरनेच होते.
काही सोसायट्यांमध्ये अकाउंट्स बनवण्याचे काम आउटसोर्स केले जाते, असे ऐकण्यात आहे. ज्याला outsource केले जाते तो टॅलीमध्ये अकाउंट्स मेंटेन करतो. तो जेव्हा गरज पडेल तेव्हा सोसायटीच्या पदाधिकार्यांना भेटून आवश्यक माहिती देतो/ घेतो. (म्हण्जे कायम स्वरूपी सोसायटीच्या कार्यालयात बसत नाही).
माझ्या भावाच्या सोसायटीत अशा व्यक्तीची नेमणूक करायची आहे. अशा प्रकारे अकाऊट्सचे काम करणारी व्यक्ती माहित असल्यास क्रूपया सांगा. सोसायटी माहिममध्ये आहे.
भाग ३
श्री
जोशी काका : सर्वानी शांत रहा पाहु, किती गोंगाट, मासळी बाझार आहे नुसता.
माळवणकर आजी : तुम्हाला कसे माहित मासळी बाझारा चा गोंगाट, तुम्ही कधी गेला होता ?
जोशी काका : तुम्ही पहिल्यांदा शांत रहा हो, मासळी बाझारा चा गोंगाट अनुभवण्या साठी तेथे जायलाच हवे का ? असो, आज आपण येथे सर्व जण ३१ डिसेंबर च्या सेलिब्रेशन च्या रुपरेषा ठरवण्यासठी जमलो आहोत.
मेहरा वहिनी : पर ईतने जल्दि क्यो ? ३१ दिसंबर को तो अभी बहुत वक्त हैं.
http://www.maayboli.com/node/21530
(भाग १)
====================
श्री
-: भाग २ :-
:- दुस-या दिवशी :-
सौ : कसे आहात मेहरा वहिनी.
मेहरा वहिनी : चंगी हु, आप कैसे ?
सौ : मी पण चंगी, काय विषेश ?
मेहरा वहिनी : काही नाही.
सौ : भावजी नाही आलेत मिटींग ला ?
मेहरा वहिनी : ऑफिस में बहुत काम है, इस लिए नही आए. (मनात : ईसे क्या करना है)
सौ : पण आज तर रविवार आहे ना. (मनात : दारु ढोसत बसला असणार, नाही तर त्या भटक भवानी च्या पाठी शेपुट हलवत फिरत असणार, ती भटक भवानी पण कुठे दिसत नाहिए.)
मेहरा वहिनी : बहुत काम है, इस लिए आज भी बुलाया है.
सौ : रोझी ला बघितलत का तुम्ही ? (मुद्दाम)
बरेच दिवस मनात होतं, काही तरी लिहायचे, पण काय लिहु, ते ठरत नव्हतं, मग ठरवलं कि आजु बाजु जे घडतंय ते लिहावं आणि एकदम मनात आलं कि आपल्या Society (पुर्वी आम्ही चाळ म्हणत होतो) वर लिहुया काही, फार Potential आहे ईथे घटनांची.
एक भाबडा प्रयत्न.
श्री
-: भाग १ :-
सौ : अहो, ऐकलं का.
मी : हम्म्म्म, बोला.
सौ : मी काय म्हणते, शॉपिंग ला जाऊ या ?
मी : वाटलंच मला. का ? आताच तर पैशे ऊडवुन झालेत ना दिवाळी ला, मग परत एव्ह्ढ्या लवकर, लोकं फटाके उडवतात दिवाळी ला, तुम्ही पैशे उडवलेत.
सौ : अहो, ती बाजुची मेहरा आहे ना .....
मी : काय घेतलं तिने ?
सौ : अय्या तुम्हाला कसे कळ्ळे ?