नेताजींचे काय झाले?

Submitted by षड्जपंचम on 21 August, 2012 - 02:21

नेताजी सुभाषचंद्र बोस हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला एक ज्वलंत आणि तेजस्वी अध्याय म्हणता येईल. ते फक्त एक सच्चे देशभक्त नव्हते तर एक क्रांतिकारी, जनसामान्यांपर्यंत पोच असलेले आणि भविष्याचा विचार करणारे सुधारणावादी नेते होते. ते एक असे नेते होते की ज्यांना जाती, धर्म, भाषा इ. बंधने तोडून लोकांनी स्वीकारले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक स्वतंत्र सेना स्थापून मोठ्या स्तरावर ब्रिटीशांशी युद्ध पुकारणारा हा पहिलाच नेता!

नेताजींच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले गेले आहेत. अर्थातच, नेताजींच्या तथाकथित मृत्यूनंतरही देशाचे अनेक वर्षे नेताजींवर तेवढेच प्रेम होते. परंतु नेताजींचं काय झालं याची पक्की माहिती कधीच जनतेला मिळाली नाही. ती मिळाली नाही का मिळू दिली गेली नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम मिशन नेताजी नावाची एक संस्था करत आहे . काही पत्रकार व ह्या विषयावर खरी माहिती मिळवण्याची इच्छा असणारे लोक ह्या संस्थेत आहेत. ह्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नेताजींच्या बाबतीत १८ ऑगस्ट १९४५ नंतर काय झालं ह्याची खरी माहिती भारत व इतर देशांच्या सरकारांकडून मिळवणे व ती जनतेसमोर आणणे.

कुतूहल म्हणून ह्या संस्थेच्या संकेतस्थळावर गेल्यावर बरीच काही माहिती मिळते. ह्या विषयावर थोडे वाचन केल्यावर जाणवते, की भारत सरकारला ह्या विषयावर जास्त चर्चा झालेली नकोच आहे. किंबहुना भारत सरकारने वेळोवेळी हा प्रश्न तापू न देण्याचाच प्रयत्न केलेला आहे.

नेताजींनी देशासाठी काय काय केलं ह्यावर बरेच ग्रंथ आणि लेख लिहिले गेले आहेत. नेताजींनी ब्रिटीश साम्राज्याविरोधी शक्तींची मदत घेऊन भारताला कायमच आणि संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचे स्वप्न पाहिलं. ते प्रथम जर्मनीला गेले. तिथे जर्मनीची मदत मिळवली. जर्मनीची युद्धात माघार सुरु होताच त्यांनी जपान ला प्रयाण केलं व जपान ची मदत मिळवली. ह्या दोन्ही देशांनी नेताजींना दिलेली मदत पाहता त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाची कल्पना येते. एकट्याच्या जिवावर दोन महाशक्तिशाली देशांची मदत मिळवणे आणि एक मोठी फौज तयार करणे, हे असामान्य प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याशिवाय जमूच शकत नाही. नेताजींच्या चाणाक्ष मनाने बऱ्याच गोष्टींचा अंदाज घेतला होता. दुसऱ्या महायुद्धात जपानची अवस्था बिघडल्यावर जगाच्या पाठीवर असा एकाच देश उरला होता की जिथे इंग्लिश आणि अमेरिकन वर्चस्व सहजासहजी पोहोचू शकत नव्हते. सोविएत रशिया. भारतीय स्वातंत्र्ययुद्ध जपानमधून जास्त काळ सुरू ठेवणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत नेताजींनी रशियास जायचे ठरवले असे म्हणतात. जपाननेही त्यांना ह्यासाठी मदत केली होती. प्रचलित समजानुसार विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

नेताजींच्या मृत्यूच्या चौकशी साठी सरकारने अनेक कमिट्या नेमल्या. पण मिशन नेताजी ह्या साईट प्रमाणे बऱ्याच नेताजी-प्रेमींनी हेच म्हणलंय की ह्या कमिट्यांनी कधीही पूर्ण समाधान करणारे पुरावे सादर केले नाहीत. किंवा त्यांना करू दिले गेले नसावेत.

परंतु बऱ्याच नेताजी प्रेमींनी हे कधीच मान्य केले नाही. पुराव्यांचा विचार करता हा अपघात आजच्या तैवान मध्ये झाला, पण तैवान ने म्हणले आहे की असा अपघात कधीच झाला नव्हता. नेताजींनी सुरक्षित पणे निसटावे म्हणून त्यांनी व जपानी अधिकार्यांनी हा बनाव रचला. तैवानच्या माहितीनुसार १८ ऑगस्ट ला तैवान मध्ये कुठलाही विमान अपघात झाला नव्हता. जपानी अधिकाऱ्यांनी इतकेच सांगितले की जो देह नेताजींचा म्हणून आणला होता त्याचा चेहरा इतका बिघडला होता की छातीठोकपणे हे कुणीच सांगू शकत नव्हते की हे नेताजी आहेत, वस्तुत: अपघात १८ ऑगस्ट ला झाला आणि जगाला ह्याची माहिती २३ ऑगस्ट ला मिळाली. ५ दिवस का लागले हा प्रश्न बऱ्याच लोकांना सतावतो. नेताजींच्या पत्नी एमिली बोस ह्यांनी सुद्धा हेच म्हणले आहे की नेताजी रशियाला पोचले होते. तिथे ते स्टॆलिन ची मदत मिळवण्याच्या प्रयत्नात होते. आजपर्यंत रशियात त्यांचे काय झाले ह्याची पुराव्यानिशी माहिती कधीच मिळू शकली नाही.

मिशन नेताजी मधील पत्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे रशिया कडे नेताजींच्या बाबतीत काही classified फायली आहेत व त्या रशियाने कधी जगासमोर आणल्या नाहीत. भारताकडेही नेताजींच्या बाबतीत बऱ्याच फायली असून त्या ' सुरक्षेच्या दृष्टीने अति-महत्वाच्या' ह्या कारणास्तव भारत सरकार ने त्या कधीही समोर आणल्या नाहीत. ह्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भारत सरकारने ताबडतोब थांबवले. सी आय ए च्या अहवालांनुसार १९५० मध्ये बोस जिवंत होते व ते भारतात येण्याचा प्रयत्न करत होते. याबद्दलची सी आय ए ची कागदपत्रे मिशन नेताजी वाल्यांनी मिळवली व ती साईट वर आत्ता उपलब्ध आहेत. सी आय ए ने नंतरही एकदा बोस जिवंत असल्याचे म्हणले होते असे वाचनात आले आहे. ही साईट असेही म्हणते की भारताच्या इंटेलिजन्स ब्युरो चाही हे प्रकरण दडपण्यात मोठा सहभाग होता. मिशन नेताजी संकेतस्थळावरील माहितीचा विचर केला तर, सध्याच्या राष्ट्रपतीं सकट भारताच्या बऱ्याच राजकारण्यांना ह्या प्रकरणाची माहिती होती.

दुसरे महायुद्ध संपल्यावर सुभाषबाबू युद्ध-गुन्हेगारांच्या यादीत गेले. भारतानेही ह्याला मान्यता दिली आणि कधीही त्यांचे नाव त्या यादीतून काढण्याचे प्रयत्न केले नाहीत ! गांधींशी वाद झाल्याने सुभाषबाबूंना निवडून येऊन सुद्धा राष्ट्रीय सभेचा चा राजीनामा द्यावा लागला होता हे सर्वज्ञात आहे. सुभाषबाबू जहाल मतवादी होते, आणि शांततेची कबुतरे उडवून राष्ट्र सुरक्षित राहत नाही हे मानणार्यातले होते. त्यामुळे भारत सरकारचा उदासीन दृष्टीकोन फारसे अप्रूप वाटण्यासारखा नाही. हेही वाचले आहे, की भारतात येण्याबाबातीत प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नेहरूंना नेताजींनी एक पत्र लिहिले होते. ते पत्र खरेच गेले होते का, ते काय होते व त्या पत्राचे काय झाले कुणास ठावे? नेताजींच्या बाबतीत ब्रिटन कडेही काही कागदपत्रे असून 'परराष्ट्र संबंधाच्या दृष्टीने महत्वाची' ह्या कारणास्तव त्यांनी ती कधीही समोर आणलेली नाहीत.

रशिया नंतर नेताजींचे काय झाले ह्याबाबत पक्की माहिती नाही. भारतात सरळ मार्गाने येणे अशक्य होते. कारण ते ठरले युद्ध-गुन्हेगार, तेही भारताने राजमान्य केलेले! साहजिकच गुप्तहेर संस्था त्यांच्या पाळतीवर ! त्यामुळे असे मानले जाते की त्यांचा रशियातच मृत्यू झाला असावा. ह्याबाबतीत केजीबी ला माहिती असल्याचे सांगितले जाते. एक मात्र खरं की त्यांच्या येण्याने बर्‍याच लोकांची अढळपदे ढळायची शक्यता होती.

दुसरा तर्क म्हणजे ते भारतात लपून छपून नेपाळमार्गे आले असावेत आणि गुप्त स्वरुपात राहिले असावेत. गुप्तपणे नजरेतून निसटणे हे त्यांना नवीन नव्हते. इंग्रजांच्या तावडीतून निसटून ते अनेक देश फिरले होतेच. भारतात सरळ मार्गाने येणे अशक्य होते. यामुळे त्यांना एक तर भारतात लपून ओळख बदलून येणे हा एकाच पर्याय असावा. हा समज विश्वसनीय मानणाऱ्या लोकांचा पुरावा म्हणजे म्हणजे गुमनामी बाबा. उत्तर प्रदेशात फैझाबाद येथे गुमनामी बाबा नावाचे साधू अचानक प्रकटले. ते कुठून आले ह्याची कुणालाही कल्पना नाही. ते एकटे एकटे राहणारे होते व लोकांमध्ये मिसळत नसत. ते बंगाली होते. त्यांना मोजक्याच व्यक्ती भेटण्यास येत असत व ते त्यांच्याशी पडद्याआडून बोलत असत. ह्या बाबांबद्दल लोकांना संशय होता की हे नेताजी आहेत. त्या बाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडील सामानात नेताजींचे अनेक खासगी फोटो, पत्रे आणि पुस्तके सापडली. एका मान्यताप्राप्त त्रयस्थ हस्ताक्षर तज्ञाने त्यांचे हस्ताक्षर नेताजींशी जुळत असल्याचे सांगितले. भारत सरकार ने लगेच दुसरा हस्ताक्षर तज्ञ नेमला आणि त्याचे हे विधान खोटे ठरवले. एका साधू कडे नेताजींचे खासगी दुर्मिळ फोटो आणि विविध जागतिक विषयांवरची इंग्रजी पुस्तके असण्याचा काय संबंध असावा हेही गुलदस्त्यात आहे. १९९९-२००५ मध्ये नेमलेल्या मुखर्जी कमिशन ने हे मान्य केले की विमान अपघात झालाच नव्हता. कारण, त्या काळाच्या लोकांना तसेच तत्कालीन तैवानी वृत्तपत्रांना अपघाताची काहीही खबर असल्याचे दिसले नाही. [मुखर्जी कमिशन चा अहवालच शेवटी सरकारने अमान्य केला! ] परंतु गुमनामी बाबा हे नेताजी असल्याचे मुखर्जींनी त्यांच्या रिपोर्ट मध्ये अमान्य केले. त्या साधूंची DNA टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. ह्याच मुखर्जींनी नंतर एका व्हिडिओ मध्ये मान्य केले आहे की त्यांना गुमनामी बाबा हे नेताजीच असल्याचे वाटत होते.

नेताजी जिवंत असतील तर समोर का आले नाहीत हा प्रश्न काही लोक विचारतात. पण हाही विचार केला पाहिजे की ते जरी जिवंत असतील आणि बऱ्याच काळानंतर भारतात परतण्यात यशस्वी झाले असतील, तरीही समोर येणे इतके सहज शक्य नव्हते. एक म्हणजे भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते, त्यामुळे ज्या उद्दिष्टासाठी ते लढले ते महायुद्ध् आणि आझाद हिंद फौजेच्या प्रभावामुळे का होईना साध्य झाले होते. तसेच त्यांना भारत सरकारने स्वत:च युद्धगुन्हेगार ठरवले असल्याने गुप्तचर यंत्रणा त्यांच्या पाळतीवर असणार. त्यांचे ताबडतोब हस्तांतरण होण्याची शक्यता असणार. स्वातंत्र्यानंतर २० - २५ वर्षांनी प्रकट होऊन देश हातात घेणे सुद्धा इतके सरळ नव्हतेच. त्यामुळे फक्त खळबळ माजली असती. स्वत:च्याच देशवासियांमध्ये गोंधळ निर्माण करायची त्यांना कदाचित आवश्यकता वाटली नसेल. मंत्रालयात असणारे पण स्वत:चेच कधी काळाचे साथी त्यांच्या सोबतीला उभे ना राहिल्याने वेळ खूप बदललेली होती. आझाद हिंद फौजेचा विरोध करणाऱ्या लोकांनी, नंतर देशभर गाजलेल्या त्या खटल्याच्या जिवावर प्रतिष्ठा मिळवून घेतली. नेताजी एक सच्चे देशभक्त होते. मी हे मिळवून दिलं, हे ओरडून ओरडून सांगण्यापेक्षा देशाला हे मिळालं ह्याचे समाधान मानणारयातले ते होते.

ही गोष्ट स्पष्ट आहे की नेताजी फक्त भारताच्याच नाही तर जागतिक राजकारणातील एक असामान्य व्यक्ती होते. जर्मनी, जपान इ. देशांनी त्यांची खास बडदास्त ठेवण्याचे कारण काय? भारताव्यतिरिक्त ब्रिटन, जपान, रशिया, अमेरिका ह्या सर्व सरकारांकडे त्यांच्याबाबतीत इतक्या साऱ्या गुप्त फाईल्स असण्याचे कारण काय?

नेताजींच्या अचानक पडद्यामागे जाण्यावर अनेक पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत. ह्या विषयावर माहितीची इच्छा असलेल्यांनी missionnetaji.org ला भेट द्यायला हरकत नाही. तेथे बरीच माहिती, दस्तऐवज आणि पत्रे सविस्तर स्वरूपात आहेत. शेवटी हा जुने-पाने उकरून काढायचा नाही, तर आपल्या आवडत्या नेत्याचे काय झाले ह्या बाबतीत माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. खरे खोटे शोधून खाढणे अतिशय अवघड असले, तरी कुणीतरी ह्यावर काम करतंय ह्याची जाणीव असणे आवश्यक !

टीप: वरील सर्व माहिती इंटरनेट वरून घेतली आहे. अधिक माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे. ह्या विषयावर पुस्तके सुद्धा विक्रीसाठी इंटरनेट वर उपलब्ध आहेत. अनुज धार ह्या लेखकाची पुस्तके शोधावीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख. पण आज ही माहीती मिळवून आपण काय मिळवणार हा प्रश्न आहेच. कारण 'सत्यमेवजयते' हे फक्त पाटीवर लिहून टांगण्यापुरतेच वापरावे हेच आयुषभर शिकत आलोय. Sad

.

षड्जपंचम
लेख चांगला आहे. तुम्ही ज्या संकेत स्थळाबद्दल बोलत आहात त्याचा दुवा द्याल का?
मी काही वर्षांपुर्वी एक पुस्तक वाचले होते, नाव आठवत नाही, त्यामधे नेताजी परत येतात आणि ते खरचं नेताजी आहेत की त्यांचा तोतया हे एक रॉ एजंट शोधत असतो असं काहीसं आहे. कोणाला नाव माहित असल्यास सांगाल का? पुन्हा वाचायची ईच्छा (? कसे लिहावे?) आहे.
आणि
अतिसामान्य प्रभावशाली व्यक्तिमत्व >>> की असामान्य प्रभावशाली व्यक्तिमत्व??
माफ करा, तुमची चुक दाखवण्याचा उद्देश नसुन मला खरचं प्रश्न पडला आहे Happy

माधवी_नयनीश, धन्यवाद.. फारच बावळट चूक होती. दुरुस्त केलीय.
संकेतस्थळ लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात नमूद केले आहे. मिशन नेताजी म्हणून गूगल वर शोधा.

खूप छान लेख, नेताजी म्हणजे दुखरी नस...! नेहरूही सुभाश्बाबुंच्या प्रभावाखाई होते, परंतु पंतप्रधान व्हायचे असेल तर गांधीशिवाय पर्याय नाही असे त्यांना मोतीलाल नेहरूंनी सांगितले आणि त्यांनी नेताजींची साथ सोडली, असे विश्वास पाटील यांच्या " नेताजी" पुस्तकात आहे.
भारताच्या इतिहासात अनेक दुखरी पान आहेत, त्यातले अग्रणी नेताजी. आपल्या राजकारण्यांनी त्यांना न्याय दिला नाही परंतु आजही ते जिवंत असावेत असे मनोमन लोकांना वाटते, यातच सारे आले.

सात दशकानन्तरही सत्य काय आहे हे कळायला मार्ग नाही. सम्पुर्ण सत्य बाहेर यावे आणि या विषया बद्दलची सर्व कागदपत्रे जनतेच्या समोर ठेवायला हवे असे मनापासुन वाटते.

आज झी टीव्हीवर एकच पत्र दाखवलय, जर अशी पत्र देशा समोर आली तर गत काळातील भारताच्या नेत्याची जनमानसातली प्रतिमा पार धुळीला मिळेल.

" त्यात एका गुलाबचंदची प्रतिमा तर पार कलंकीत होईल. "

शेतकर्यांच्या प्रश्नावरुन देशाच्या जनतेचे लक्ष वळवण्यासाठीच हे असले प्रसिद्दीला देत आहे
सरकार मधे दम असल्यास फायली सार्वजनिक कराव्यात आणि रोजचा तमाशा खेळणे बंद करावे

खूप छान माहितीपूर्ण लेख .. नेताजिंबाबाद असे माहितीपूर्ण काहीतरी वाचायचे होते कधीचे. Happy __/\__ धन्यवाद ..

भारताच्या स्वातंत्र्यावर नेताजींचा प्रभाव किती होता ते सांगणारे श्री अजित डोवल यांचे हे भाषण जरूर पाहवे.. (अजित डोवल कोण सगळ्यांना अर्थात माहित असतीलच, नसल्यास आधी ते अगोदर गुगलावे आणि मग हे पाहावे अशी विनंती, जेणेकरून त्याचे महत्व आणि तथ्य कळेल)

https://www.youtube.com/watch?v=SKpl7v_c-Qo

इवान,
सरकार मधे दम असल्यास फायली सार्वजनिक कराव्यात आणि रोजचा तमाशा खेळणे बंद करावे >>>
हे आंतरराष्ट्रीय प्रश्न असून याला अनेकानेक कंगोरे असू शकतात. कदाचित हे प्रसिद्ध न करणेसुद्धा इष्ट असू शकते.
यामध्ये दम वगेरे अशा गोष्टी बोलणे बाळबोधपणा आहे असे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. लोभ असावा.

ता.क. नेताजींच्या कुटुंबियांना दिल्लीस बोलावण्यात आल्याची बातमी वाचली..

म्हणजे भाजपाने पोळी भाजु नये म्हणुन फायली उघड होण्याच्या थांबणार नाहीत आणि

शेवटी जासुसी करणार्यांची पितळ उघडी पडणारच !

माझी आपणा सर्वांना अशी विनंती आहे कि या धागा 'नेताजींचे काय झाले' बद्दल माहिती आणि चर्चा असाच असू द्यावा. त्यांचे काय झाले असेल याच्या शक्याशक्यतांवर येथे चर्चा व्हावी..
जेणेकरून हा धागा माहितीपूर्ण राहील..

धाग्याचे रुपांतर भाजप वि. कांग्रेस, गांधी, नेहरू वि. नेताजी , जहाल वि. मवाळ इ. मध्ये होणे प्रयत्नपूर्वक थांबवूया..

अर्थात वादविवाद हा सुद्धा चर्चेचाच भाग असतो यात शंका नाही..
परंतु हा वादविवाद आपण खालील धाग्यावर करूया. तेथे आधीपासून तो चालू आहे.

http://www.maayboli.com/node/53464

धन्यवाद __/\__ Happy

आझाद हिंद फौजेचा विरोध करणाऱ्या लोकांनी, नंतर देशभर गाजलेल्या त्या खटल्याच्या जिवावर प्रतिष्ठा मिळवून घेतली..

...

लंडनमधुन उडी मारुन आलेल्या कित्येक ब्यारिस्टरांनी घरात बसण्यापलीकडे काही नाही केले.. आणि जवाहरलाल नेहरु , भुलाभाई देसाई , तेजबहाद्दुर सप्रु अशा दिगजानी आझाद हिंद सेनेच्या केसेस लढल्या तर ते मात्र पसिध्हीला ह्पापलेले झाले काय ?

धाग्याचा मुख उद्देश सत्य जाणणे हा आहे की नेहरुंवर चिखलफेक करण्यासाठी आहे ?

http://www.thesikhencyclopedia.com/historical-events/the-british-and-sik...

काऊ,
तुम्हाला वरच्या पोस्टीमध्ये नेहरूंची पाठराखण करायची आहे हे पटले. त्याबद्दल तुम्ही लिंक दिलीत हा तुमचा पुराव्यानिशी बोलण्याचा दृष्टीकोन सुद्धा आवडला. तुमच्या बद्दल यामुळे आदर वाढला परंतु,

लंडनमधुन उडी मारुन आलेल्या कित्येक ब्यारिस्टरांनी घरात बसण्यापलीकडे काही नाही केले.

हे कशासाठी .?
वीर सावरकर (ते सावरकरांनबद्दल नव्हतेच असे म्हणू नका आता, हास्यास्पद ठरेल ते!) हा माणूस २७ वर्ष तुरुंगवासात राहिला, तो हौस म्हणून राहिला नसेल हो कि नाही.?
बोस, त्यांना जर्मनी मध्ये मुलगी झाली तिलासुद्धा पाहू शकले नाही कारण ते त्या वेळी युद्धात व्यस्त होते. त्यांनी देशाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांना बायको, मुलीला पाहावेसे सुद्धा वाटले नसेल.? आपल्याला मरण येणार हि शक्यता कितीतरी असून ते युद्धावर गेले. हा सगळा फक्त मूर्खपणा होता अस वाटत तुम्हाला .?
अशा कित्येक गोष्टी असतील. या लोकांनी अक्षरशः आयुष्य अर्पण केलय हो देशाला काऊ! हे थोड समजून घ्या आणि आदर बाळगायला शिका...

गांधींजिंच्या पायापाशी बसले नाही ते मूर्ख अशी तुमची व्याख्या दिसते. हे काही बरोबर नाही बरका.

व्यक्तीशः मला गांधीवाद पटत नाही. मला सावरकर, टिळक, बोस यांचे विचार पटतात.
पण म्हणून गांधीजी,नेहरू हे मूर्ख आहेत असे मला आजीबात वाटत नाही..
त्यांनी सुद्धा देशासाठीच कार्य केलय त्याबद्दल मला त्यांचा आदरच वाटतो.
त्यांच्याबद्दल अनादराने मी कधीही बोलत नाही. कारण त्यांच्याबद्दल माझे तेवढे वाचन नाही, त्यामुळे त्यांचे विचार मला पटले नसतील, हि माझ्या आभ्यासतील तृटी असेल असे मी मानतो.

आपण मात्र स्वतःला सर्वज्ञ समजून धागे घाण करता वरून आमच्या सारख्या सावरकरांचा आभ्यास केलेल्यांच्या भावना दुखवता..
असे कृपया करू नका. तुमचे योगदान धाग्याची शान वाढवू द्या ना, आम्हाला गरज आहे तुमच्या सारख्या अनुभवी लोकांच्या मताची..

'विचार पटणे' आणि 'आदर वाटणे' या गोष्टीतला फरक तुमच्या सारख्या व्यासंगी माणसाला कळू नये हे खेदजनक आहे..
समविचारी नसलेल्या माणसाचा सुद्धा आदर करणे हि कला शिका.

मला वाटत नाही सावरकरांनबद्दल आपल्याला असलेला तिरस्कार अभ्यासपूर्ण आहे. उगाच उच्चलली जीभ लावली टाळ्याला अस करता तुम्ही.

मी तुम्हाला सावरकरांच्या धाग्यावरच म्हणले होते या चर्चा करू म्हणून. तुम्ही ते स्वीकारले नाही.
http://www.maayboli.com/node/52883 हा तो धागा.

आता मी पुन्हा एकदा तुम्हाला (तुम्हाला व्यक्तीशः काऊ) आमंत्रण देत आहे, त्या धाग्यावर या चर्चा करू..
मी तुम्हाला सावरकरांचे विचार पटवून देऊ शकणार नाही, तसे होणेही अपेक्षित नाही,
परंतु मी तुम्हाला सावरकरांबद्दल जो तिरस्कार वाटतो तो दूर नक्की करू शकेल..

आपल्यासारख्या जेष्ठास असे सुनावण्याची वेळ येणे या माझ्याकरता खेदजनक अनुभव आहे.
मी तुमची मनापासून माफी मागतो. but do take it personally...

धागा नासवला मी, मला माफ करा लोकहो __/\__ Sad

नेहरुनी लोकप्रियता मिळवण्यासाठी ही केस लढली असे धाग्याच्या लेखकानी लिहिले , मी फक्त ते खोडुन काढण्याचा प्रयत्न केला... बाकीच्यानी सावरकर वगैरे कशाला आणले हे समजले नाही.

मला गांधी पटत नाहीत असे कुणी लिहिले तर चालते. मला नेहरु पटत नाहीत असे लिहिले तर चालते. पण मला *** पटत नाहीत / आवडत नाहीत असे कुणी लिहिले की इथली टोळी का चवताळते हे समजत नाही.

पिकेशराव , तुम्हाला त्याच धाग्यावर उत्तरही दिले आहे......

आँ ! आमचे वंदनही खरेच आणि आमचे विचारही खरेच.

दुसर्‍यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही.

स्व-तंत्र-वीर काउराव कागलकर

.........

तुमच्याकडे यायची गरज नाही. याउप्पर तुम्हाला अजुन लिहायचे असेल तर तुम्ही त्या धाग्यावर जरुर लिहा. आम्ही वाचु.

चांगला लेख आहे.
नेहेमीप्रमाणे स्वयंघोषीत कॉन्गी बार्किन्ग स्क्वाड या धाग्यावर येऊन धुडगुस घालणार त्या सर्वांस वाडकरांच्या इग्नोरास्त्राने इग्नोर करुन मारावे हे उत्तम.

लेख आवडला, पण शिरोडकरांशीही सहमत आहे.

>>>कॉन्गी बार्किन्ग स्क्वाड <<< Proud

ही स्क्वाड आता कुणीतरी आवरायला हवी आहे. Proud

>>> ही स्क्वाड आता कुणीतरी आवरायला हवी आहे <<<<
अवघड आहे. मनेकाजींच्या आग्रहामुळे हे आवरणे शक्य नाही.
तेव्हा यू: यू: करू नये, पण मग "हाड हाड" ही करू नये, जस्ट इग्नोर करावे... अनुल्लेख. Proud

काऊ Happy असो ..

*****

टाका कोणाला बोसांवर काही मिळाले तर ..
डोळ्यासमोर एक "नावाधारित पोस्टगाळणी यंत्र" बसवून घेऊन उपयोगी पोस्ट तेवढ्या वाचूयात, अजून काय... Happy

जस्ट इग्नोर करावे... अनुल्लेख >> हेच करतो आता.. फक्त एक गोष्ट स्पष्ट करून,
अनुल्लेख करतो आहोत कारण संबंधितांची ऐकण्याची पात्रता दिसत नाही हे वर पुरेसे स्पष्ट झाले आहे. Proud

लोभ असावा.. __/\__

गाम्धीजींनी भगतसिंग प्रकरणात ह्स्त्क्षेप केला नाही म्हणुन भगतसिंगाना फाशी झाली असे भगवे लोक म्हणतात.

आझाद हिंदच्य प्र्करणात नेहरुनी हस्तक्षेप केला ( म्हणजे आझाद हिंद सेनेतील सनिकांवर ब्रिटिशानी घातलेल्या केसेसमध्ये नेहरुनी आझाद हिंद सेनेची बाजु मांडली ) तर त्यानी मात्र तो प्रसिद्धी मिळवाय्ला केला असे भगवे लोक म्हणतात .

अशी डब्बल ढोलकी वाजवणार्‍यांनी आमची पात्रता ठरवायच्या फंदात पडु नये.

जाउ द्या हो. कुठे मुर्खांच्या नादी लागतात. स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेणारेच आजकाल राष्ट्रभक्तीचे ढोल बडवत आहे.

विश्वास पाटील यांनी लिहलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरचा महानायक हा ग्रंथ नेताजींच्या मृत्युवर प्रकाश टाकतो. नेताजींच्या मृत्यु विषयक बातमीला जपान सरकारने अनेक वेळा दुजोरा दिलेला आहे आणि या विषयावर कोणाताही वाद नसल्याचे म्हणले आहे.

१००० पाने असलेला ग्रंथ विश्वास पाटील यांनी संशोधन करुन लिहला आहे. याचे परिशिष्ठ पाहिले की खात्री पटते की विश्वास पाटील हे कल्पनेने काहीही लिहीत नाहीत.

तत्कालीन केंद्र सरकारने केलेला दुजाभाव, नेताजींच्या मृत्युबाबतच्या वावड्यांना खत पाणी घालत राहीला इतकेच काय ते सत्य आहे असे मला वाटते.

विश्वास पाटील या मराठी लेखकाच्या मताला आपण सर्वांनी मान देत हा निष्कारण वाद बंद करावा असे मला वाटते.

>>>> आझाद हिंदच्य प्र्करणात नेहरुनी हस्तक्षेप केला तर त्यानी तो प्रसिद्धी मिळवाय्ला केला असे भगवे लोक म्हणतात <<<<
तर तर? भगवे लोक येडे आहेत.... कै पण बोलतात! Wink
त्यान्ना (भगव्यांना) नेहरुंचा हस्तक्षेप खरोख्खर काय होता ठाउक तरी आहे का?
भारताच्या पूर्वसीमेवर आझादहिंदसेना आली/पोहोचली, तर हाती बंदुक घेऊन त्याविरुद्ध सर्वप्रथम लढायला जायला नेहेरू तयार होते.... अन मग यदाकदाचित नेहरु करु शकले असते अशी ती युद्धातील "हिंसा" अहिंसेच्या पुजार्‍यांन्नाही मान्य होती.
या भगव्यांना काय कळतय कप्पाळ? नै का ? तर वर लिहिलेला हस्तक्षेप फक्त काऊलाच माहित असणार! अलबत, हेच खरे! Proud

http://www.thesikhencyclopedia.com/historical-events/the-british-and-sik...

Shah Nawaz Khan, Gurbakhsh Singh Dhillon and Prem K. Sehgal were, as a test case, put on trial in open court in the Red Fort at Delhi.
They were charged with treason and with waging war against the King. This aroused India wide sympathy for them. The trial began on 5 November 1945.Eminent lawyers and public men such as Tej Bahadur Sapru, Bhulabhai Desai and Jawaharlal Nehru defended the accused in court.
There were riots in their favour in several places between 21 and 24 November. The court on 31 December 1945 sentenced all the three to transportation for life. The government, however, yielded to the outburst of popular sympathy and the British commander in chief, Sir Claude Auchinleck, quashed the sentence on review.

लिंबुभक्ता ... हे तुझ्यासाठी..

आझाद हिंद सेनेच्या तीन लोकांविरुद्ध इंग्रजांनी राजद्रोहाचे कlam लाउन केसेस केल्या होत्या.. त्यावेळी नेहरु सप्रु देसाई यानी त्या सैनिकांची बाजु मांडली. अखेर इंग्रजानी चार्जेस मागे घेऊन त्याना सोडुन दिले.

या केसबद्दल नेहरुना प्रसिद्ध्ही मिळाली असेलही.. पण या केसकडे सगळे देशवासीय लक्ष ठेउन होते.

कारण या तीन सैनिकात एक हिंदु , एक मुसलमान व एक शीख होते. त्यामुळे हा सर्व देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता.

नेहरुंऐवजी दुसरा कुणी सोम्यागोम्य लढला असता तर त्यालाही प्रसिद्ध्ही मिळाली असती... जायचे होते केस लढायला.

काउ, त्या तिघात 'शाह नवाज खान' होता म्हणुन नेहरु पुढे झाले असा शोध पुढे आल्यास नवल नाही.
बाकी जर नेताजी हुकुमशाहीचे समर्थक होते तर तत्कालीन सरकारने त्यांचा माग काढण्याचे प्रयत्न करणे गैर नाही.

Pages