अवांतर

............ ...................... ............

Submitted by Mandar Katre on 10 October, 2012 - 12:49

अत्यद्भुतम प्रहृतमात्तऋषां तथापि .....

प्रकाश प्रकाश आणि फक्त प्रकाश.........................................
मला काहीच समजत नव्हते ,नक्की काय चाललंय?
..
“चला तर मग”... १..२... ३.....

क्रमश:

विषय: 

स्टोरी सलील ची ...

Submitted by Mandar Katre on 8 October, 2012 - 13:20

स्टोरी सलील ची ...

आज सकाळीच सलीलचा फोन आला ,चांगला तासभर बोलला .मीही भारावलो ,चक्क अमेरिकेतून फोन! बोलणे झाल्यावर फोन खाली ठेवला आणि माझं मन सलीलच्या भूतकाळात निघून गेलं...

विषय: 

डॉन

Submitted by Mandar Katre on 7 October, 2012 - 01:45

डॉन

दुबईच्या आलिशान हॉटेलच्या स्विमिंग पुलाच्या कठड्या वर बसून सिगारेट चे झुरके घेत तो बसला होता .संध्याकाळचा लालभडक सूर्य जसजसा अस्ताला जात होता ,तसतसा त्याला आपला २५ वर्षापूर्वीचा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर दिसू लागला .....

विषय: 

अमेरिकेत स्वरोत्सव

Submitted by रमेश भिडे on 6 October, 2012 - 16:58

सातासमुद्रापार असलेल्या मराठीजनांचे व्यासपीठ असणा-या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६व्या अधिवेशनानिमित्त बोस्टन येथे " बी.एम.एम.-सारेगम-२०१३" या स्पर्ध्येची नांदी झडली आहे. अमेरिकेतल्या १३ ठिकाणी होणा-या प्राथमिक फेरीनंतर जुलै २०१३ मध्ये या स्पर्धेचा अंतिम सोहळा होईल.

' गणपती बाप्पा मोरया ' च्या गजरात बोस्टनमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीत मॅसॅच्युसेट्स , र्‍होड आयलंड , कनेटिकट , आणि वॉशिंग्टन या चार राज्यातल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे मराठी गाण्यांच्या या स्पर्धेत अमराठी गायक-गायिकाही हिरिरीने सहभागी झाले होते.

विषय: 

आताशा मी....

Submitted by रमेश भिडे on 4 October, 2012 - 12:47

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो......................

सलील-संदीप चि ही गझल ऐकताना मलाही कुठेतरी जाणवले

च्यायला गेली ४ वर्षे फेसबुक वर काढली, २५५० मित्र, १७६० ग्रुप चा सदस्य

पण हातात काय?

फेसबुक वर हजार मित्र आणि गावात विचारेना कुत्र ,अशी गत

मग ठरवलं ,आता जरा मायबोली वर जावून बघुया

बघुया मिळते का कोणी जिवाभावाचे?

अरेच्चा ! पण इकडे पाहिले तर सगळीच मारामारी चाललेली ---

कोणी भगवा ,कोणी हिरवा ,कोणी पांढरा शुभ्र ...
पण या झेंड्याच्या पाठीमागे होती मळकट अभ्र ...

प्रत्येक जण आपापला झेंडा घेवून नाचतोय

विषय: 

घो टा ळा

Submitted by विदेश on 4 October, 2012 - 11:47

एकजण दुसऱ्याला सांगत होता
कंटाळलो आता इतके घोटाळे करून

दुसरा म्हणाला
कंटाळून कसे चालेल ? आपल्याला देश चालवायचा आहे ना ?

पहिला उत्तरला
आपली वारस मंडळी आहेत ना तयार , मग कसली काळजी ?

दुसरा म्हणाला
एका घोटाळ्यातून दुसरा करायचा
त्यात नको त्याला अडकवायचं
परत त्याची सुटका करण्यासाठी,
आपणच धडपड करायची
स्वागतासाठी कमानी, ओवाळण्यासाठी पंचारत्या, मोठाले फलक ...
हे सगळ सांगायलातरी " आपल्यासारखे आणखी कुणी " नकोत का ?

पहिला म्हणाला
खर आहे दोस्ता ...
असे म्हणून-

तो पहिला
दुसऱ्याला पुढच्या घोटाळ्यात कधी कसे कुठे अडकवायचे
ह्याचा मनातल्या मनात विचार करून
आळस झटकू लागला !!!

सेट टॉप बॉक्स

Submitted by मी अमि on 4 October, 2012 - 03:27

सेट टॉप बॉक्स सरकारने बंधनकारक केला आहे. आता आम्ही केबल वापरत आहोत. तर हा बॉक्स केबल ऑपरेटर कडूनच घ्यावा लागेल की तो बाहेरही विकत मिळतो. कोणत्या कंपनीचा सेट टॉप बॉक्स चांगला आहे?

शब्दखुणा: 

गूढ कथा: "भ्रमभारीत"

Submitted by निमिष_सोनार on 29 September, 2012 - 23:07

१)

दुपारचे दोन वाजले. अक्षांश जरा जड डोक्यानेच झोपेतून उठला. आई ने त्याला म्हटले, "चल फ्रेश हो. जेवून घे. "

अक्षांश कालची नाइट शिफ्ट करून सकाळी सातला घरी आला होता. त्याच्या अंगात काळा टी शर्ट होता, त्यावर "व्हाय'रस'? टेक ज्यूस! " असे लिहिलेले होते. कॅब दाराशी सोडून गेल्यानंतर झोपेच्या धुंदीतच तो पायर्‍या चढून वर आला, बेल वाजवताच त्याच्या आईने दार उघडले आणि तो बेडवर आडवा झाला होता.

चकवा

Submitted by Mandar Katre on 29 September, 2012 - 13:40

चकवा

कुवेत एअरवेज चे फ्लाईट ३११ मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावरून आकाशात झेप घेत होते ,तसतसे आशिष चे विचारही मणामणाचे ओझे उतरावे तसे हलके होत होते . गेले१० महिने आणि त्या काळातल्या घडामोडी एखाद्या चित्रपटासारख्या त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या .गेले एकदोन दिवस नव्हे,तर चक्क १० महिने आपण असे झपाटल्यागत कसे काय वागत होतो? याचा वचार करूनही त्याला उत्तर सापडेना !

विषय: 
शब्दखुणा: 

आपली शिक्षणपद्धती

Submitted by Mandar Katre on 28 September, 2012 - 15:59

आपली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांची "सर्जनशीलता" (Creativity) मारून टाकते का? मी त्याला सर्जनशील म्हणेन जो इतरांपेक्षा वेगळा, innovative विचार करू शकतो. सतत रोजच्या रोज शाळेत आपटले जाणारे पुस्तकी धडे आणि पुन्हा गृहपाठ विद्यार्थ्यांना काही सुचूच देत नाहीत असे वाटते. शिवाय परीक्षेत दिली जाणारी उत्तरे हि क्रमिक पुस्तकाच्या बाहेरील असता कामा नयेत म्हणजे अवांतर वाचनाचा एकंदरीत scope च शिल्लक राहत नाही. आपले मत काय आहे?

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर