जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा पाऊस कसा पडतो असा एक प्रश्न घरी विचारला जातो. गेले अनेक दिवस मी "वाफ वर जाते, मग थंड झाली कि पाऊस पडतो" वगरे थोडक्यात सांगत होते.
परवा चहा प्यायला बसले आणि परत हाच प्रश्न आला. त्यावेळी दाखवलेला हा पिटुकला प्रयोग.
वयोगट: [३-५]
साहित्य:
कुठलीही गरम वाफाळणारी वस्तू , चहा, दुध, वरण काहीही.
एक थंड स्टीलचा पेला / चमचा
कृती:
-चहा कसा गरम आहे, त्यातून कशा वाफा येत आहेत ते सांगा.
-मग स्टीलचा पेला कसा थंड आहे ते हात लाऊन दाखवा
-आता पेला वाफेवर १ ते २ मिनिट पकडा किंवा झाकून ठेवला तरी चालेल.
अभ्यास हा शाळेत शिकवण्याची आणि कंटाळा करण्याची गोष्ट आहे असा एक एकूण सूर दिसतो ना आपल्याकडे? बडबडगीते, बालगीते सुद्धा अभ्यासाला अगदी दुष्ट ठरवतात, शाळेला वाईट अस लेबल लावून टाकतात. आता एवढी नकारात्मक तयारी झाल्यावर बऱ्याच जणांचा शाळा आणि अभ्यास अगदी नावडीचा झाला तर काय नवल?
मला खालील प्रश्नांबाबत कुतुहूल आहे. कृपया आपले मत मांडा
नर्सरी अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि हेतू काय असतो ?
- अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास (ओळख डोळ्यांना की कानांना. म्हणजेच मुलांना अक्षरे पाहून ओळखण्यावर भर की उच्चार/नाद यावर भर)
- शब्दओळख
- अक्षरे गिरवणे
- अंकपरिचय ते अंकाट्टाहास
- हात आणि मेंदु यांचा वापर- चित्र काढणे
- रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे
- दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?)
- ऑड मॅन आउट (उद्या मी इथे एक वर्कशीट स्कॅन करुन टाकते. त्यात अशी उदाहरणं आहेत)
- Circle the friends of letter E
Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत
सध्या खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा देशात सर्वदूर गाजतोय. खासदारांच्या पगारवाढीबद्दल सर्वसामान्य जनतेत विशेषत: शेतकरी वर्गात प्रचंड रोष असणारच, असे गृहीत धरून आलेली संधी "कॅश" करायला हवी, अशा उद्देशाने एका संपादकाने मला मेल केली. त्यातील मजकूर असा. "आपल्या लोकप्रिय दैनिक "तळमळ" या वृत्तपत्रात छापण्यासाठी एखाद्या शेतकर्याची मुलाखत हवी, त्यासाठी "खासदारांची पगारवाढ" या विषयावर एका शेतकर्याची मुलाखत घेवून आमच्याकडे पाठवा, योग्य ते मानधन देवून प्रकाशित केली जाईल."
परीक्षा म्हटली की, सर्वांच्याच पोटात गोळा येतो. दहावी किंवा बारावीत असलेल्या मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही त्यांच्या परीक्षेची चिंता लागून रहाते. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवूनही चांगल्या महाविद्यालयामध्ये आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवूनही आपल्या आवडत्या विषयात विश्वविद्यालयीन पदवी मिळवण्यासाठी आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे परीक्षा जसजशी जवळ येते, तसतसा प्रत्येक विद्याथ्र्याला थोडा तरी परीक्षेचा ताण अनुभवास येतो.
नोकरी
या भागात १० प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. त्यातला कुठलाही प्रश्न अनिवार्य नव्हता. सध्याचा पदभार, नोकरी/ करियरविषयक मतं, Work- Life Balance, पदोन्नती, नोकरी सोडण्याची कारणे, Glass Ceiling (कामाच्या ठिकाणी लिंगभेदाचा अनुभव), नोकरी करणार्या आणि न करणार्या स्रियांबाबत मैत्रिणींचे विचार याभोवती या सदरातील प्रश्नांचा रोख ठेवला होता.
हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.
कृपया या भागातील टीपा काळजीपूर्वक वाचाव्या.
-
सध्याच्या पदभाराचे नाव, विभागाचे नाव
सहजच नेट वर भटकताना एक धक्कादायक पण तितकीच आचंबित करणारी बातमी वाचली.
http://www.esakal.com/eSakal/20100415/5257657138283589530.htm
त्या बातमीची सत्यता पडताळी साठी पुढील वेबसाईटवर भेट दिली..
http://www.bamu.net/
मराठवाडा विद्यापीठातील उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच विद्यापीठाची वेबसाईट हॅक केली आहे..
त्याचे परिणाम कसे आणि किती होतील माहिती नाही.. पण ज्यांनी साईट हॅक केली त्यांच्यावर सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई होणार की नाही? तसेच विद्यापीठतील जो कारभार त्यांनी सगळ्यांसमोर आणला आहे त्यामध्ये काही बदल घडून येतील का?