ज्ञान

पंढरीच्या राया

Submitted by Meghvalli on 21 September, 2025 - 09:32

संतांची भक्ती आणू मी कोठून, पंढरीच्या राया?
नाही ती भक्ती, म्हणूनच कारे,
नाही भेट तुझी, पंढरीच्या राया।

ज्ञानियाचे ज्ञान, तुक्याचे गान ,
आणू मी कोठून, पंढरीच्या राया?
ना ज्ञान, ना गान, ना भक्तीचे भान,
म्हणूनच कारे, नाही भेट तुझी, पंढरीच्या राया।

का न घातला जन्मी संत म्हणुनी?
का न केला ज्ञानी तु मला पाळणी?
का न दिलीस जन्मजात हाती लेखणी?
का दिलीस हाती वेगळीच खेळणी रे तू, पंढरीच्या राया?
सांग, का फसविलस असं मला रे तू, पंढरीच्या राया?

शब्दखुणा: 

शुभं करोती

Submitted by पुरंदरे शशांक on 30 October, 2019 - 01:01

शुभं करोती

दिव्या दिव्या दीपत्कार
मनात घडव चमत्कार

जावो दैन्य अंधःकार
उजेड पसरो सभोवार

स्वार्थ निपटून भारंभार
मनात जागो परोपकार

अज्ञान पूर्ण दूर सार
ज्ञान सागर हेचि सार

इंटरनेटवर भूमिती

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हा दुवा पहा: http://www.mathopenref.com/index.html

तुमची मुलं माध्यमिक वर्गांत शिकत असतील तर या दुव्यावरील विविध अ‍ॅनिमेशनं त्यांच्या अभ्यासक्रमातल्या भौमितिक संकल्पना स्पष्ट करण्यास / त्यांची विषयातील रुची वाढवण्यास मदत करतील.

ही काही उदाहरणे बघा.

वर्तुळाचा केंद्रबिंदू शोधणे :
http://www.mathopenref.com/constcirclecenter.html

दिलेल्या बिंदूतून दिलेल्या रेषेवर लंब काढणे :
http://www.mathopenref.com/constperplinepoint.html

दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे :
http://www.mathopenref.com/constparallel.html

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - ज्ञान