नर्सरी शिक्षण- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे

Submitted by रैना on 5 October, 2010 - 04:36

मला खालील प्रश्नांबाबत कुतुहूल आहे. कृपया आपले मत मांडा

नर्सरी अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि हेतू काय असतो ?
- अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास (ओळख डोळ्यांना की कानांना. म्हणजेच मुलांना अक्षरे पाहून ओळखण्यावर भर की उच्चार/नाद यावर भर)
- शब्दओळख
- अक्षरे गिरवणे
- अंकपरिचय ते अंकाट्टाहास
- हात आणि मेंदु यांचा वापर- चित्र काढणे
- रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे
- दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?)
- ऑड मॅन आउट (उद्या मी इथे एक वर्कशीट स्कॅन करुन टाकते. त्यात अशी उदाहरणं आहेत)
- Circle the friends of letter E
Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
दोन मुलं डावीकडे पाहून सायकल चालवतात , एक उजवीकडे पाहून...

वगैरे....
मुलांचे वय- २००७ साली (जानेवारी- डिसेंबर) मध्ये जन्मलेली मुलं.

गोष्टी, गाणी, गप्पा लिहीलेच नाही कारण ते शाळेत अंतर्भूत नाहीच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतंय की भारतामध्ये प्लेग्रूप आणि नर्सरीच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि उद्देश एकच असतो. शाळा म्हणजे काय? आपण घरापासून दूर तिथे काही वेळ काढायचा असतो, एक टिचर असते, तिचं ऐकायचं असतं, गाणी म्हणायची असतात, गोष्टी ऐकायच्या असतात, डबा आपल्या हाताने खायचा असतो ह्या कटू गोष्टी मुलांच्या पचनी पाडणं एवढंच अपेक्षित असतं. Happy

माझ्या माहितीप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणेः
1. अक्षर ओळख आणि अंक ओळख डोळ्यांना आणि कानांना. ते लिहायला शिकवण्याचा उद्देश हातात पेन्सिल पकडण्याची ग्रीप यावी एवढाच.
2. अक्षर उच्चार
3. रंग ओळख
हेच आणि एवढंच अपेक्षित Happy

मुलांचे घराबाहेर मर्यादित सोशलायझेशन.
रंगओळख
भाषा ओळख
कलांची ओळख.
मोटर स्किल डेवलप मेन्ट. - पळणे नाचणे, गाठी बांधणे, बाट्लीत पाणी भरणे इत्यादी.
अजूनही. विचार करून लिहीते.

मूळात नर्सरी, प्लेग्रूप, किंडर गार्टन यांतच वेगवेगळ्या शाळांमध्ये फार तफावत दिसून येते. काही शाळांत प्लेग्रूप (३ च्या आत्), नर्सरी(३ पूर्ण), एलकेजी, युकेजी अश्या पायर्‍या असतात. काही ठिकाणी एलकेजी(३ पूर्ण), युकेजी
अश्या पायर्‍या असतात. त्यानुसार, अभ्यासक्रमही वेगवेगळा असतो. आमच्याकडे आर्मी स्कूलमध्ये नर्सरी( ३ पूर्ण), एलकेजी, युकेजी अश्या पायर्‍या असतात.

मी २००२ मध्ये आर्मी स्कुलमध्ये नर्सरीला शिकवत होते,तेव्हा A To Z,1 To 10, अ से अ: लिहायला शिकवणे असा अभ्यासक्रम होता. त्याच वर्षी नर्सरी टीचर्सची २-३ वर्कशॉप्स झाली, ज्यांना मी हजर होते. यांत अनेक पैलूंवर चर्चा झाली. सगळ्यांनी एकमताने अभ्यासक्रम कमी करण्याची गरज आहे असे सांगितले. त्यानुसार, अभ्यासक्रम बदलण्यात आला.
२००७ मध्ये मी परत नर्सरीला शिकवायला सुरुवात केली, तेव्हा अभ्यासक्रम फार-फार बदलला होता.
अक्षर ओळख- यात चित्रांच्या सहाय्याने मुलांना अक्षरं शिकवत असू. फक्त ओळखणे महत्त्वाचे होते. 'लिहीणे' पूर्णपणे मना होते.
अंकमोजणी- यात चित्रं, वस्तू (राजमा, पेन्सीला, खडू, गोट्या) वापरून मोजणे आणि अंकांचे आकार दाखवून अंक ओळखणे शिकवत असू.
रंग ओळखणे - अगदी प्रायमरी रंग ओळखणे.
दिशा ओळखणे- अगदी उत्तर दक्षिण नाही, पण उजवे-डावे ओळखणे.
रोजच्या जीवनातल्या चांगल्या सवयी, सॉरी-थँक्यू म्हणणे. गरजेपुरते इंग्लीश बोलणे.
एलकेजीमध्ये अक्षरलिखाण शिकताना मदत व्हावी म्हणून प्ले डो, रंगकाम करून घेणे.
मेंदू आणि हात-पाय यांचा समन्वय साधायला मदत व्हावी म्हणून सुईत दोरा ओवणे, डाळी मिक्स करून डाळी निवडणे सारखे खेळ.
आणि महत्त्वाचे म्हणजे हे सगळे हसत-खेळत्,गप्पा-गोष्टी करत शिकवायचे. Happy

या अभ्यासक्रमाला अनुसरूनच एल्केजी/युकेजीचा अभ्यासक्रम बदलला आहे. पण मूळ गोची अशी की युकेजीचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन १लीचा कमी करण्यात आलेला नाही. त्यामुळे, मुलांवर फारच ताण पडतो. कदाचित अजून ५-६ वर्षांत तेही बदलेल. Happy

याबाबत अजून डिटेलमध्ये लिहीता येईल, माझ्या नोटस् ट्रंकेतून काढून २ दिवसांत लिहीन. Happy

मस्त धागा आहे.. लिहण्यासारखे खुप आहे..
आमच्याकडे सीनीअर केजी मध्ये करसिव रायटींग चालु आहे........ सध्या.. बापाला ( मला) पण येत नाही...
Happy

मस्त प्राची.

मी एल के जी यू केजी मध्ये जी बालगीते शिकवतात ना, मछली जलकी रानी है बाबा ब्लॅकशिप आइज आर ब्लू वगैरे त्याची क्यूट इलस्ट्रेशन्स काढून ती क्रेयॉन/ केचपेन ने रंगवून त्या बरोबर टेक्स्ट असे ड्रॉइंगपेपर वर पोस्टर बनवू शकते. त्याला फ्रेम किंवा माउंट करता येते. कडेने टेप लावता येते. कोणाला हवे असल्यास सांगा. वीकांताला बनवून पाठवेन. एक सेट नणंदे साठी बनविला होता ती आर्मी स्कूल मध्ये असेच शिकवत होती तेव्हा. माझ्या हपीसच्या शेजारीच बेल बुक पब्लिशर आहे त्याकडेही या वयाच्या बालकांसाठी खूप पुस्तके आहेत. ती ही पाठवू शकेन.

नर्सरी अभ्यासक्रमाचा मूळ हेतू- पुढील अभ्यासक्रमासाठी मुलांना शारीरिक/मानसिक दृष्ट्या तयार करणे हाच असतो. यात जितकं हसत-खेळत शिकवू तितकं चांगलं. नाहीतर मुलांच्या मनात शाळेविषयी कटुता निर्माण होते. अभ्याक्रमात मुलांनी पूर्णपणे पारंगत व्हावे अशी अपेक्षा नसते. थोडेफार बेसीक क्लिअर झाल्याशी मतलब.

मुलंही कधी कधी फार मजेदार संबंध लावतात. 'प' से 'पतंग' आणि 'के' फॉर'काइट' शिकवल्यावर पतंगाचे चित्र दाखवले की 'पी' फॉर 'पतंग' असे उत्तर मला मिळाले आहे. Lol

अक्षरलेखन शिकवायच्याही काही पायर्‍या आहेत, त्याबद्दलही डिटेलमध्ये लिहीन मी. Happy

नर्सरी अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि हेतू काय असतो ? >>> चांगला विषय Happy

श्रीशैलला सध्या ज्या नर्सरीत जातो तेथील अभ्यासक्र...
अक्षरओळख हि चित्रांच्या माध्यमातून करतात. डोळ्यांना, कानांना अक्षरांचा सराव करणे.
- शब्दओळख >>> नाही
- अक्षरे गिरवणे >>> नाही
- अंकपरिचय ते अंकाट्टाहास >>> चित्रांच्या माध्यमातून संख्या परिचय... अंकपरिचय शक्यतो नाहीच.
- हात आणि मेंदु यांचा वापर- चित्र काढणे >>> चित्र काढणे नाही पण चित्र ओळखायला शिकवितात.
- रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे >>> बहुतेक मुलां/मुलींचे आवडते उद्योग... Happy
- दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?) >>> ३ वर्षाच्या मुलाला आपणच घरी डावे उजवे शिकवितो... त्या पुढचे दिशाज्ञान अपेक्षित नाही.
- ऑड मॅन आउट (उद्या मी इथे एक वर्कशीट स्कॅन करुन टाकते. त्यात अशी उदाहरणं आहेत)
- Circle the friends of letter E
Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
दोन मुलं डावीकडे पाहून सायकल चालवतात , एक उजवीकडे पाहून... >>> छोट्या मेंदूवर खूपच ताण.

असो...

श्रीशैलच्या नर्सरीतील एक गोष्ट मात्र खटकली... ऑड मॅन आउट
नर्सरीत बहुभाषिक मुले आहेत... त्यामुळे मुलांचे एकमेकांत संवाद फार कमी होतात... इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत ही फार चिंतेची गोष्ट आहे.

त्यामुळे मुलांचे एकमेकांत संवाद फार कमी होतात... <<< हे भाषेमुळे कमी आणि ओळख नसल्यामुळे जास्त असावे. एकदा एकमेकांशी चांगली ओळख झाली म्हणजे हा प्रश्न सुटेल ना?

हुश्श. धन्यवाद लोकहो.
डोकंच फिरलं होतं त्या वर्कशीट पाहून. वर्तमानपत्रात लिहावे काय याचा सिरीयसली विचार करते आहे.
ICSE मुळे असावे का असे? कोणाला ICSE चा अनुभव आहे का?

मुलांचे एकमेकांत संवाद >> इंद्रा- या वयातील मुलांना अजून एकमेकांशी बोलणे, खेळणे वगैरे प्रकार तितकासा समजला नसतो असे निरिक्षणांती वाटते. तसेच 'मी, माझी वस्तु, माझे आईवडील' या गोष्टींचा जरा साक्षात्कार झाला असतो.

प्राची, इंद्रा, मंजू- तुमच्या शाळा चांगल्या वाटतायेत.

माझा सध्या रुमाल.
घरी जाऊन सावकाश लिहीन. इथल्या डेकेअरचे, मॉंटेसरीचे बरेच अनुभव आहेत. चांगले डेकेअर्स / प्रीस्कूल मुलांच्या अभ्यासक्रमाची छापील माहिती देतात. वर्षातून तीन ते चार वेळा एव्हॅलुएशन शीट देतात - यात मुलांच्या भावनिक / शैक्षणिक / सोशल स्किल्स, मोटर स्किल्स, इत्यादीचा आढावा घेतात. पास /फेल लिहिण्यापेक्षा इमर्जिंग स्किल्स, मास्टर्ड द स्किल किंवा एक्सीड एक्सपेक्टेशन असे लिहिलेले असते. फार बारकाईने विचार करून लिहितात असा माझा तरी अनुभव आहे.

आयला वय वर्ष तीन पासूनच ICSE वगैरे..... अवघड आहे... Sad घरच्या घरीच शिकवावं आणि नंतर बाहेरुन १०वी ची परिक्षा द्यावी... आणि कुठल्यातरी वेगळ्यावाटेवरचं करियर निवडावं....

मुलांच्या अभ्यासक्रमाची छापील माहिती देतात. वर्षातून तीन ते चार वेळा एव्हॅलुएशन शीट देतात - यात मुलांच्या भावनिक / शैक्षणिक / सोशल स्किल्स, मोटर स्किल्स, इत्यादीचा आढावा घेतात. पास /फेल लिहिण्यापेक्षा इमर्जिंग स्किल्स, मास्टर्ड द स्किल किंवा एक्सीड एक्सपेक्टेशन असे लिहिलेले असते. फार बारकाईने विचार करून लिहितात असा माझा तरी अनुभव आहे.
>>>>> आमच्या शाळेत हे सगळे अगदी असेच आहे. रिपोर्ट कार्ड न म्हणता इव्हॅल्यूएशन शीट म्हणतात. ४ पानी आहे ते शीट. त्यात प्रत्येक quarter मधे मास्ट्र्ड की गेनिंग वै असे सगळे आहे. gross motor skills, behavioral aspects, physical असे बरेच आहे. शिवाय टीचर्स रिमार्क्स मध्ये त्यांनी जे लिहीले होते तिच्याबद्दल (नर्सरी च्या वर्षी ४ वेळा) ते आमच्या निरीक्षणाशी तंतोतंत जुळले त्यामुळे विचार करुन लिहीतात हे नक्की.
चौथी पर्यंत परीक्षा नाहीये. फक्त assessment आहे. प्रत्येक Parent-teacher मिटींग मध्ये त्याविषयी बोलतात.
नर्सरी मध्ये pre-writing readiness हेच फक्त होते. (मी आत्ता तिची activity book काढून पाहीली.) त्यात standing/sleeping/slanting lines , चित्रे रंगविणे, big-small हेच प्रामु़ख्याने आहे. मात्र nursery rhymes मात्र खूप होत्या. शाळेतून २ पुस्तके मिळाली होती ज्यात त्या कविता व त्यांची चाल हे लिहीलेले होते. पण त्याचा सराव कंपल्सरी नव्हता.
शाळेत senses workshop होते ज्यात पाचही इंद्रीयांच्या वापराचे अ‍ॅक्चुअल प्रात्यक्शिक होते एकेका वर्गात.
अजून लिहीन वेळ मिळाला की.

प्राची, अजुन माहीती लिही नक्की.
तुमच्या कुठल्या शाळा आणी कुठला अभ्यासक्रम ते पण शक्य असेल तर लिहिता येईल का?

इथे फक्त भारतातल्या नर्सरी बद्दलच अपेक्षित आहे का?
मी खाली काही गोष्टी लिहिते त्या जपानी डेकेअर, ब्रिटीश नर्सरी आणि घरी आम्ही करतो, आणि आजुबाजुचे काही पालक्/मुल ही करतात. कदाचित अजुन काय असते याचा अंदाज करायला उपयोगी आहे असे वाटते. हे इथे चालत नसेल तर कृपया सांगावे, काढुन टाकेन.

मुलांचे वय- ३- ४ वर्षे, एक क्लास्/वर्ग्

- अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास (ओळख डोळ्यांना की कानांना. म्हणजेच मुलांना अक्षरे पाहून ओळखण्यावर भर की उच्चार/नाद यावर भर)
शाळेत् आणी डेकेअमधे उच्चार नाद यावर भर. थोडीफार अक्षरओळख असते पण ती मुख्यत: शब्द आणी आवाजामार्फत.

- शब्दओळख
शा. आ. डे. मधे नविन पुस्तके, गोष्टी, गाणी, गप्पा यामार्फत नवनविन शब्द, संकल्पना ओळख. पण लिखित शब्द नाही.
घरीपण हेच चालु असते.

- अक्षरे गिरवणे
नाही. शाळेत थोडफार चालु झालय. घरी काही करत नाही. डेकेअर मधे पण करत नाहीत.

- अंकपरिचय ते अंकाट्टाहास
अंकपरिचय करतात. सगळीकडे १ ते १० मोजणी करतात. पण ते फळ्यावर लिहुन नाही. असच गंमत म्हणुन, काउंट्डाऊन म्हणुन
घरी खाऊ देताना दोन बिस्कीट/ चार बिस्कीट अस मोजतो. मणी/ ब्लॉक खेळताना मोजणि करतो. एक ते दहा आकडे मोजे पर्यंत शांत बसणे असे खेळ खेळतो.

- हात आणि मेंदु यांचा वापर- चित्र काढणे
हे अगदी लहान पणापासुन करतात सगळीकडे. पण काय काढायच ते डिक्टेट करत नाही. कागद पेन्सिल /खडू देऊन काय हवे ते करायला सांगायचं. मुलाने एक रेघ काढुन त्याला हत्ती आहे अस म्हटलं तर आपण त्यात खरच हत्ती दिसतोय का ते बघायच. बहुतेक वेळा दिसतोच ! जे काढलय ते छान म्हणाव. सुरुवातीला रेघोट्या, गोल काढतात मुले. खरच चांगलं काढायला लागली तर विषय द्यावे पण त्या विषयानुरुप चित्र काढेल अशि अपेक्षा ठेऊ नये. माहितीतली बरीच साडेतीन वर्षाची मुले फार छान चित्रे काढतात. अगदी काय काढलय ते नीट ओळखता येण्या एवढि.
सगळिकडेच (घरी,शाळेत्,डेकेअरमधे) वॉटर्कलर वगेरे पण देतात. हात कपडे माखले तरी चालतं. प्ले डो देतात. कागद चिकटवायला , फाडायला देतात. मोठे मणी ओवायला, मनोरे करायला देतात.

- रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे
हो. बहुतेक तीन वर्षाची मुले रंग चांगले ओळखतात. सगळीच मुलं मायन्युट शेडस ओळखत नाहीत. पण मुख्य रंग नक्कीच. चित्रात रंग भरणे येत मुलांना. डे केअर मधे नेहेमी देतात. घरी, शाळेत देत नाही.

- दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?)
डावे उजवे, वर खाली कळत मुलांना. वेगळ शिकवायची गरज नाही. आपण नेहेमीच्या बोलण्यातुन शिकवता येत. या वयाची बरीच मुलं बुट चुकीच्या पायात घालतात अस माझ निरिक्षण आहे. आईने सांगितलं तर मुद्दाम बदलत नाहीत.

- ऑड मॅन आउट (उद्या मी इथे एक वर्कशीट स्कॅन करुन टाकते. त्यात अशी उदाहरणं आहेत)
शाळेत , डेकेअर मधे करत नाहीत. पण साधारण गोष्टी मुलांना कळतात. म्हणजे हत्तीला सोंड नाहीए. सशाला कान नाहीए अशा प्रकारच्या. पण फार कठीण काही अपेक्षा करु नये.
निरिक्षण शक्ती वाढवण्यासाठी इतर उपाय आहेत. जस आपण एखाद्या फुलाविषयी बोलताना, त्याचा रंग, आकार, पान, पाकळ्या अशा वेगवेगळ्या भागाविषयी सहज बोलावे. मग मुलं पण बारकावे बघायला आपणच शिकतात.

- Circle the friends of letter E
Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
दोन मुलं डावीकडे पाहून सायकल चालवतात , एक उजवीकडे पाहून...
नाही.

गाणी सगळ्यात महत्वाची आहेत. गाण्यांशिवाय नर्सरी पुर्ण होऊच नये.
इथे डेकेअर मधे, शाळेत दोन्ही कडे दिवसाची सुरुवात आणी शेवट गाण्यानेच करतात. घरी सुद्धा गाणी बडबडगीते चालु असतात. खरतर मुलांना नवनविन शब्द उगीच कुठल्यातरी तालात म्हणुन बघायला आवडते.
गोष्टी, पुस्तक वाचन गरजेचे आहे. हेही शाळेत / डे केअर मधे /घरी रोज करतात. पुस्तक मुल फक्त बघतात. शिक्षक वाचुन दाखवतात.
गप्पा- मला वाटतं या वयाची मुलं फार गप्पा मारतात. मी रोज संध्याकाळी डेकेअर मधे गेले की सगळ्या मुलांना गप्पा मारायच्या असतात, काही तरी सांगायचे असते. त्यामुळे तुमच्या शाळेत गप्पा मारल्यावर रागावतात का हे माहीत करुन घ्या. कदाचित त्यामुळे मुलं गप्पा मारत नसतील. भाषेची अडचण असेल तर थोडे दिवसांनी निघुन जाईल.

माझी वरची निरिक्षणे फक्त माझ्या घरची नाहीत. आजु बाजुच्या मुलांची सुद्धा आहेत.

इतकी काळजी करण्यासारखा आहे का नर्सरी अभ्यासक्रम ?

आज २०-२५ वर्षाची मुलं आहेत त्यातली बरीचशी शहरी मुलं तरी नर्सरी, केजी असल्या प्रकारातून गेली असणार. त्यांचं शिक्षण, स्वतंत्र विचार करण्याची कुवत, सारासार विवेक या सगळ्याचा अन त्यांच्या नर्सरी अभ्यासक्रमाचा काही कोरिलेशन असणार का ?

तुमच्या मुलांना घराबाहेर रहाणे, इतर मोठ्या व्यक्तींचं ऐकणे, नियम पाळणे, थोडं फार स्वावलंबन - डबा खाणे, बुट-चपल घालणे, काढणे, इतर मुला मुलींबरोबेर खेळणी/ पुस्तके शेअर करणे या गोष्टी शिकवल्या या वयात तर पुरे की.

तुमच्या मुलांना घराबाहेर रहाणे, इतर मोठ्या व्यक्तींचं ऐकणे, नियम पाळणे, थोडं फार स्वावलंबन - डबा खाणे, बुट-चपल घालणे, काढणे, इतर मुला मुलींबरोबेर खेळणी/ पुस्तके शेअर करणे या गोष्टी शिकवल्या या वयात तर पुरे की.>>>
हे आम्हांला पटतंय हो, पण शाळांना नको का पटायला??? तोच तर रैनाचा प्रश्न आहे की आजकाल शाळांमध्ये जो अभ्यासक्रम आहे, त्याचा नक्की हेतू काय? कारण, बर्‍याच शाळेत तुम्ही जे लिहिलं आहे त्यापेक्षा जास्त आणि खरं तर अवाजवी अपेक्षा केल्या जातात एवढ्या लहान मुलांकडून Sad

आम्हीही छोटी बालवाडी, मोठी बालवाडी शिकलोय. पण तेव्हा फक्त खेळ, गाणी, गोष्टी एवढंच असायचं शाळा म्हणजे. पहिलीत जायचो, म्हणजे ५ पूर्ण करायचो, तेव्हा लेखन सुरु व्हायचं. आजकाल चित्र वेगळं आहे. म्हणून तर प्रश्न पडतात ना???

रैना, तू म्हणतेस तश्या वर्कशीटस् वगैरे प्रकार आम्ही वापरत नाही. अश्या प्रकारच्या वर्कशीटसची पुस्तकं आहेत ती एल्केजी आणि युकेजी मध्ये आहेत, प्रत्येकी तीनतीन अशी. त्यातही अश्या वर्कशीटसमधून अक्षर लेखन, अंकलेखन, अंकमोजणी सोप्प्याप्रकारे शिकवली जाते.
आमच्या एका वर्कशॉप्समध्ये एका लेक्चररनी सांगितलं होतं, की वर्कशीटस् कश्या असाव्यात??? तर ज्या तयार करताना टीचरला खरं तर खूप मेहनत घ्यावी लागेल, पण सोडवताना मुलांना हसतखेळत सोडवता याव्यात. Happy
या लहान मुलांच्या लेव्हलनी नाविन्यपूर्ण्,त्यांना आकर्षित करतील अश्या वर्कशीटस् बनवताना खूप मेहनत पडते खरं. Happy

माझ्या अनुभवानुसार खुपश्या नर्सरी स्कुल चा हेतु मुलांना नेक्स्ट Admission साठी प्रिपेर करणे हा पण असतो (जर तुम्ही jr Kg/jr kg / 1 yr. साठी शाळा बदलणार असाल तर), कारण मग दुसर्‍या शाळेत मुलाचा "Interview" चांगला होतो ...

तुमच्या कुठल्या शाळा आणी कुठला अभ्यासक्रम ते पण शक्य असेल तर लिहिता येईल का? >> शाळांची नावे, ठिकाण ... ह्या बद्द्ल पण लिहिता आले तर बरे होइल ... अनुभव शेअर करता येईल

माझ्या मुलाच्या नर्सरीमधे A to Z, 1 to 20 लिहायला आणि ओळखायला होते. १ ते ५ फक्त मोजायला होते. बाकी गाणी, चित्र रंगवणे, ठिपके जोडुन चित्र तयार करणे, खेळ हे सगळे होतेच.
ज्यु. के. जी. (CBSE) ला सोपे गेले त्याला यामुळे. आणि मुले पटकन शिकतात सगळं. आपल्याला जेवढा बाऊ वाटतो, तेवढं अवघड नाही जात त्यांना.
त्याच्या शाळेच्या प्रिंन्सी. म्हणाल्या होत्या, " तुम्ही SSC मधुन शिकलात आणि तशी तुलना करताय म्हणुन तुम्हाला खूप अभ्यास असे वाटते, पण मुलाना अशीच सवय असेल तर त्याना काही वाटत नाही. "
मला गेली २ वर्षे पाहून हे पटलय.

मात्र...मात्र.....त्यांच्या प्रोजेक्ट्सनी आम्ही हैराण झालो. ( ज्यु. आणि सी. के. जी.) अर्थात आमचा कला क्षेत्राशी दूरदुरचा संबंध असल्यामुळे असेल तसे....:-))

छान बाफ आहे रैना. काल वाचल्यापासुन आठवायचा प्रयत्न करत होते माझी लेक ३ वर्षाची असताना तिला शाळेत काय अभ्यासक्रम होता ते. शेवटी आता तिचं ठेवलेलं जुनं बाड काढलं सगळं आणि बघितलं.
(तीन पुर्ण ते ४ पुर्ण हा वयोगट)

१) अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास
अडीच ते तीन वर्षापर्यत शाळेत सुरुवातीला उच्चार आणि नाद यावरच फक्त भर होता. नंतर थोडी अक्षरओळख झाल्यावर मग वर्कशीट्स होती ज्यामधे पानभर दिलेल्या अक्षरांमधुन सांगितलेलं अक्षर ओळखणे (त्या अक्षराला सर्कल करणे) एवढंच अपेक्षीत होतं. हे साधारण ६ महिने चालु होतं. नंतर दिलेली अक्षरं ट्रेस करुन, ती हळुहळु काढायला शिकवली.

२) शब्दओळख
एकेक अक्षर ओळखता यायला लागलं की त्या अक्षरापासुन सुरु होणारे नवीन शब्द कळावे म्हणुन तशा चित्रांची वर्कशीट्स द्यायचे. च ओळखता यायला लागला की Alligator, Ant, Apple असे शब्द शिकवुन मग वर्कशीट्स मधे Alligator, Ant, Apple आणि fish अशी चित्र खाली त्यांच्या नावांसहीत देत असत. त्यातुन मुलांनी A पासुन सुरु होणार्‍या चित्रांना सर्कल करणं हीच अपेक्षा.
शिवाय पुस्तकं, गोष्टी, गाणी, गप्पा यामार्फतही अनेक शब्दांची ओळख. पण स्पेलिंग वाचता/ओळखता यावं ही अपेक्षा नाही.

३) अक्षरे गिरवणे
अधुन मधुन गोल, त्रिकोन, चौकोन हे आकार आधी फक्त बोटानी आणि मग पेन्सिलनी ट्रेस करणे. आकार तंतोतंत तसाच यावा ही अपेक्षा नाही.

४) अंकपरिचय ते अंकाट्टाहास
अंकपरिचय होता. दिलेल्या चित्रात किती प्राणी/वस्तु आहेत ते चित्रांवर बोट ठेउन मोजायला शिकवलं. (लिहायला नाही!) वर्गात आज किती मुलं हजर आहेत, हे मोजायचे.

५) रंग ओळखणे. चित्रात रंग भरणे
आधी मुलांना पुर्ण स्वातंत्र्य होतं. रंगांची पुर्ण ओळख झाल्यावर मग ह्याची वर्कशीट्स ४-५ महिन्यांनी आली. उदा: चित्रात १ आकडा जिथे जिथे आहे, तिथे लाल रंग द्या, २ आकडा आहे तिथे निळा द्या, ह्या प्रकारची. आपोआप सगळं पक्क होत गेलं.

६) दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?)
ह्या बाबतीत सावली म्हणत्ये त्याला अनुमोदन.

७) Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
दोन मुलं डावीकडे पाहून सायकल चालवतात , एक उजवीकडे पाहून...
हे मुद्दा नीट कळला नाही मला. कदाचित तु वर्कशीट टाकलस स्कॅन करुन की कळेल.

८) गोष्टी, गाणी, गप्पा लिहीलेच नाही कारण ते शाळेत अंतर्भूत नाहीच.
हे मात्र खरंच धक्कादायक आहे Sad

हा माझा सगळा अनुभव जरी जपान मधला असला तरीही ह्याच शाळेत माझी मुलगी ६ वर्षे पुर्ण होई पर्यंत गेली. आणि पहिलीपासुन ती तोक्यो मधल्या इंडियन शाळेत (सी.बी.एस्.इ बोर्ड) जायला लागली. पण तो पर्यंत ह्याच शाळेत तिची तयारी भारतातल्या यु केजी लेवलपेक्षा थोडी जास्तच झाली होती.

खुप महत्वाचे आहे हे सगळे. माझा मुलगा प्ले ग्रुप ला जातो, तो २ वर्षांचा असल्यापासुन. आता तो २ व. आणि ३ म. चा आहे. मला हेच सगळे प्रश्न पडतात. @मामी,<<मी एल के जी यू केजी मध्ये जी बालगीते शिकवतात ना, मछली जलकी रानी है बाबा ब्लॅकशिप आइज आर ब्लू वगैरे त्याची क्यूट इलस्ट्रेशन्स काढून ती क्रेयॉन/ केचपेन ने रंगवून त्या बरोबर टेक्स्ट असे ड्रॉइंगपेपर वर पोस्टर बनवू शकते. त्याला फ्रेम किंवा माउंट करता येते. कडेने टेप लावता येते. कोणाला हवे असल्यास सांगा. वीकांताला बनवून पाठवे<<>> मामी, मला मिळेल का? अधिक माहिती वि.पु. मधे सांगाल का? इथे सांगितली तरी चालेल.

आमच्या एका वर्कशॉप्समध्ये एका लेक्चररनी सांगितलं होतं, की वर्कशीटस् कश्या असाव्यात??? तर ज्या तयार करताना टीचरला खरं तर खूप मेहनत घ्यावी लागेल, पण सोडवताना मुलांना हसतखेळत सोडवता याव्यात>> एकदम बरोबर.
सोशलायझेशन होणे, स्वभान येणे हा सर्वात महत्वाचा हेतू असावा, अभ्यासक्रमाकडून अवाजवी अपेक्षा आहेत असे वाटत असेल तर किमान पालकांनी तरी मुलांकडून त्या पूर्ण होण्याचा अट्टाहास करु नये. नाही आली एखादी गोष्ट तर चिडचीड, वैताग नको. शाळा आणि अभ्यास ही आनंदाने, मजेने करण्याची क्रिएटीव्ह बाब आहे एवढे जरी मुलाला वाटले तरी पुरेसे आहे.

>>सोशलायझेशन होणे, स्वभान येणे हा सर्वात महत्वाचा हेतू असावा, अभ्यासक्रमाकडून अवाजवी अपेक्षा आहेत असे वाटत असेल तर किमान पालकांनी तरी मुलांकडून त्या पूर्ण होण्याचा अट्टाहास करु नये. नाही आली एखादी गोष्ट तर चिडचीड, वैताग नको. शाळा आणि अभ्यास ही आनंदाने, मजेने करण्याची क्रिएटीव्ह बाब आहे एवढे जरी मुलाला वाटले तरी पुरेसे आहे.>>
अनुमोदन आगाऊ!

हा फरक 'कोणता बोर्ड' ह्यामुळेही पडत असावा. CBSE, ICSE ह्यांचा अभ्यासक्रम हा SSCपेक्षा जास्त आहेच, सहाजिकच प्लेग्रूपापासून सुरूवात जास्त अभ्यासाने होते. पाल्याची लिहायची सुरूवात कर्सिव्हनेच होते. सुटी अक्षरं शिकवत नाहीत. मात्र मुलांवर जितकं टाकू तितकं ती शिकतात, त्यामुळे ह्या माध्यमांमधल्या मुलांना पहिल्यापासूनच खूप जास्त अभ्यासाची, मान मोडून अभ्यास, प्रोजेक्ट्स याची सवय करावी लागते. (हे अनावश्यक ओझं आहे असं आमचं मत आहे, पण हा प्रश्न सापेक्ष आहे- प्रत्येकाचं मत ह्या बाबत वेगळं असू शकतं.) कधीकधी ह्या माध्यमांच्या शाळा निवडणं ह्याला इलाज नसतो, हेही काही उदाहरणात पाहिलंय, पण मग पाल्याला ट्रेन करणं, हेच उरतं फक्त आपल्या हातात!

आम्हाला पर्याय होता, म्हणून आम्ही SSC बोर्डाशी शाळा निवडली. आत्ता मुलगा दुसरीत आहे. आत्ता त्याचा अभ्यास बघून तेवढाही आत्ता ह्या वयात गरजेचा आहे का असा प्रश्न पडतो. मात्र प्लेग्रूपचे, नर्सरीचे अनुभव चांगले. तो दोन वर्ष प्लेग्रूपमध्ये होता, मग ज्यु केजी आणि मग सि केजी. सर्व शिक्षण हसतखेळत, कोणतेही बर्डन नाही. पुस्तकंही नव्हती. ईव्हॅल्युएशन शीट्स होती. गाणी, गोष्टी, एकत्र डबा खाणे, शी-शू समजणे- प्लेग्रूपमध्ये इतकंच. ज्यु, सि केजीत ह्याच्या जरा पुढच्या पायर्‍या- अक्षरओळख, आकडेओळख, मोजणे, रंग समजणे, चित्र काढणे वगैरे. पहिलीपासून मात्र अभ्यास असतो खर्‍या अर्थाने आणि आधी तीन वर्ष मजा असल्याने, पहिलीचे तीन महिने जरा अवघड जातात.

http://www.vibgyorkids.net/images/PRESCHOOL%20SYLLABUS%202.pdf
this is a pre-school syllabus link

don't know how to attach a file. following is the assessment sheet for Jr.KG

ACHIEVEMENT SCALE:
GRADE ACHIEVEMENT GRADE ACHIEVEMENT
SUBJECT SKILLS ASSESSMENT
SA Skills Achieved L/D Learning Developing
GM Gaining Mastery TA Trying to Attempt

PHYSICAL DEVELOPMENT
GROSS MOTOR SKILLS
Jumps into a hoop
Rolls a ball to a target
Catches a ball thrown to him / her
Can kick a ball in a specified direction
Walks sideways
Balances a beanbag on the head
Moves rhythmically to music
Walks on a balance beam unaided

FINE MOTOR SKILLS
Sorts pulses/ legumes
Cuts with scissors
Plays with puzzles
Copies shapes
COGNITIVE DEVELOPMENT
UNDERSTANDING CONCEPTS

Displays an understanding of the themes and answers related questions
Recognises and names colours
PERCEPTUAL SKILLS
Identifies missing parts, similarities and differences in pictures/objects
Sequences pictures to tell a story
Completes puzzles
LANGUAGE DEVELOPMENT
TALKING / ARTICULATION
Retells stories
Relates recent experiences
Talks about self and family
Recites short rhymes / poems with appropriate expressions and gestures
Uses positional words
Asks questions to obtain information
Asks questions appropriate to a situation

LISTENING SKILLS
Follows simple directions
Listens attentively to concept related information
FORMAL WORKS
READING SKILLS
Recognises and names uppercase letters
Recognises and names lowercase letters
Associates all the letters to its appropriate phonic sound
Associates all letters to related vocabulary
Displays an interest in books
Turns pages in a book
Reads sight words/ phrases from the reader
Connects letters in the correct alphabetical order

MATHEMATICAL SKILLS
Recognises and names numerals
Rote counts
Associates numbers to their value
Knows the days of the week
Knows the months of the year
Classifies objects according to their use
Categorizes objects
Seriates objects
Grades objects according to size
Recognises shapes
Understands spatial relationships

WRITING SKILLS
Writes upper case letters
Writes single digit numerals
Copies shapes and lines
Draws a self-portrait
Traces along a dotted line
Colours within the outline
SOCIAL DEVELOPMENT
ROLE PLAYING
Participates with others in dramatic play

FLEXIBILITY
Accepts changes in plans and schedules
Participates cooperatively in small and large group activities

UNDERSTANDING FEELINGS
Identifies and expresses own feelings and thoughts
Understands how others feel and think
Comforts friends when they are upset

SOCIAL SKILLS
Plays cooperatively in a group
Shares materials with other children
PERSONAL DEVELOPMENT
DEVELOPMENT OF SELF RELIANCE AND ORGANIZATIONAL SKILLS
Completes assigned tasks
Manages routine tasks independently
Concentrates on the task at hand
Comprehends verbal instructions
Uses the washroom independently
COMPUTER
COMPUTER EXPERIENCE
Manipulates the mouse
Shows keen interest
Follows instructions and performs tasks

There is no home work for nursery in my son's school. For JKG and SKG every friday homework is assigned and should be returned by tuesday. max 5 pages homework.

He has three work books:

alphabet book (writing alphabet and drawing 2 objects starting that alphabet)

number book (writing number and drawing same no. of objects)

activity book. (this includes activities for numerical, reading, writing and perceptual skills)

Plus sight reading books every week two pages needs to sighted and read. Red, blue, yellow and brown sight reading books over till date. Usually following is reading matter.
for red book it was as following:
1. red ball
2. this is rahul
3. Rahul has a red ball
4. Rahul plays with a red ball
5. Rahul lives in a red house.
6. Draw a objects that are red in colour and colour them red.

so far we have no complaint about syllabus, homework, teacher-student-parent interaction apart from that they are calling annual sport event as x-mas fiesta, we will be talking to the principal soon about it.

Pages