डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कारभार

Submitted by हिम्सकूल on 15 April, 2010 - 10:12

सहजच नेट वर भटकताना एक धक्कादायक पण तितकीच आचंबित करणारी बातमी वाचली.
http://www.esakal.com/eSakal/20100415/5257657138283589530.htm

त्या बातमीची सत्यता पडताळी साठी पुढील वेबसाईटवर भेट दिली..
http://www.bamu.net/

मराठवाडा विद्यापीठातील उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच विद्यापीठाची वेबसाईट हॅक केली आहे..
त्याचे परिणाम कसे आणि किती होतील माहिती नाही.. पण ज्यांनी साईट हॅक केली त्यांच्यावर सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई होणार की नाही? तसेच विद्यापीठतील जो कारभार त्यांनी सगळ्यांसमोर आणला आहे त्यामध्ये काही बदल घडून येतील का?

ह्या विद्यार्थ्यांनी निवडलेला मार्ग बरोबर की चूक? अश्याच प्रकारच्या घटना बाकीच्या विद्यापीठात पण घडू शकतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर की चुक माहीत नाही. पण त्या आंदोलकांच्या मागण्याला पाठींबा.
अर्थात असल्या आंदोलनामुळे, बामुच्या प्रशासनावर काडीचाही फरक पडणार नाही. अन्यथा आत्ता पर्यंत साईट पुर्ववत करण्याचा तरी प्रयत्न झाला असता.
पत्रकारांसमोर म्हणतील की कडक कारवाई करु .. पण राजकीयपक्ष आपले हात धुबुन घेतील तो पर्यंत आंदोलकांचे शिक्षण पुर्ण होईल, नविन विद्यार्थी त्याच प्रश्नांना सामोरे जातील. प्रशासन जसे आहे तसेच राहील MU चे BAMU केल्याने काम थोडीच सुधारणार होते. अर्थात बहुतेक सर्व विद्यापिठात परीस्थिती थोडीबहुत अशीच आहे .. बामुच्या लोकांनी वेगळ्या मार्गाने प्रश्न जगाच्या समोर आणला. सगळे जग बघतय पण बामु प्रशासन झोपले आहे.

बामुच्या प्रशासनावर काडीचाही फरक पडणार नाही >>> १०० आहे गुरु.

ह्या विद्यार्थ्यांनी निवडलेला मार्ग बरोबर की चूक?>>> माझ्या मते वेबसाईट हॅक करणे हा मार्ग चूकच आहे.

ह्या विद्यार्थ्यांनी निवडलेला मार्ग बरोबर की चूक >> बरोबर !!

हॅक करने तत्वतः चुक असले तरी त्यापाठीमागे त्यांनी त्याची कारणमिमांसा दिली आहे. हॅक केल्यामुळेच आख्या जगात त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न समोर आला आहे, कुलगुरुंचा / विद्यापिठाचा अनागोंदी कारभार समोर आला. महा प्रशासनाला आता लक्ष घालने क्रमप्राप्त झाले. एखादे रास्ता रोको / घेराव असे आंदोलन करुन जी प्रसिद्धी (चांगली) मिळाली नाही ती ह्यामुळे मिळाली. त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन !

जय हो !

हिम्स ते वडा नाही वाडा आहे. Happy