महाराष्ट्र सी ई टी
महाराष्ट्रात इंजिनियरिंग आणि मेडिकलसाठी सी ई टी असते. त्यासाठी हा धागा आहे.
१. ही परिक्षा कधी व कुठे असते?
२. किती प्रश्न असतात?
३. अभ्यास कसा करावा? कोणती पुस्तके वापरावीत?
४. साधारणपणे मेडिकल व इंजिनियरिंगची गेल्या वर्शीची कट ऑफ लेवल काय होती?
५. अभ्यासाबाबतचे आपले अनुभव.
६. हाच अभ्यास इतर सी ई टीला उपयोगी ठरु शकेल काय?
इ इ ....
माझ्या मुलाला या एप्रिलमध्ये तीन वर्ष पुर्ण झाली...... कालपासुन तो "नर्सरी" मध्ये जायला सुरू झाला. मला असे विचारायचे आहे की आपण "interactive" पद्धतीने किंवा मुलाला कंटाळा न येता खुप आवडेल अश्या प्रकारे त्याचा अभ्यास किंवा इतर गाणी गोष्टी कश्या प्रकारे शिकवु शकतो...........
माझ्या भाचीच्या इंजिनीयरींग प्रवेशाचा फॉर्म दोन दिवसात भरायचा आहे. ती मध्य प्रदेशात आहे आणि तिला AIEEE द्वारे पुण्यात IT/Computer engineering साठी प्रवेश घ्यायचा आहे. पुण्यातील चांगल्या engineering colleges ची नावे सांगाल का?
मला स्मरणशक्ती वाढवणे आणि टिकवणे या संदर्भात ठाणे - मुंबईमध्ये कुठे क्लासेस आहेत का याची महिती हवी होती. कोणी असे क्लासेस केलेले आहेत का?
अनुभव किंवा कुठलिही माहिती असेल तर इथे किंवा विपुत लिहा..
धन्यवाद.. 
खाजगी ट्युशन्स घेणार्या लोकांचे हितगुज
बरेच लोक खाजगी ट्युशन्स घेतात. यात बालवाडी च्या शिकवण्यांपासून मोठ्या प्रोफेशनल कोचिंग क्लास पर्यंत सर्वांचा समावेश आहे. पूर्ण वेळ ते नोकरी सांभाळून अर्धवेळ करणारे असेही लोक असतील. रेगुलर शाळा कॉलेजच्या क्लासेस पासून झटपट इंग्रजी बोला असे क्लासेस असणारेही लोक असतील. हा बीबी सर्वाना खुला आहे.
हा बीबी खास या विषयाच्या हितगुजसाठी आहे.
१. आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी केली? कसा वाढवला?
२. व्यवसायातील समाधान.
३. आपले काम आणखी समाधानकारक व्हायला काय करु शकतो?
४. व्यवसायातील अडचणी
मला ५ बाय ४ फूट असा व्हाइट बोर्ड हवा आहे. शाळा कॉलेजात असतोतसा.. ज्यावर ड्राय एरेजर पेनने लिहिता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे कुठे मिळेल. बोर्ड फक्त लिहिण्यासाठी हवा आहे म्हणजे नॉन मॅग्नेटिक हवा.
साधारण किंमत किती असेल?
भिंतीला लावायला हूक असतात का? की स्टँडही येते त्याच्या बरोबर?
साधारण आकार ५ बाय ४ किंवा ३ फूट
१५० बाय १२० किंवा ९० सेमी.
अमेरिकेला आल्यावर व्हिसा, घरच्या जबाबदार्या अशा कारणांनी अनेक स्त्रियांना नोकरी करणे शक्य होत नाही. बर्याच स्त्रिया स्वतःहून मुलांसाठी आपली नोकरी बाजूला ठेवतात. एकदा मुलं शाळेला जायला लागली की मग पुन्हा नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु मोठ्या कालावधी नंतर सुरुवात करणे फार कठिण जाते. डिग्री जुनी झालेली असते. स्किल सेट सध्याच्या जॉब मार्केटपेक्षा मागे पडलेला असतो. अशावेळी बरेचदा नवीन क्षेत्रात शिक्षण घेणे किंवा आपल्या डिग्रीला पूरक शिक्षण घेणे हे दोन पर्याय शिल्लक राहतात. योग्य माहिती असल्यास / मि़ळवल्यास आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास अमेरीकेत शिक्षण घेणे सोपे आहे.
मला बी. ए. आर्टस् पदवी नंतर भारतात, खास करून मुंबईत कोणकोणत्या प्रकारच्या करियर संधी उपलब्ध होऊ शकतात, त्यासाठी काय शिक्षण आवश्यक आहे, काय पात्रता आवश्यक आहे जेणेकरून सध्या असलेल्या नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतील याविषयी मार्गदर्शन हवे आहे. सध्या माझ्या अशा काही मैत्रिणींना त्यांच्या जॉबमध्ये सेटल होण्यासाठी ही माहिती हवी आहे.
मैत्रिणींचे सध्याचे जॉब्ज याप्रमाणे आहेत :
सध्या त्या कॉम्प्युटर ऑपरेटर, डेटा एनट्री मध्ये आहेत.