मधंतरी माझ्याकडे काम करणार्या बाईच्या मुलीच्या शिक्षणासंबधी इथल्याच एका धाग्यावर मी माझ्या अडचणी विचारल्या होत्या. मला अगदी लगेच उत्तरे मिळाली, पण त्याचवेळी असंही लक्षात आलं की कितीतरी लोक इकडे आपला खारीचा वाटा उचलत आहेत. आपण आपले अनुभव / अडचणी आपण शेअर इकडे करुया का?
आपले बरे/वाईट दोन्ही अनुभव लिहूया.
नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.
मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.
'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).
३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. ही देणगी रोख रक्कम किंवा संस्थेला उपयुक्त अशा भेटवस्तुच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. संयुक्ताच्या काही सदस्यांनी काही संस्थांना भेटी दिल्या व त्यानुसार सध्या निवडलेल्या २ संस्था.
काल माझ्या मुलाच्या नावाने नॅशनल स्टुडंट लिडरशिप कॉन्फरन्सचे पत्रक आले. मी या संबंधी माहिती शोधतेय. त्यांची साईट, फेसबुक वगैरे पाहिले. त्याच्या शाळेतही विचारणार आहे. कुणा मायबोलीकरांच्या पाल्याने हा समर प्रोग्रॅम केला होता का?/या वर्षी करणार आहेत का? १५ मार्चच्या आत फॉर्म्स पाठवायचेत. तेव्हा कुणाला माहिती असेल तर कृपया मदत करा.
कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?
मुलांची IQ टेस्ट करावी का? मला ह्या प्रश्नाबद्दल येथे चर्चा करावीशी वाटली. आपलं काय मत आहे?
मला स्वता:ला ही कल्पना नाही आवडली. मुलांचा IQ स्कोअर जास्त आला तर काय त्याकडे जास्त महत्वाने पाहुन लक्ष देणार का कमी आला तर गरज आहे वर काढायला म्हणुन लक्ष देणार?
अलिकडेच सुचलेला एक नवा खेळ. यात मुलांना साध्या बेरजा आणि तुलना करता येईल.
साहित्यः
वेगवेगळ्या रंगाचे ओरिगामी कागद पाच, एक मोठा लांब कागद, आणि नोंद करायला वही , पेन्सिल
कृती:
सर्वात आधी अशा प्रकारच्या कृतीने उड्या मारणारे बेडुक तयार करुन घ्या. इंटर्नेटवर सर्च केल्यास बर्याच कॄती मिळतात, त्यातली हि अगदी सोप्पी वाटते.
http://familyfun.go.com/printables/printable-origami-jumpin-frog-703288/
जर मुल मोठं असेल तर त्यालाच ते बेडुक बनवायला शिकवा , नाहीतर स्वतः करुन द्या. हे बेडुक बोटाने दाबले की पुढे उड्या मारतात.
लहान मुलांना बोट बघायला आवडते. आणि ती कशी तरंगते याचं आश्चर्य सुद्धा वाटतं. त्यासाठी हा खेळ.
यात इतक्या लहान मुलांना लगेच वस्तुमान वगरे काही सांगायची गरज नाही. नुसत हलकं जड ही संकल्पना समजावता येईल.
साहित्य:
एक प्लास्टिकचा ,आणि एक रबराचा बॉल/ खेळणे, एखादे जड खेळणे जे पाण्यात बुडेल, एक पेला.
कृती:
हा खेळ आंघोळ करताना बाथटब मध्ये खेळता येईल किंवा बादलीत खेळता येईल.
आधी मुलाला, कुठली वस्तू जड आहे कुठली हलकी हे नुसतं सांगायचं. मग एक एक वस्तू पाण्यात बुडवून दाखवायची. आणि कुठली जास्त बुडते कुठली तरंगते , या बद्दल बोलायचं.पेला रिकामा कसा तरंगतो आणि भरलेला कसा बुडतो ते दाखवायचं.
वेगवेगळे रंग एकत्रकरून नवीन रंग बनवण्याचा खेळ. लहान मुलांना ही जादुच वाटते.
साहित्य:
सात आठ प्लास्टिकचे पारदर्शक ग्लास. वॉटरकलर्स, पाणी,
किंवा
लाल , निळा आणि पिवळ्या रंगाचे प्लास्टिकचे पारदर्शक तुकडे/कागद
कृती:
ग्लास मध्ये अर्धा ग्लास पाण्यात थोडा लाल रंग मिसळून लाल पाणी करून घ्या.
तसेच वेगवेगळया ग्लास मध्ये पिवळे आणि निळे पाणी करून घ्या.
आता रिकाम्या ग्लास मध्ये वरच्या तीन पैकी कुठलेही दोन रंगांच पाणी अगदी थोडं एकत्र करा आणि कुठला रंग होतो ते बघा.
किंवा
प्लास्टिकचे कागद एका पुढे एका धरून प्रकाशात बघा. कुठला रंग दिसतोय ते बघा.
हे निरीक्षण मुलांसमोरच लिहून ठेवा.
पत्ते हे लहान मुलांनी खेळण्याची वस्तू नाही वगरे बरीच मत आमचीपण होती. पण एकदा लेकीच्या डेकेअर मध्ये मुलांना पत्त्यांनी खेळताना बघितले आणि
मग मला जाणवलं कि या असंख्य खेळ खेळता येतील. त्यातले काही इथे लिहितेय.
साहित्य:
एक पत्त्याचा (ट्रम्पकार्ड्स) सेट.
कृती:
लेवल १: अगदी सुरुवातीला ओळख
फक्त रंग आणि आकार ओळखणे. एक एका पत्ता दाखवून विचारयच, कुठला आकार कुठला रंग
लेवल २: निरीक्षण
आकडे सुद्धा बघायचे म्हणजे एका पत्ता दाखवून रंग, आकार आणि अंक सांगायला लावायचं.
लेवल ३: मेमरी गेम