marathi

सांग ना गेलीस तू कुठे?

Submitted by रेणुका१२३ on 8 January, 2016 - 05:24

माझिया मनाचिया उंबरी
तुझी सावली अजून आहे
तो सूर्य अजूनही आहे
पण सांग ना गेलीस तू कुठे?

कैसा हा तू केलास घात
कोवळ्या मनावर आघात
अर्ध्यावाटेत सोडूनिया हात
अशी सांग ना गेलीस तू कुठे?

वाट पाहतो अजूनही दारात
तुला शोधतो अजूनही घरात
भयाण शांतता छळते मनात
सखे, सांग ना गेलीस तू कुठे?

एकदा परतुनी मजकडे ये
घट्ट तुझ्या मिठीत घे
चुका माझ्या उदरात घे
तुजवीण सांग ना मी जाऊ कुठे?

- रेणुका

शब्दखुणा: 

माझा मराठी हा देश...

Submitted by atuldpatil on 31 December, 2015 - 23:16

माझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं
पर देशी जाता येई, त्याचा आठव आठव

कोकणचा समंदर, दर्या अफाट अफाट
दूर चमचमती लाटा, काय वर्णू त्याचा थाट
त्याचा किनारा किनारा, लांब चालावं चालावं
रेघा वाळूत मारता वारं, अंगी भिनावं भिनावं

माझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं... ||१||

कडे कपारी नी किल्ले, सह्य पहाड पहाड
बोरे आणि चिंचा खात, मस्त फिरावं उनाड
रायगडी कधी जाता, हिरकणीला स्मरावं
अन राजाच्या चरणी, शीर झुकावं झुकावं

माझा मराठी हा देश, त्याचं गुण किती गावं... ||२||

शेतामंदी बळीराजा, राब राबतो राबतो
नदीमंदी गार पाणी, ऊस जोमाने वाढतो

शृंगार ४

Submitted by अनाहुत on 26 August, 2015 - 12:48

मस्त परफ्युम मिळाला , आवडेल मंजूला . घर गाठल पटकन . मंजूने दार उघडल आत जाता जाताच तिच्या कंबरेला वेढा घातला आणि तिला उचलण्याचा प्रयत्न केला . ब-याच दिवसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करत होतो . थोड वजन वाढल होत पण तरीही उचलण्याइतक होत . किमान तिचे पाय जमिनीपासुन वेगळे केले . दार अर्धवट उघड होत ते बंद केल . तिला तशीच उचलून सोफ्यावर घेऊन बसलो .

" अहो काय करताय तिकड भाजी आहे गॅसवर ती खाली लागेल . "

" असुदे ग आज आपण बाहेरूनच मागवू काही तरी . तू कुठ जाऊ नकोस मला सोडून आता . "

" ठिक आहे पण तेवढा गॅस तरी बंद करुन येते तोपर्यंत तुम्ही हात-पाय तरी धुऊन या . "

लाडक्या अशोक मामांचा ( अशोक सराफ) वाढदिवस.

Submitted by अपर्णा पाटिल on 4 June, 2014 - 01:41

तब्बल ४० वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारे तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणायला लावणारे मराठी / हिंदी सिनेमा, मालिकांमधील चतुरस्त्र अभिनेता #AshokSaraf यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

प्रांत/गाव: 

चैत्रेय

Submitted by pareshkale on 1 May, 2013 - 08:30

चैत्रेय,
चैत्रात जन्मलेला.
तुला आठवतं ?
आपली मैत्रीही चैत्रातील
नवीन धुमाऱ्या सारखी,
पान पल्लवीसारखी
सळसळणारी !

कळालही नाही
कधी गुरफटत गेलो !
मैत्रीच्या दवात
सहज भिजून गेलो.
नंतरच्या वसंता प्रमाणेच
फक्त बहरत होतो
आपण दोघं
आणि आपली मैत्री !!

या मैत्रीत मात्र
एक गमंत होती
तुला न मला
या मैत्रीला बनवायचं होतं
एक रेशीम गाठ !
कधीही न तुटणारी,
एक पालवी
दर वसंतास
जोमाने फुलणारी.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - marathi