मराठी भाषा दिवस : माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई - अनुराधा काळे11

Submitted by अनुराधा काळे11 on 1 March, 2022 - 01:48

माझे मराठीचे मास्तर
माझ्या मराठीच्या बाई

१९४२ पासून वास्तव्य गोखले वाडी, विलेपार्ले (पूर्व)
शारदाबाई चितळे बाल मंदिरातून समोरच असलेल्या पार्ले टिळक विद्यालयातून बिगरी ते मॅट्रिक होऊनच बाह्य जगात
प्राथमिक शाळेत लालबागचा गणपती बघायला नेणारे (हो! लोकल गाडीने) आपटे मास्तर मग तिन इकरबाई मग सानेसर (गद्य शिक्षक) गांगल(पद्य शिक्षक) अभ्यंकर बाई नंतर सुनीताबाई देशपांडे (हो सौ पु. ल. देशपांडेच अगदी बरोबर)
या पायऱ्यांवरून चढता चढताच लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिर इथे दर रविवारी मास्तर नसलेले फणसळकर मास्तर यांच्याकडून श्रीमद्भगवद्गीता संथा आणि रोज सकाळी सोमणमास्तरांच्या मार्गदर्शनाखाली ॐ सूर्याय नम : असे १२सूर्यनमस्कार!
अशा पार्श्वभूमीवर मातृभाषा मराठीपासून दुरावा येणे शक्य आहे का?
शिवाय शाळेत दर शुक्रवारी शेवटचे दोन तास "पुस्तकपेटी"
विवाहानंतर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर शाखा सभासद
त्या ग्रंथपाल बाईंना आमची आवड कळल्यावर निवडक पुस्तके देत. काही पुस्तके तर ४/५वर्षें कोणीही वाचली नसल्याचे मागील शिक्यावरून कळायचे
चार पैसे खर्च करण्याची ऐपत आल्यावर आवडीचे पुस्तक घेऊ लागले ते लेखकच शिक्षक आहेत उदा. परमहंस योगानंद यांचे "योगी कथामृत"
आज सहस्त्रचंद्रदर्शन वय ओलांडले पण वाचनसंस्कृती जपली आहे उत्साह आहे दृष्टी पण साथ देते आहे
आपली मातृभाषा ठेव आपणच सगळ्यांनी जपु या!!
अनुराधा काळे
9930499598

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

आज सहस्त्रचंद्रदर्शन वय ओलांडले पण वाचनसंस्कृती जपली आहे उत्साह आहे दृष्टी पण साथ देते आहे
वाह!! फारच मस्त.
छान लिहिलं आहे. अजून वाचायला आवडलं असतं, पण तुम्ही या वयात एवढं लिहिलंत तेही खूप छान!