Submitted by मिरिंडा on 24 October, 2024 - 23:06
आई उधे ग अंबाबाई,आई उधे ग अंबाबाई,उधे ,उधे उधे धृ
आई तू मांडिला सार्या जगताचा गोंधळ
गोंधळात तुझिया मी वाजवितो संबळ ...........धृ
रावणादिक राक्षस तू मायेने भुलविले
रामे निर्दाळुनी तयांना यमसदनी धाडिले.....धृ...आई उधे ग अंबाबाई ...||
महिषासुर चेचिला तूचि शुंभ निशुंभ जाळिले
दिव्य तुझी करणी सकळ विश्वासी पाळिले
रक्तबीज सुकवुनी कितिक दैत्यांसी नासले
मोहिनी रुपे तुवा असुरा भस्मिभूत केले.....धृ. आई उधे ग अंबाबाई ||
चारिवेद सहाशास्त्रे पढुनी वाद जरी घातले
अज्ञानी राहुनी मानव जगरहाटी अडकले
मुक्तिघोष मुखी करुनी वासना धरुनि राहणे
गंगाधरसुत म्हणे तयांसी नित्य नवे भरडणे. .....धृ आई तू मांडिला साऱ्या जगताचा गोंधळ.....आई उधे ग अंबे उधे ||
अरुण कोर्डे
©®
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
कृपया वरील गोंधळाला कोणी चाल
कृपया वरील गोंधळाला कोणी चाल लावून दाखवील तर बरं होईल. मी लावलेली चाल पारंपारिक आहे.
सुंदर
सुंदर
खूप छान.
खूप छान.