वैभव जोशी यांच्या गझल, कवितांची अनोखी मैफील - शब्द झाले मायबाप
.
काही दिवसांपूर्वी तिन मायबोलीकर गप्पा मारत होते.
'पूर्वी कसली मजा यायची माबोवर.'
'का रे? मजा तर आताही येते.'
'तस नाही रे. काही वर्षांपूर्वी माबोला सुगीचे दिवस होते. बरेचजण उच्च लिहायचे.
कविता, गझल, लेख... मेजवानी असायची नुसती. ती गंमत हल्ली नाही येत. डोळ्यांना, कानांनाही सवय होते उत्तम वाचायची, उत्तम ऐकायची. एकदा का ती सवय झाली की मन फक्त तोच दर्जा स्विकारतं.'
'हे मात्र खरं. हल्ली वैभव जोशी तर काहीच लिहित नाही.'
'हो रे.. तिच तर खंत आहे. कुठे गेले हे लोक?'
'वैभव हल्ली बराच बिझी असतो त्यामुळे वेळ मिळत नाही त्याला तेवढा.'
'अरे मग आम्हाला त्याच्या कविता वाचायला कशा मिळणार?'