मुलींसाठी पुण्यातील सेवाभावी संस्था/शाळा
मला काही माहिती हवी आहे, जर कोणी देऊ शकल तर त्याबद्दल आभार.
माझ्या ओळखी मध्ये एक कुटुंब आहे. त्यांनी मुलगी दत्तक घेतली होती , ज्यांनी तिला दत्तक घेतली ते नवरा आणि बायको दोघेही आता हयात नाहीत. त्या मृत व्यक्तीची बहीण सध्या या मुलीची कायदेशीर पालक आहे.
गेले दोन वर्ष ती मुलगी पुण्यातील "आपलं घर" या संस्थेमध्ये होती. या वर्षी आठवी मध्ये ती नापास झाली आहे.
तीच वागणं हट्टीपणाच आहे आणि ती संस्थेमधील लोकांना त्रास देते व त्याचं ऐकत नाही.
म्हणून संस्थेने मुलीला घेऊन जायला सांगितल आहे.
इथे कोणाला पुण्यातील इतर सामाजिक संस्था/शाळा माहीत आहेत का ज्या या मुलीला दाखल करून घेतील?