वर्षुनील - पुणे - गटग - २७ ऑक्टोबर २०१२, सकाळी ९ ते ११

Submitted by दक्षिणा on 14 September, 2012 - 06:43
ठिकाण/पत्ता: 
आर्यन रेस्टॉरंट हॉटेल डेक्कन पार्क परिसर, ब्रिटिश लायब्ररी जवळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे ४११ ००४

वर्षुनील पुणे गटग साठी आता ठिकाण आणि वेळ निश्चित झाली आहे.
रेस्टॉरंट मध्ये टेबल बूक करण्यासाठी हजर राहणार्‍यांचा निश्चित आकडा २५ तारखेला कळवायचा आहे. कृपया त्या अगोदर आपली हजेरी इथे नोंदवावी.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, October 26, 2012 - 23:30 to शनिवार, October 27, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षे - २७ ऑक्टोबर - शनिवार आहे, आम्हाला सुट्टी नाही, निदान संध्याकाळी तरी ठेव किंवा २८ ऑक्टोबर - ब्रेक्-फास्ट ग.ट्.ग. तरी ठेव, म्हणजे सोयीचे पडेल. Happy

दक्ष, आर्यन का गं? FC रोडवर फार वेळ बसुन देतील असं तेच एक ठिकाण आहे. शिवाय स्वतंत्र पार्किंग ही. वैशाली, वाडेश्वरमधे फार वेळ बसुन नाही देणार. आणि इतकी गर्दी असते कि आपल्याला ही नीट बोलता येत नाही.

कुठेही चालेल मला वाडेश्वर्/वैशाली पेक्षा गंधर्व बरे निदान हाकलले तरी पुढे जागा आहे उभे राहुन गप्पा मारायला आणि अगदीच रस्त्यावर नको असेल तर बालगंधर्व टी शर्ट कट्टा आहेच्चे Lol

अतुल तूला आहे सुट्टी २८ ला, पण वर्षुदी त्या दिवशी पाहिजे ना पुण्यात ??
>>> म्हणूनच मी दुसरा २६ ला डिनरचा ऑप्शन पण दिला आहे ना - स्पाईस गार्डनचा. Happy

दक्ष, मी करेन टेबल बुक. अतुल, डिनर नको, ब्रेफाच ठीक राहिल. एक दिवस उशीरा जा ना ऑफिसला. २८ला वर्षु पुण्यात नसणार आहे.

मनी नुसती सल्लेच देतेय आणि जबाबदार्‍या घेतेय स्वतःची उपस्थिती काय नोंदवत नाहिये अजुन. मने तुझाच आम्हाला वाट बघायला लावुन टांग मारायचा विचार नाहिये ना?? Lol

शुभा, पेशन्स पेशन्स ! मी नोंदवणार आहे नाव. Happy तुला पण भेटायचं आहेच की.

दक्ष, वर्षुने लेखी दिली आहे २७ तारिख. ती टांग मारणार नाही.

रच्याकने, वर्षु ते सोप्पं पुडिंग वगैरे आणणार आहे का? तेव्हापासुन तिला भेटायची जाम उत्सुकता आहे

दक्ष, ए चल गं. प्लेइंग सेफ वगैरे काही नाही. तिला भेटणार म्हणजे भेटणारच. एवढ्या दिवसांची वाजत-गाजत इंडिया ट्रीप आहे.

तारीख/वेळ:
26 October, 2012 - 22:30
त्यासाठी २७ ऑक्टोबर ही तारिख निश्चित केली आहे याची नोंद घ्यावी.

>>>>>>>>>>>

दक्षे.. नक्की २६ की २७????? कनफु-जड झालीयेस काय Uhoh Proud

मने २७ ला मला सूटी नाही Sad
म्हंजे मला वर्षूदीला मुंबैलाच भेटावे लागेल...
आणि तुमच्या सगळ्यांसोबत भेटही नाही होणार Sad

शुभे, मी ऑक्टोबरचे प्लान्स आतापासून फ्रीझ करत नसतो Proud

आणि २६ ऑक्टोबर असेल तर नाही जमणार...... पं. हृदयनाथ मंगेशकरांचा वाढदिवस असतो.. मी दरवर्षी त्या कार्यक्रमाला जातो.

Pages