lalit lekh

लॉकडाउन – सोशल मिडिया वर प्रभावशाली व्यक्ती

Submitted by भागवत on 14 June, 2020 - 03:48

लॉकडाउनचा आत्ता ५.० टप्पा चालू आहे. या टप्यात भरपूर मोकळीक मिळाली आहे. पण या अगोदरच्या टप्प्यात पुष्कळ प्रमाणात निर्बंध होते. टीव्हीवर सगळी कडे करोना बाबत नकारात्मक वातावरण होते. त्याच-त्याच बातम्या बघून कंटाळा यायचा. मी टीव्ही वर त्याच-त्याच ब्रेकिंग न्यूज बघणंच सोडून दिले. कोणाला बाहेर जाऊन बोलता येत नव्हते. किंवा चित्रपट तर किती वेळ बघणार. या कठीण प्रसंगाच्या काळात समाज माध्यमा वरील काही व्यक्तीनी मला खूपच प्रभावित केले. मग अश्या वेळेस सोशल नेटवर्क हेच विरंगुळा साधन असते. इथे सुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी असतात.

शब्दखुणा: 

जीवन (वैज्ञानिक शतशब्दकथा)

Submitted by atuldpatil on 4 July, 2019 - 09:06

गुलाबी अचानक गेली. इतक्या वर्षांची साथ संपली. पांढरा हताश झाला. नाजूक केशरीकडे बघून आता दिवस काढायचे. त्याला सहज भूतकाळातले उतार चढाव आठवले. पिवळा त्याचा वर्गमित्र होता. त्याचा नंबर नेहमी वर असे. पांढऱ्याला असूया वाटायची. कारण तो स्वत: फारशा शार्प नव्हता. पण नंतर काळ बदलला. पांढऱ्याने खूप ताणतणाव सहन केले. पण बघता बघता त्याने सर्वांवर मात केली. वर आला.

प्रत्येकाची अशीच काही ना काही कथा होती. धागेच ते. मागचे सगळे टाके त्यांना आठवत होते. पुढचे कसे पडतील माहित नव्हते!

विषय: 

विवार

Submitted by Diet Consultant on 6 September, 2012 - 10:58

कधीतरी अनपेक्षित पणे खोल काळोखाच्या गर्तेत तुम्ही भोवर्यात फिरत असल्याचे जाणविते तेव्हा अर्थातच पायाखाली जमीन नसते. कृष्णाने जे जे केले ते त्याची माया. आपण जे जे केले ती माया नाही. माया जमा केल्यास काया-वाचा बंद होते Happy माया काय आणि पाप पुण्याचा हिशोब काय ! सारे म्हणे साठून राहते . संचित. माया संचित नसते. मायावी जगात आल्यानंतर माया आणि मोह अनेक प्रकारे येऊ लागतात आपल्या सहवासात. कोणी म्हणते " आयुष्य जगण्यासाठी आहे. कल का किसने देखा है ! " काही लोक मात्र कल - आज - और- कल सारेच बघतात.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - lalit lekh