पुणे

जन्मनोंद

Submitted by मेंढका on 6 March, 2013 - 01:26

एखाद्या व्यक्तीची जन्मनोंद त्या व्यक्तीच्या म्रुत्युनंतर करायची असल्यास होऊ शकते का?
क्रुपया ज्यांना माहिती असेल त्यांनी माहिती द्यावी

विषय: 
प्रांत/गाव: 

आवाहन : काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवा... (नवोदितांसाठी)

Submitted by अ. अ. जोशी on 20 February, 2013 - 01:16
तारीख/वेळ: 
20 February, 2013 - 22:30 to 28 February, 2013 - 07:30
ठिकाण/पत्ता: 
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com

नमस्कार,
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ४थे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास १५० कवींनी यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत व्यक्ती, पाणी, निसर्ग संतुलन असे विषय गेले तीन वर्ष दिले होते.

आवाहन - कविता पाठवा : कै. सुचेता जोशी स्मृतीप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (नवोदितांसाठी)

Submitted by अ. अ. जोशी on 20 February, 2013 - 01:07
तारीख/वेळ: 
28 February, 2013 - 07:30 to 07:36
ठिकाण/पत्ता: 
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- वर नमूद केलेल्या तारखेपर्यंत कविता पाठवाव्या. अ. अ. जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com

नमस्कार,
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ४थे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास १५० कवींनी यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत व्यक्ती, पाणी, निसर्ग संतुलन असे विषय गेले तीन वर्ष दिले होते.

मी मल्हारगड बोलतोय....

Submitted by उमेश थरकुडे on 7 February, 2013 - 02:13
तारीख/वेळ: 
21 December, 2012 - 21:30 to 7 February, 2013 - 01:45
ठिकाण/पत्ता: 
मल्हारगड, सासवड नजीक.

मी मल्हारगड बोलतोय....

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

उपाय

Submitted by छायाचित्रकार on 31 January, 2013 - 23:53

पहाटे सारं शहर
चांदण्यांची चादर लपेटून
निपचीत पसरून गेलेलं
...
त्याची पावलं मात्र त्या जीवघेण्या थंडीत
आसरा शोधत पुन्हा पुन्हा
स्वतःची समजूत घालत होती...
अखेर थोडीशी उब मिळालीच त्याला
एक एक चित्र राख होत राहिल
सुर्य ऊगवे पर्यंत .....

विषय: 
प्रांत/गाव: 

मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी ब्रेकफास्ट गटग

Submitted by चिनूक्स on 18 January, 2013 - 03:42
तारीख/वेळ: 
19 January, 2013 - 22:00 to 20 January, 2013 - 00:00
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिराजवळ, पुणे

मायबोलीचे वेबमास्तर श्री. अजय गल्लेवाले येते दोन दिवस पुण्यात आहेत.
दिल्लीच्या परिषदेचे अनुभव त्यांच्याकडून ऐकण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी रविवारी, दि. २० जानेवारी, २०१३ रोजी ब्रेकफास्ट गटग आयोजित करण्यात आलं आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती. Happy

माहितीचा स्रोत: 
वेबमास्तर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

आम्ही बारामतीकर

Submitted by चिमुरी on 14 January, 2013 - 22:48

बारामतीच्या मायबोलीकरांसाठी गप्पा मारायला हे गप्पांचं पान. Happy

आपलं स्वागत आहे Happy

प्रांत/गाव: 

योग आणि योगासन स्पर्धा

Submitted by अ. अ. जोशी on 28 December, 2012 - 11:34
तारीख/वेळ: 
29 December, 2012 - 23:30 to 30 December, 2012 - 06:30
ठिकाण/पत्ता: 
स.प. महाविद्यालयाचा स्टुडंट हॉल, पुणे, महाराष्ट्र, भारत.

योगोत्कर्ष संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजिण्यात आली आहे.
योग ही एक जीवन पद्धती आहे. त्यातील तत्त्वे, धर्म, जाती, लिंग, देश यांच्या पलिकडे जाउन मानवजातीच्या उद्धाराकरिता आहेत. ही तत्त्वे आपणांस माहित नसली तरी आपण दैनंदिन जीवनात पाळत असतो. याची जाणीव स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न आहे.

ही स्पर्धा सशुल्क आहे. शुल्क रू.५० फक्त.

ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क करावा...

चित्तरंजन चांदोरकर ०९८५०१५९६८८

सुनील रोट्टी ०९८२३२८९१५४

एक मी अवतार होतो कुंभकर्णाचा!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 November, 2012 - 00:37

गझल
एक मी अवतार होतो कुंभकर्णाचा!
अन् मला आजार झाला झोप नसण्याचा!!

रात्रभर झोपून सुद्धा झोप ना होते!
रात्रभर जागाच असतो शीण दिवसाचा!!

सारल्या बाजूस मोठ्या नोक-या आम्ही.....
शिक्षकी पेशाच हा आधार जगण्याचा!

निवडणूकीचा सुरू हंगाम झाला की,
आव त्यांचा थेट असतो कार्यकर्त्याचा!

संपले तारुण्य, वार्धक्यातही आलो....
सांगते आयुष्य आता अर्थ प्रेमाचा!

प्रश्न तिन्हिसांजेस खेळू लागती झिंमा!
रोज ताळेबंद लिहितो मीच दिवसाचा!!

मीच डोळेझाक केली...हा गुन्हा माझा!
फायदा झाला जगाला अंध असण्याचा!!

फूल होणे हा कधी अपराध होतो का?
रोज मी करतो गुन्हा हा फूल होण्याचा!

प्रांत/गाव: 

बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)

Submitted by पराग on 11 November, 2012 - 10:53
तारीख/वेळ: 
14 December, 2012 - 09:00 to 10:00
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस

शुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...

रैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...

मंजिरी कधी येणार आहे?

माहितीचा स्रोत: 
-
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पुणे