कोथरुड

Submitted by श्यामली on 29 July, 2012 - 02:32

जुन्या हितगुजवरच्या कोबिबि च नव्या मायबोलीवर स्थलांतर झालच नाही, Uhoh कालौघात मंडळी कोबिबिला विसरली, इकडे तिकडे जीव रमवायला लागली Proud तर जुन्या मायबोलीच्या आठवणी काढत काढत, नव्या मायबोलीवर नव्या-जुन्या सगळ्यांच्याचसाठी हा कोथरुड बिबि अर्थात बाफ Happy

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बारापर्यंत गात-नाचत आहेत.>>>
आता तर काय अधिकृत परवाना रात्री १२ पर्यन्तचा!

कसला धुमाकुळ नुसता!

बारा वाजता कोथरूड स्टँडशेजारचा गणपती तमाम गाण्यांवर नाचून गाऊन थिरकून 'जय हो' गात सुस्कारे सोडत शांत होतो. तोवर सैराट, झिंगाट गाण्यांवर बाकीचे गणपतीही थयाथया नाचत असतात. मधूनच भूपाळ्या,मधूनच लावण्या, मधूनच आरत्या...
बोराटे संकुलाचे येथील गणपतीमंडळाने अपघाताचा देखावा म्हणून एक बुजगावणे प्रेत गणपतीच्या पुढ्यात खोट्या रक्ताने माखलेली पांढरी चादर डोक्यावर पांघरून ठेवलंय. रोज प्रेताचा मेकप चालतो. शेजारी उडून पडलेला गॉगल. हे राम!

या, या, आरत्या, पूजा, स्तोत्रपठण व नंतर भजनं, लावण्या, पोवाडे, आयटेम साँग्जच्या कार्यक्रमाला या. कधीपण, कायपण, बाप्पा तुमच्यासाठी केव्हापण!

अकु,
तुम्हाला कोथ्रुड गावठाणातल्या मंडळांनी भंडावून सोडलेले दिसतेय!

आधी एक गणपती बसायचा त्या भेलकेनगरच्या चौकात, एक आझादवाडी आणि एक म्हातोबा मंदिराजवळ.. आता शिवाजी पुतळ्या पासून आझाद वाडी पर्यन्त किमान २०-२५ मंडळांचे गणपती बसत असतील!

अकु,तुम्हाला कोथ्रुड गावठाणातल्या मंडळांनी भंडावून सोडलेले दिसतेय! >>
झपाटून सोडलेलं म्हणा! रात्रंदिन आम्हां मंडळांचा सहवास, कुठे लपू जाऊ आकळेना!!

हो, पूर्वीच्या गावठाणाच्या गोष्टी इथेच लहानाचे मोठे झालेल्या अनेकांकडून ऐकते. विहिरीवर पाणी भरायचं, नाल्यावर जाऊन धुणं भांडी करायची वगैरे वगैरे. सध्याचे राजकीय नेते हाफ चड्डीत असतानाचे दिवस वगैरे. आता मंडळं बहु जाहली अशी स्थिती आहे. पिटकी-पाटकी मंडळंही दोन तीन वर्षांत चांगलं बाळसं धरतात.

सुप्रभात समस्त कोकरांनो!

क आ स?

Happy

पिटकी-पाटकी मंडळंही दोन तीन वर्षांत चांगलं बाळसं धरतात.>>>

म्हणजे काय!! काम काय त्यांना? एकदा चौकात अनोळखी चेहर्‍याची शुभेच्छांची पाटी लागली झाले काम! समजायचे एक धडाडीचे भावी सामाजिक नेतृत्व जन्माला आले आज!

बर्‍याच दिवसांनी कोथरुड वर आले अचानक!:)

अश्या राख्या सर्व राख्यांच्या दुकानात मिळतील. आझादनगर मध्ये बरीच दुकाने लागतात राख्यांची तिथे नक्की मिळतील!

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg

अर्र्र्र्र्र्रेरेरेरेर्र्रेरेरेर्र्र्रेरेरेर्र्र्रेरेर्र्र्र्रेरेर्र्र्र्रेर्र्र्र्र्रेर्र्र्र्र्र हा पण धागा बंद पडलाय