गझल सहयोगचा मुशायरा - वेदनेचा शौक - सस्नेह आमंत्रण
(सदर मुशायरा सायंकाळी पाच ते सायंकाळी आठ या वेळात आहे. काही कारणाने कदाचित वेळ वेगळी दिसत असू शकेल. )
(सदर मुशायरा सायंकाळी पाच ते सायंकाळी आठ या वेळात आहे. काही कारणाने कदाचित वेळ वेगळी दिसत असू शकेल. )
लोकहो,
अश्विनी खाडिलकर, म्हणजे अश्विनीमामी, डिसेंबर अखेरीस पुण्यास येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी २९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता गटग आयोजित केलं आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती. 
मित्रहो,
श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी शनिवार, दि. १३ नोव्हेंबर, २०१० रोजी गटग आयोजित केलं आहे.
वेळ - सकाळी ११ ते दुपारी २.
मुंबईचे व इतरत्र असलेले मायबोलीकर यांनी या गटगला उपस्थित राहावे, ही खास विनंती.
कृपया या धाग्यावर नावनोंदणी करावी म्हणजे पुढची व्यवस्था करणं सोपं जाईल. 
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. 
मंडळी,
६ तारखेला बरेच मायबोलीकर पुण्यात नसल्याने आपले वेबमास्तर श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी आयोजित केलेल्या गटगची तारीख बदलावी, असा विचार सुरू आहे.
१ नोव्हेंबर, २०१०, म्हणजे येत्या सोमवारी, संध्याकाळी साडे सहा वाजता आपण भेटू.
स्थळ - मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे.
वेळ - संध्याकाळी साडे सहा
याशिवाय दिनांक १३ नोव्हेंबर रोजी, शनिवारी, दुपारी गटग आयोजित करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. ६ तारखेला मुंबईचे मायबोलीकर येऊ शकत नाहीत, त्यांना १३ तारखेला येता येईल.
११ जुलैला वेद शास्त्रोत्तेजक सभागृह येथे सांयकाळी ६ ते ९ ह्या वेळेत माझा काका.. श्री नरेंद्र कुलकर्णी ह्याच्या नवीन शास्त्रीय संगीताच्या सीडीचा प्रकाशन सोहळा तसेच गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.. आणि ह्या सगळ्याचे निमित्त आहे... आजोबांचा म्हणजेच श्री. म.ना.कुलकर्णी (मनाकु१९३० ) ह्यांचा ८० वा वाढदिवस... तेव्हा ज्यांना शक्य असेल त्या सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण....
पी डी ए या पुण्यातील आद्य प्रायोगिक नाट्य-संस्थेचं दरवर्षी मे - जून महिन्यांमधे नाट्य-प्रशिक्षण शिबिर आयोजित होत असतं .
या वर्षी हे शिबिर १५ मे २०१० ते ६ जून २०१० या कालावधीत पुणे येथेच घेतलं जाणार आहे.
अत्यंत शिस्तबद्ध रितीने अत्यंत मह्त्वाचा नाट्य-विषयक संस्कार या शिबिरातून गेली १९ वर्षं सातत्याने पी डी ए इच्छुकांना देत आली आहे.
प्रदीप वैद्य, रुपाली भावे, आनंद चाबुकस्वार, अनिरुद्ध खुटवड अश्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन शिबिरार्थींना मिळतं.
शिबिरात वैयक्तिक मुलाखतीतूनच प्रवेश दिला जातो आणि निवड झाल्यानंतर शिबिरात १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असते.
'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी गझल संदर्भात खारीचा वाटा उचलला जात आहे. त्यानिमित्ताने एक गझल मुशायर्याचे आयोजन करण्यात आलेले आहे
तपशीलः
मुशायर्याचे शीर्षक - 'नभाचे शब्द स्वच्छंदी'
दिनांक व वार - २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार
समय - सायंकाळी ६. ०० ते ८. ००
स्थळ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन, ऑफ टिळक रोड, पुणे
संयोजन - अजय जोशी व बेफिकीर
सहभागी गझलकारः
डॉ. अनंत ढवळे
श्री. मिलिंद छत्रे
श्री. केदार पाटणकर
डॉ. ज्ञानेश पाटील
श्री. ओंकार जोशी उर्फ नीलहंस
श्री. अमोघ प्रभुदेसाई उर्फ मधुघट
श्री. अजय जोशी
नमस्कार मंडळी,
हे गप्पांचे पान अगदी सर्वांसाठी आहे. या, मस्त मनमोकळ्या गप्पा मारा. ह्या पानावर गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; वय, विषय, वेळ, सामाजिक स्थान - कसलीच मर्यादा नाही.
मैत्री करा, एकमेकांना मदत करा, धम्माल करा. या पानावर नवीन मंडळींनी यावं, मित्र जोडावेत आणि टिकवावेत
अशांचे निखळ, निकोप गप्पागोष्टींसाठी माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत.
कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!