मायबोलीकरांचे आणि मायबोलीवर प्रथमच - सायकल राईड गटग!

Submitted by केदार on 3 February, 2014 - 00:12
ठिकाण/पत्ता: 
राजारामपुला जवळ (कोथरुड एंडला) नाहीतर पुल पार करून शोधाल.

मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्‍यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.

माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.

सर्वानूमते ठरलेला प्लान.

दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)

राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून

राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)

ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.

अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 20:00 to 23:58
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४०-५० किमी ??? अब्बब!! फार्फार्तर २० किमी असेल तर ठिक आहे. पण इंटरेस्टींग आहे. राजाराम पुल ते खडकवासला किंवा सिंहगड पायथा हे अंतर किती असेल?

४०-५० किमी ??? अब्बब!! फार्फार्तर २० किमी असेल तर ठिक आहे >. अरे ४० - ५० किमी पण कमीच आहेत असे मला वाटले. Happy

पण खूप लोकं येणार असतील तर नक्कीच आपण २० किमीची मिनी राईड करू एका लॉजिकल टप्प्याल्या ठेवून पुढे जाणारे पुढे जाऊ शकतील.. नो प्रॉब्लेम.

आणि २०च काय १०च करू म्हणणारे असतील तरी चालेल, उद्देश किती किमीची राईड हा नसून सहभाग हा आहे. त्या निमित्ताने व्यायाम होईल. Happy

राजाराम ते खडकवासला ८ किमी आहे आणि खडकवासला ते पायथा पुढे ११.५ किमी. ही पण मला चालेल.

शुभेच्छा !!! त्यापलिकडे सध्यातरी काही नाही. ४०-५० किमी म्हणजे फार नाही.... आणि ग्रूप असेल तर काहि वाटणार नाही. दुसर्‍या दिवशी रविवार आहेच. Wink

मी नुकतीचं सायकल घेतली आहे - मागच्या आठवड्यात , जास्त चालवली नाहीये, त्यामुळे इतकं ४०-५० किमी. नाही येऊ शकणार, राजाराम ते खडकवासला चालेल - पण रस्त्यावर एकदाही चालवली नाहीये आत्तापर्यंत..........

प्राजक्ता रस्त्यावर चालविणे सोपे आहे. Happy मधून नाही चालवायची Proud अजून पूर्ण वर्किंग विक आहे, तर एक दोनदा चालवून बघा. आवडेल तुम्हाला.

केपी येणार असशील तर तिथून सुरूवात करू.

सायकल भाड्याने मिळेल का कुठे चांगली? मी नक्की येईन सायकल मिळत असेल तर. बरेच जण गावात/कोथरुड/सिंहगड रोड/वारजे भागात राहत असतील तर राजाराम पूल हे ठिकाण अधिक सोयीचे पडेल.

सिंहगड पायथा केला तर हौशी लोक सिंहगडावर चालत पण जाउन येउ शकतील Happy

नक्की येतो. बर्‍याच गटगला टांग दिली असल्याने यावेळे सायकलवर टांग मारुन सहभागी व्हायला आवडेल. Happy

टण्या आमच्या सोसायटीतल्या मुलांची मिळाली तर बघु का?

मी सध्या सोसायटीच्या बाजूने राऊंड मारत्ये जमेल तेव्हा Happy आणो रस्त्यावर मी टू/फोर व्हीलरही नाही चालवत तशी त्यामुळे जरा भिती वाटत्ये, ह्या वीकेंडचा आहे का प्लॅन ?

सायकल भाड्याने मिळेल का कुठे चांगली? >>>

सायमोर ( www.cymour.com) ला किंवा लाईफसायकल ( lifecycleonline.in/ ) ला विचार त्यांच्याकडे मिळतात. घेताना माऊंटेन नको घेऊ, हायब्रिड घे.

प्राजक्ता - आपण भल्या सकाळी जाणार असल्यामुळे (निदान सकाळचे ६ किंवा ६:३०) तशी ट्रॅफिक नसणार आणि सायकल कडेने चालवली की काही प्रॉब्लेम नाही. येते पाच दिवस प्रॅक्टीस करा. आणि सहभागी व्हा. Happy

केपी ये मग. टांग मारून !

राजाराम पूल ते पुढे कुठेही.. राजाराम पुल सोईचा पडेल सगळ्यांना..
वाकडहून पुढे म्हणजे गावातून वाकड ही एक मोठी राईड होइल !

पायाथ्यापर्यंत सायकलने जाऊन सिंहगडावर चढत जाऊन यायची आयड्या वाईट नाही.. Happy

सध्या सोसायटीच्या बाजूने राऊंड मारत्ये जमेल तेव्हा >>
त्याच कडेने रस्ता क्रॉस करुन चल मग आमच्या बरोबर. आणखी काही महिला आघाडी होते का ते पण बघु.

मी १५ वर्षांच्या गॅपनंतर गेल्या आठवड्यापासूनच सायकल चालवायला सुरुवात केलीये, अजून पुरती सरावले नाही, थोडा जरी चढ आला तरी हाल होतायत. सायकलही थोडी उंच आणि सेमी असल्याने पाय टेकवणं वगैरे अवघड पडतंय. नवीन सायकल घेण्याची ही पूर्वतयारी आहे. गटगला आले तर बराच हुरूप येईल, पण इतकी चालवू शकण्याचा मुळीच आत्मविश्वास नाही. मलाही रविवार आणि राजाराम ते खडकवासला बरे पडेल.

त्यामुळे गटगला यायची इच्छा आहे पण नाव नोंदवू की नको असा प्रश्न पडलाय.. कारण सगळे पुढे निघून जातील आणि मी एकटीच मागे राहीन, हाफत हाफत! Sad

हे रे काय केदार, मी नाहीये ह्या विकांताला पुण्यात. ऑरोव्हील अर्ध-मॅरॅथॉन मधे भाग घेतलाय त्यामुळे तिकडे जातोय. पण तुम्ही मंडळी जाऊन या.

ट्ण्या - तुला माझी सायकलही मिळू शकेल.

कर्वे रस्त्यावरच्या सिंग सायकल मधे सायकली भाड्याने मिळतात. मला वाटते, २४ तासाचे, हेल्मेट सकट ३५० का ४०० रुपये भाडे असते. इतर इच्छुकांनी लाभ घ्यावा.

प्राजक्ता - थोड्या सरावानंतर नक्की जमेल.

ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.>> +१

जितकं वाटतं तितकं सोपं नाहिए केदार, जवळपास ऐंशी किमी होतील .
(रोज किमान दहा किमी सायकल चालवणारा -ग्रेथि)

हर्पेन सॉरी यार मला माहिती नव्हतं की तुला तिकडे जायचंय. तू येणार असलास तर मग ८-९ ऐवजी १५-१६ ला करायचे का?

http://surendarcyclestores.com Near Ranka Jewellers, Karve Road, Pune इथेही सायकली भाड्याने मिळतात.

अनया / सई
स्पिड कमी असेल तरी चालेल, सगळेच फास्ट जाऊ शकणार नाहीत त्यामुळे सोबत मिळेलच ह्याची खात्री. शिवाय ग्रूप अ‍ॅक्टीव्हिटीज मध्ये माझी स्टॅटेजी नेहमीच, नो मॅन लेफ्ट बिहाइंड असते.

जितकं वाटतं तितकं सोपं नाहिए केदार, जवळपास ऐंशी किमी होतील . >> ग्रेथि, नवीन प्लान राजाराम पुल ते खडकवासला ( असं १८-२० किमी राउंड) ग्रुप १ साठी आणि सिझन्ड वाल्यांसाठी पुढे खडकवासला ते सिंहगडापर्यंत. म्हणजे राजाराम ते सिंहगड आणि परत असे साधारण ४०-४२ किमी.

मला १६ ला खूपवेळा चालेल, पण आत्ता बरेच जण येत असतील तर जा तुम्ही, मी मोडता घालत नाही Happy मी पुढच्या वेळेस येईनच की ! आशा आहे की हे शेवटचे सायकल गट्ग असणार नाही Wink

मला नक्की आवडले असते.. पण सायकल नाही.. आणि चालवायचा सरावही राहिलेला नाही.. Sad

कोणे एके काळी.. सायकल वर सिंहगड पायथ्यापर्यंत जाऊन पुढे गडावर चढत जाऊन आलो होतो.. एक नंबर अनुभव होता तो.. आणि ते सुद्धा साध्या सायकल वर तेव्हा गियरची सायकल वगैरे भानगडी अवतरल्याच नव्हत्या..

काय रे हर्पेन.. Sad

केदार ८ तारखेचा ठरवुया. प्रथम गटग असल्याने सोप्पे २०-२५ किमी वाले ठेवु. मग एकदा सराव्/हुरुप आला की हर्पेन सारखी दिग्ग्गज मंडळी रिंगणात उतरतील. Happy

चल रे हिम्या. अरे आमच्या सोसायटीमधल्या मुलांनी पण केले खडकवासला पर्यंत सायकलींग. सर्वात लहान मुलगा ४थी मधला होता.

हो चालेल. आधी लगीन खडकवासल्याचे मग !

हर्पेन मग आपण लोनावळा मारूया ! १०० किमी जाणे येणे टारगेट.

चला तर मंडळी ८ तारखेला जायचे हे नक्की करून प्रयत्न करा आणि या. सायकल भाड्याने मिळेल. ती ठिकाणं मी वरच्या काही प्रतिसादात दिली आहेत.

केप्या.. अरे सायकल चालवायची अजिबातच प्रॅक्टीस नाहीये.. पुढच्या चार - पाच दिवसात रोज किमान ५ किमी तरी चालवायला लागेल तेव्हा जमू शकेल..

हिम्सकूल आणि मंडळी, कृपया लक्षात ठेवा की वयाचे, सायकल किती वर्षापुर्वी चालवली होती, चालवायचे अंतर ई. हे केवळ आकडे असतात. सायकल सावकाश चालवत गेलो तर कुणालाही सहज जमेल खडकवासला किंवा सिंहगडापर्यंतचे अंतर.

काका मी कुठला दिग्गज वगैरे अजीबात नाही, मी स्वतः हे आऊटडोअर उद्योग केवळ ५ महिन्यांपुर्वीच चालू केलेत आणि मी करू शकतोय तर कोणीही करू शकेल Happy

मंडळी सुरुवात करा, एक पॅडल मारा, पुढचे सगळे (मी आपोआप नक्कीच म्हणणार नाही) पण व्यवस्थित होते.

Pages