नव्या वैभवचीच स्वप्ने सजावी - प्रार्थणा

Submitted by दुगा on 19 December, 2013 - 10:00

अविनाश धर्माधिकारी -

नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी,
मनी हास्य लेवुन मुक्ति जगवी,
हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती,
नवी धेय्य आसक्त प्रल्हाद भक्ती |

अहंता गळावी अभंगास म्हणता,
तपस्येत तल्लिन आतुन होता,
प्रतिभेस मस्तीत आकार यावे,
उरी उत्तमाचेच ओमकार गावे,

हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती,
नवी धेय्य आसक्त प्रल्हाद भक्ती |

जरी एक अश्रु पुसायास आला,
तरी जन्म काहिच कामास आला,
जरी अश्रु विस्फोट होवुन सजला,
तरी मुक्त ज्वलामुखी जन्म झाला,

हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती,
नवी धेय्य आसक्त प्रल्हाद भक्ती |

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स!! माझी खूप आवडती प्रार्थना आहे ही... शब्द खूप सुरेख आहेत... अविनाश धर्माधिकारींच्या व्याख्यानमालेमध्ये ऐकली होती...

कृपया श्री. अविनाश धर्माधिकारींचा वरती उल्लेख करा. आणि शुद्धलेखन जरा तपासणार? (विशेषतः मात्रा ...)
माझी अत्यंत आवडती प्रार्थना! आधी सुरवातीची दोन कडवी वेगळी होती. तेव्हापासून मनोभावे म्हणत आलेय. किंबहुना, आमच्यासारख्या अनेकांच्या प्रेमळ सूचना/ आग्रहावरूनच त्यांनी ती आत्ताची दोन कडवी घातलीत मूळ प्रार्थनेत......