सायकल राईड - ३

Submitted by केदार on 23 April, 2014 - 02:53
ठिकाण/पत्ता: 
बोपदेव घाट किंवा लोनावळा

अखिल मायबोली विना पेट्रोल / डिझेल वाहन प्रसारक मंडळ घेऊन येत आहे तिसरी राईड.

तर ठरवा कुठे जायचे ते.

पर्याय १. बोपदेव घाट
पर्याय २. लोनावळ्या जवळपास

साधारण ५० + किमी जाऊन येऊन करू. लोनावळ्याकडे जायला मला आणि अमितला आवडेल, पण ती राईड मग १००+ होईल. वाटल्यास अलिकडूनही वापस येता येईल.

ज्यांनी मला विचारले त्यांना रविवारच जमणार आहे. त्यामूळे रविवारी ठरवत आहे.

माहितीचा स्रोत: 
बसका राव? थोडीफार माहिती आम्हालाही आहे. :)
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 26, 2014 - 20:00 to रविवार, April 27, 2014 - 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी सर्वानूमते ठरवू या कुठे जायचे ते.

बोपदेव ला जायला दोन ऑप्शन आहेत.

१. कोंढवा गावातून
२. पुणे बंगळूरू बायपास - कात्रज वरून. हा १० किमी लांबून आहे)

मला कोणताही चालेल.

लोनावळा (किंवा वडगाव / वा टोनी दा ढाबा पर्यंत) जायचं असेल तर सर्व हिंजवडी ब्रीज भेटता येईल.

जनरली वेगवेगळे लांब भेटन्यापेक्षा, इकडेच कुठेतरी एकत्र भेटायचे आणि पुढे जायचं.

बोपदेव घाट @१८ km one way आहे ! मला कुठलाही रूट चालेल काहीच प्रोब्लेम नाही.
इतर पर्याय लोणावळा, शिरवळ (श्रीराम वडापाव)

शिरवळ म्हणजे मला १२० किमी होईल. जाणे येणे. Happy शिवाय गेल्या शनिवारीच तिथे होतो.

१८ किमी वन वे म्हणजे खूपच कमी. मग आपण लोनावळ्याकडे जाऊया. बोपदेवला परत कव्हर करू. लोनावळ्याआधी टोनीदा ढाबा आहे, जर कंटाळा आला तर तिथपर्यंत ती ही ५० + किमी होईल मला, गावतल्यांना मे बी ७५ +/-

चालेल का? हिंजवडी ब्रिज पाशी भेटता येईल.

ज्या दिवशी या "लेव्हल" ला पोहचाल .........त्या दिवशी मला सांगा ... Biggrin

मी सुध्दा येईन .!!
.
.
.
.
..
.
.
.
.
.
व्हिडीओ शुटींग करायला Lol

५०-१००?
वाचूनच छाती दडपतेय! Wink

तुमच्या सायकल गटगपासून प्रेरणा घेऊन आणि आशुचँपचं डोकं 'कुठली सायकल घेऊ ' हे विचारण्यास खाऊन खाऊन यावर्षी शेवटी माझ्यासाठी आणि अहोंसाठी सायकली घेतल्या.
फाल्गून अमावस्येला चार कि मी चालवत घरी आणल्या. चैत्र प्रतिपदेला केलेले संकल्प हनुमान जयंतीपर्यंतही टिकत नाहीत असा अनेक वर्षांचा अनुभव आहे म्हणून एक दिवस अगोदरच.
नंतर आजतागायत सहा किमी पर्यंत प्रगती झाली आहे.
'मॅप माय रोड' आमच्या एरियात नीट ट्रॅक करत नाही.
तरीपण कारने रोड ट्रॅक करून मग सायकल चालवायचा द्रविडी प्राणायाम करतो आहोत.

तरी २५ चं टारगेट कधी पार पडेल कुणास ठाऊक?

सुरूवातीला प्रत्येक राईड ट्रॅक करायची गरज नाही. एकदा मार्ग कळला की समजा तो ए टू बी सहा किमी आहे, मग दोन दिवस ए टू बी करायचे, पण तिसर्‍या दिवशी अजून थोडे पुढे, थोडेच पुढे असे करत दोन एक किमी पुढे जायचे. मग तो पाँईट ए टू बी करायचा. असे करत करत दोन आठवड्यात तू २५ किमी चालवशिल.

तुझ्या तोंडात साखर पडो.

२५ किमी झाले एका दिवसात तर तुला नी चँपला आणि माझी प्रेरणा असलेल्या बिकाला(बिपिन कार्यकर्ते) दंडवत घालेन.
Wink

नाही , रोड ट्रॅकिंग गंमतीत. मजा येते ट्रॅक करायला म्हणून.
सध्या दोन किमीच्या वर्तुळालाच गोल गोल चकरा चालल्यात.

इकडे पुण्याला गावाबाहेर पडायलाच ६ किमी चालवावे लागते, खरे चालवणे नंतर चालू त्यामुळे साती तू पुण्याला ये मग बघ तुझे सायकलिंगचे अंतर कसे भराभरा वाढेल Happy

एका दिवसात काय तासात करशील २५ किमी. Happy

मागच्या वर्षी केलेली ट्रिप आठवली, ९० किमी झाली होती राउंड ट्रीप..कासारवाडी ते बेडसे गुफा.. तिघेच होतो, आणि उन भर्पुर होतं.. एव्हढे दमलो होतो सगळे की त्या केव्हज मध्ये एक तास झोपलो, तरी उठावसं वाटत नव्हतं...
1.jpgSad

मी अजूनतरी मॅप माय रन वापरुन सायकल राईडचे अंतर मोजलेले नाही. अंदाज बांधला आहे फक्त. बाकी पायात जोर असेपर्यंत सायकल रेटायची हाच फंडा वापरलेला बरा.

अग्निपंख म्हणून सकाळी लवकर निघायचे, ५:३० / ६ ला मग १०० किमी करूनही १२ च्या आत घरी येऊ शकतो. अर्थात सकाळी ९ ते १२ चे उन सहन करावे लागेलच. Happy पण एप्रिल मे सोडले तर तेवढं काही वाटत नाही.

या तुम्ही पण.

अग्निपन्ख मग ये कि रविवारी Happy
केदार टोनी च्या पुढे २-३ किमी. वर सिद्धु का धाबा आहे. तिथे जाउया.
गेल्याच आठवड्यात गेलो होतो. जेवण लाजवाब आहे.
भारत अरे शनिवारी सायकल डन करू तुझ्यासाठी

सिध्दु दा ढाबा, तिथे जेवण म्हणजे... जेवणच काय फक्त लस्सी प्यायली तरी झोप काढून निवांत संध्याकाळीच घरी येणार आपण Happy

हर्पेन ये रे. मजा येईल.

जेवण नाही हां तिकडे. गपगुमान चहा / नाश्ता करून दुपारच्या आत घरी. नाहीतर नेहमीसाठी सायकल चालवावी लागेल. Happy

चला तर मग सिद्धू पाजी कडे जाऊ. सगळ्यांना आवडले तर पुढेही.

दरवेळी मी इकडून PS मधून निघताना साडेपाचला निघतो, सिंहगड रोड किंवा चांदणी चौकात भेटायचे असेल.
किती वाजता भेटायचे? मी साडे पाच लिहिले आहे. पण नक्की वेळ सांगा. आणि पाळा. कारण मी पाळतो. Proud

पूर्ण रस्त्यात कोणताही मोठा घाट वगैरे नाही. दोन चढ मात्र एक दोन किमी लांबचे आहे. पहिला मुंबई पुणे हायवेला लागताना, व दुसरा सोमाटन्यानंतर तळेगावच्या आधी. आणि रस्ता एकदम (म्हणजे बराच) चांगला आहे. ट्रॅफिकही कमी असतं.

अरे भारत तू शुक्र संध्याकाळी सायकल घे. फारतर शनि. एक २० किमीची राईड आधी मार त्यावर शनिवारी. म्हणजे जरा फिल येईल.

अ ने क शुभेच्छा. फक्त पीक उन्हाळ्यात जात आहात त्यामुळे उपाय योजना करून जावा.
पाणी इलेक्ट्रॉल पावडर ग्लुकॉन डी असू द्या. धाब्यावर जाऊन न जेवता घरी? असं पण असतं

एकदम लोणावळा नको. ह्यावेळी वडगाव किंवा त्या धाब्यावर जाऊ वर लिहिलेल्या.
लोकहो, ९:३० नंतर अशक्य जास्त उन वाढतं. गेल्याविकेंडचाच अनुभव त्यामुळे जितक्या लवकर निघता येईल तितक्या लवकर निघून आणि एक फिक्स वेळ ठेऊन त्यावेळी जिथे असू तिथून मागे फिरू.. नंतर अक्षरशः सहन होत नाही.. आपण सगळे गेलो होतो तेव्हा फारच सुसह्य हवा होती.

Pages