मुलींसाठी पुण्यातील सेवाभावी संस्था/शाळा

Submitted by असुफ on 6 May, 2014 - 09:02

मला काही माहिती हवी आहे, जर कोणी देऊ शकल तर त्याबद्दल आभार.

माझ्या ओळखी मध्ये एक कुटुंब आहे. त्यांनी मुलगी दत्तक घेतली होती , ज्यांनी तिला दत्तक घेतली ते नवरा आणि बायको दोघेही आता हयात नाहीत. त्या मृत व्यक्तीची बहीण सध्या या मुलीची कायदेशीर पालक आहे.

गेले दोन वर्ष ती मुलगी पुण्यातील "आपलं घर" या संस्थेमध्ये होती. या वर्षी आठवी मध्ये ती नापास झाली आहे.
तीच वागणं हट्टीपणाच आहे आणि ती संस्थेमधील लोकांना त्रास देते व त्याचं ऐकत नाही.
म्हणून संस्थेने मुलीला घेऊन जायला सांगितल आहे.

इथे कोणाला पुण्यातील इतर सामाजिक संस्था/शाळा माहीत आहेत का ज्या या मुलीला दाखल करून घेतील?
आर्थिक आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जातील.

धन्यवाद

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीचे समुपदेशन केले आहे का? ती अशी का वागते ह्यामागे काही कारण असल्यास आणि त्या कारणावर उपाय शोधल्याखेरीज मुलीचे वागणे बदलणे अवघड वाटते, आणि अशा परिस्थितीत, तिचा अगोदरचा इतिहास लक्षात घेतल्यावर सामाजिक संस्थांकडून काय उत्तर येईल हे सांगणे कठिण आहे.

तरी भारतीय समाज सेवा केंद्र पुणे येथे चौकशी करू शकता.
http://www.bsskindia.org/

धन्यवाद अरुंधती.

भारत समाज सेवा केंद्राची माहीती त्यांना पाठवतो.
मुलीचे समुपदेशन करण्यासाठी योग्य संस्था / व्यक्ती यांची माहीती तुम्ही देऊ शकाल का?
त्याबद्दल सुद्धा आगाऊ आभार.

अंतर्नाद काऊन्सिलिंग आहे मेहेंदळे गॅरेजजवळ. हॉटेल अभिषेकशेजारी. तिथे डॉ. गौरी ताटके आहेत. त्या उत्तम समुपदेशक आहेत.