राजकारण

मराठमोळा हैवान

Submitted by Communiket on 18 November, 2013 - 23:34

माझ्या २-BHK च्या प्रशस्त आरशात
सायंकाळी चेहरा दिसला

नाव माझं , चेहरा माझा , रंग (वा बेरंग ही ) माझाच
थक्क झालो त्याला पाहून ,
हा मी की कोणी दुसराच ?

नव्या दमाची , नव्या गतीची जाणीव केसांना ही झाली
पळत्या मनानं , ताणल्या मेंदूनं त्यांची ही दशा केली

गेली ती तरूण सळ सळ अन तो मराठी ताठा
हुजरे गिरीने झुकले खांदे अन वाकला अभिमानी कणा

गेली ती स्वत्व -खुणेची अनवट अन परखड भाषा
इंग्रजी झुलीने गांजलेला अस्तित्वाचा रम्य कवडसा

स्वार्थाच्या साठमारीनं गमावलेली मुक्त राने
शहराच्या वेदिवर चढलेली सस्य शामल हरित वने

ना-कर्त्यांनी दडवलेली मातीतली शिक्षण शिल्पे

म्हणे राजकारण करू नका.

Submitted by मी-भास्कर on 18 July, 2013 - 04:55

म्हणे राजकारण करू नका.
निव्वळ बकवास!
"आम्ही या प्रश्नावर राजकारण करीत नाही तुम्ही पण राजकारण करू नका." असे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना बजावत प्रछन्न राजकारण करीत असतात.
अरे तुम्ही राजकारण करण्यासाठीच राजनीतीमध्ये उतरलात ना? मग "ताकाला जाऊन भांडे का लपवता"? आणि राजकारण करणे हेच जर गैर असेल तर गेलात कशाला कडमडायला तिथे? महानंदासारख्या जुलमी राजाला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी चाणक्याने जे राजकारण केले त्या राजनीतीने या शब्दाला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तसे राजकारण कराच.

विषय: 

विचार करून कंटाळलो !

Submitted by pareshkale on 1 May, 2013 - 08:41

कधी कधी मी मराठी असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ "मराठी" हा शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का ? आणी कधी वाटते बर लाज ? सुरेश भटांनी लिहिलेल्या

" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी"

पेड न्युज आणि वर्तमानपत्रे.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आजच सकाळी हिंदूमधली ही बातमी वाचली. बातमी मधे तसं बघायला गेलं तर काही नविन नाही. हे असं होतंय हे आपल्याला आधीपासून माहित होतंच. गाव-तालुकापातळीवरील वर्तमानपत्रे पेड न्युज आणि जाहिरातींवर तगतात. हेही काही नविन नाही.

http://www.thehindu.com/news/national/yes-we-spent-money-on-paid-news-ad...

प्रकार: 

राज ठाकरेंचे मौन

Submitted by अविकुमार on 10 January, 2013 - 02:16

गेल्या ४-५ महिन्यांपासून राज ठाकरे 'जरा' शांत वाटताहेत. विशेषतः राज्यातील सरकारविरुद्ध त्यांनी 'ब्र'सुद्धा काढलेला नाहीये. कधीतरी 'बिहारी' म्हणून ओरडतात पण त्यातही पूर्वीसारखा 'दम' नाही वाटत.

मी मनसेच्या सुरुवातीपासून 'मनसे'चा प्रशंसक राहिलो आहे हे ईथे मुद्दाम नमुद करावे वाटते, नाहीतर निव्वळ कुरापत काढण्यासाठी काढलेला धागा अशी माझी संभावना व्हायची. मला राजकारणातलं फार काही कळत नाही. तरीही माझ्या अल्पमतीनुसार काही संभाव्य कारणांचा अंदाज केला.

१. काका गेल्याचे दु:ख ?(शक्यता फारच कमी आहे)
२. काकांनी जाण्यापुर्वी काही विनंती केली का? (शिवसेना आणि उद्धवसाठी) (अगदीच फिल्मी वाटतंय)

विषय: 

गुजरात मधील विजयाचे रहस्य !

Submitted by महेश on 5 January, 2013 - 04:46

हे घडेल का महाराष्ट्रात ?

(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).

झुंज एकल्या वाघाची

Submitted by जागल्या on 15 November, 2012 - 15:03

३०-३५ वर्षापुर्वीचा काळ, सिमेंट्ची जंगलं नव्हती, गावागावात्,आणि नुकत्याच तयार होणार्या नवीन शहरांतुन माणुस नावाचा प्राणी मेहनतीने जगत होता. गिरण्यांचे भोंगे,गाड्यांची धावपळ चालु असे, नवीन युगाची, कामगारांची, शेतकर्याचे राज्य आल्याचे स्वप्न हळुहळु धुसर होउ लागली होती, गिरणीच्या भोंग्यंमागुन अधुन मधुन कामगारांच्या घोषणा, झुंडीतुन येणारे लाल बावट्यतले नारे यानी गिरणगाव नावाचं ते मराठी माणसांच जंगल आळोखे पिळोखे घ्यायला लागलं होत्.आप्ल्या हक्काच्या जागांवर, अन्न्,वस्त्र,निवार्यावर, बाहेरुन आलेल्यांचा जम बसयला लागल्याच समोर दिसत होत पण हे सगळं थांबणार कस?केव्हां? कुठे?

विषय: 
शब्दखुणा: 

त्याला लागते जातीचे, येरे गबाळ्याचे काम नव्हे

Submitted by रणजित चितळे on 28 September, 2012 - 12:53

गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर मधल्या पंचायती निवडणुका इस्लाम विरोधी ठरवून लष्करे तोयबा, हिजबूल मुजाहदीन आणि जैशे मोहमद सारख्या दहशतवादी संघटनांनी एका पत्रका द्वारे फतवा काढून खोऱ्यातील गावांतल्या सरपंचांनी राजीनामे देण्यात यावेत असे आवाहन केले. या आवाहनाला जेव्हा कोणी बळी पडत नाही असे जाणवले तसे धाक घालण्यासाठी दहशदवाद्यांनी सरपंचांना गोळ्या घालून मारण्यास सुरवात केली आहे. पंच मुहंमद शफी तेली ह्यांची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली. आता पर्यंत चार सरपंचांना गोळ्या घालून मारण्यात आले आहे. हे सर्व उत्तर काश्मीर बारामूल्ला भागात घडले. मुहंमद शफी तेली क्रिरी भागातला होता.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा

Submitted by रणजित चितळे on 28 August, 2011 - 23:43

जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत.

अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही.
ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हेच उदाहरण घेऊन बाकीची लोकं सरकारला वेठीस धरू लागतील.
क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत.
ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो. अण्णा हजारेंची मागणी अवास्तव आहे.

गुलमोहर: 

प्रिय विनील,

Submitted by श्रावण मोडक on 23 February, 2011 - 02:37

ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करतो आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण