लेख

मदतीची हाक

Submitted by अनिकेत आमटे on 31 July, 2012 - 07:54

स्व. बाबा आमटे यांनी आदिवासीं करिता सुरु केलेल्या आमच्या लोक बिरादरी नागेपल्ली येथील प्रकल्पावर नविन डेअरी चे शेड तयार झाले आहे.....जवळपास १५ गाई राहू शकतील एवढे मोठे शेड आहे.....आता नविन गाई घ्यायच्या आहेत....आर्थिक मदत हवी आहे....चांगली गाय ४५ ते ५० हजार रुपयाला मिळते....मदत करायची इच्छा असणाऱ्यांनी माझ्या ईमेल वर संपर्क करावा.... aniketamte@gmail.com

गुलमोहर: 

शिवथरघळ - विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे

Submitted by sunil patkar on 25 July, 2012 - 09:02

हिरव्या डोंगरावर पांघरलेलीपांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टिचासहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा आध्यात्माचा स्पर्श....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही.समर्थांनीही ज्याचेवर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुतीयेथे आल्याशिवाय मिळत नाही.दासबोधाची जननी असणारी शिवथरघळ पहावी ती पावसाळ्यातच !.दाट वनराई मध्ये नजीक असणा-या धबधब्याशेजारीच शिवथरघळ आहे .सुंदरमठ असे यथोचितया ठिकाणाला नाव आहे.

गुलमोहर: 

कॅप्टन लक्ष्मी सेहगल

Submitted by विजय आंग्रे on 24 July, 2012 - 01:01

23_lakshmi_sehga_1153311g_0.jpg

डॉक्टर लक्ष्मी सेहगल यांचा जन्म १९१४ साली एका परंपरावादी तामीळ परिवारात झाला. लहानपणापासूनच राष्ट्रीय आंदोलनांनी त्या प्रभावित होत असत. महात्मा गांधी यांनी विदेशी वस्तूंच्या बहिष्कार करणारे आंदोलन केले तेव्हा लक्ष्मी सेहगल त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. देशसेवेची आवड असणार्‍या सेहगल यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी मेडिकल विषयात शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या.

गुलमोहर: 

अमेरिका एक स्वप्न.........भाग १

Submitted by विनीत वर्तक on 21 July, 2012 - 05:42

अमेरिका एक स्वप्न.........भाग १

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पहिला व शेवटचा सुपरस्टार - राजेश खन्ना

Submitted by बेफ़िकीर on 18 July, 2012 - 04:57

काहीतरीच वाटत आहे, काहीतरी काळजातून तुटल्यासारखे!

अमिताभ बच्चनने आयुष्य व्यापून टाकलेल्या काळात कोणा मोठ्या भावंडाने राजेश खन्ना जास्त आवडतो म्हणणे म्हणजे वादावादीलाच सुरुवात! मी आणि माझ्या वयाची भावंडे अमिताभ किती श्रेष्ठ ते सांगून राजेश खन्नाला नावे ठेवायचो.

नंतर समजले की शम्मीचा अस्त होताना आणि देव, दिलीप, राज हे त्रिकूटनिबर वाटू लागलेले असताना या माणसाने त्याकाळच्या भारतीयांसाठी असलेल्या एकमेव मनोरंजनाच्या साधनाला संजीवनी देऊन क्रांती घडवली.

त्याचे स्मितहास्य, मान हालवणे, इनोसन्ट चेहरा, बोलके डोळे, अत्यंत हॅन्डसम व्यक्तीमत्व!

गुलमोहर: 

'डोळस' राधा (मुलाखत)

Submitted by मंजूताई on 13 July, 2012 - 02:01

काही नावांमध्ये असा अवीट गोडवा असतो की तो कुठल्याही काळात कमी होत नाही अन ती नावं कधी जुनाट, आऊट डेटेडही वाटत नाही, रमा, सई, मीरा... अश्याच ह्या यादीतलं एक नाव राधा. राधा अन माझी भेट होऊन दोन वर्षे झाली असतील. माझ्याकडे बरीच पुस्तकं होती ती कुठल्यातरी वाचनालयाला भेट द्यायची होती. डॉ चोरघडेकाकांनी राधाला सांगितलं अन ती पुस्तक घ्यायला आली. ती माझ्या घरातून पुस्तकं तर घेऊन गेली पण तिने माझ्या मनात घर केलं. मध्यंतरी दोन वर्षात गाठभेट झाली नाही. जेव्हा अशी लेखमाला लिहिण्याचा विचार करत होते त्या यादीत अर्थात राधाचंही नाव होतंच. राधा आपलं घर कुटुंब सांभाळत 'लुईराम' वाचनालय चालवते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मंत्रालय

Submitted by गौतमिपुत्रशालिवाहन on 12 July, 2012 - 15:13

सन १८२८ स्थळ "शनिवारवाडा"
शनिवारवाड्याचा ताबा घेतल्यावर काही काळ पुण्याचा कलेक्टर रॉबिन्सन वाड्यात राहत होता. पुढे इंग्रजांनी तळ मजल्यावर तुरुंग, पहिल्या मजल्यावर दवाखाना आणि वरील मजल्यावर वेड्यांचे इस्पितळ असा जागेचा उपयोग करण्यास सुरवात केली.
गुरुवार २१ फेब्रुवारी १८२८ रोजी मराठी साम्राज्याचा मानबिंदू असलेल्या जगप्रसिद्ध शनिवारवाड्याला आग लागली.
इंग्रजांच्या ताब्यात असल्याने वाड्याकडे दुर्लक्ष्य झाले होते. त्यामुळे आग लागल्याचे प्रथम समजलेच नाही. भणभणत्या आगीने रौद्र रूप धारण केल्यावर ती विझवण्याचे सर्व मार्ग खुंटले. तट बुरुज वगळता, आतील सर्व इमारती भस्मसात करून आगीचे तांडव शांत झाले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

यलोस्टोन सफर

Submitted by मे on 12 July, 2012 - 11:22

य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर

य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर

यलोस्टोन व ग्रँड टिटाँन ही दोन नँशनल पार्क बघण्याचा बरेच दिवस विचार चालू होता. शेवटी गेल्या महिन्यात हा योग आला. भारतातून आलेले पाहुणे आमच्याबरोबर होते. आमच्याकडे ३ दिवस व चार रात्री एवढाच वेळ होता. त्यासाठी बराच विचार करून ही ट्रीप आखली आणि भरपूर गोश्टी बघितल्या. तुमच्याकडे जर असाच कमी वेळ असेल तर तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल. इथे इतके निसर्गाचे चमत्कार आहेत की ते तुमच्याशी शेअर करावेसे वाटले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आंतरराष्ट्रीय शालेय अभ्यासक्रमांची तोंडओळख (भाग २) - International Baccalaureate अर्थात आय.बी.

Submitted by लसावि on 10 July, 2012 - 04:47

इंटरनॅशनल बॅक्युलॉरिएट ऑर्गनायझेशन काय आहे?
जिनिव्हा (स्वि.) येथील या संस्थेची स्थापना १९६८ साली झाली. आयबी कोणत्याही एका देशाशी अथवा राजकीय /सामाजिक विचारधारेशी संलग्न नाही. जवळपास १२५ देशातील अडीच हजार शाळात हा अभ्यासक्रम राबवला जातो. भारतात जवळपास ६५-७० आयबी शाळा आहेत.
वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयबीचे तीन शैक्षणिक कार्यक्रम आहेत.
प्रायमरी इअर प्रोग्रॅम (PYP) - केजी ते पाचवी
मिडल इअर प्रोग्रॅम (MYP) - सहावी ते दहावी
डिप्लोमा प्रोग्रॅम (DP) - ११ वी व १२ वी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख