व्हॉटसअॅप,फेसबुक,ट्विटर,मिपा आणि अशी अनेक आंतरजालीय समाजमाध्यमे जिथे चर्चा करता येते; ती बहुतांशी वेळा देशाच्या,राज्याच्या राजकारणावरील चर्चेने अोसंडून वाहत असतात.अगदी काही वेळा वैताग येईल इतका इतका वेळ अशा चर्चांवर दिला जातो.आपला आवडता पक्ष,आवडता नेता हाच आख्ख्या भारतात किंवा राज्यात कसा चांगला आहे.तोच कसा जनतेला सर्वाधिक चांगला न्याय देऊ शकतो यावर अटीतटीने मुद्दे मांडणं सुरु असतं.समोरचा आपला मुद्दा मान्य करत नाही हे बघून काहीजणांचा तोल ढळतो; मग नको त्या शब्दांत किंवा वैयक्तिक जीवनातील गोष्टींचा उद्धार करुन नामोहरम करण्याचाही प्रयत्न होतो.आवडता पक्ष,नेता हरला की राग,संताप होतो.यावरुन कोणी
मतदार हुशार झालेत ?
दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर.
आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे.
राजकारण हे राजकारण असतं
पत्ते त्यांचे आणि खेळ ही त्यांचाच
आपण फक्त पत्ते पिसायच असतं
राजकारण हे राजकारण असतं
खुर्ची त्यांची अन् बसणं त्यांचच असतं
आपण फक्त पाया म्हणून उभ राहायच असतं
राजकारण हे राजकारण असतं
ख-याचे खोटे अन् खोट्याचे खरे
करणं हे त्यांचच काम असतं
आपण फक्त मत मांडायच असतं
राजकारण हे राजकारण असतं
थोड अवघड अन् किचकटच असतं
वरवर सोप्प सोप्प दिसत असल तरी
वरून मुकुट पण आतून काटेरी असतं
मित्र दे रे (या निडणुकीत व्हाट्स अप् वर मित्र तुटतांना पाहीले अत्यंत टोकाची भूमिका घेवून भांडतांना पाहीले ,खूप वाईट वाटले . )
*****
संवाद साधून
घेई समजून
व्यर्थ व्यवधान
सुटे मग ॥
सुटे अभिमान
शंकेचे कारण
मैत्रीचे मरण
होई जेणे॥
देई रे हसून
घेई रे हसून
उघडी बोलून
कथा व्यथा ॥
होताच अवघे
मित्र जिवलग
आनंदाची बाग
जग होय ॥
दिल्याविना काही
मिळत ते नाही
कर्माची ही पाही
रित असे ॥
विक्रांत मैत्रीला
सदैव भुकेला
सांगतो दत्ताला
मित्र दे रे ॥
'आजचा सुधारक' हे नियतकालीक अनेक वर्षे सातत्याने चालल्यानंतर बंद पडले होते. त्याचे या महिन्यापासून पुनरुज्जीवन होते आहे. थोडेफार डावीकडे झुकणारे लिखाण असले तरी जगभरातील आजच्या राईट वींग प्रवृत्तींना ते टक्कर देऊ शकतील का ते पहायचे. निवडणुका जवळ आल्यामुळे हा अंक राजकारणावर आहे.
अस्मादिकांचाही एक लेख या पहिल्या अंकात आहे. भल्या बुऱ्या प्रतिक्रिया जरुर द्या
http://www.sudharak.in/
शाळेत लोकशाही शिकलो ती 'लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार' अशी. तेव्हा मला वाटायचं मला सगळं कळत, म्हणून माझ्या मताला देशात किंमत मिळायला हवी. पण वय वाढतंय तसं कळतंय मला फार कमी ज्ञान आहे, किंबहुना सामान्य माणसाला त्याच्या आवडीच्या आणि तो ज्यात काम करतो त्या क्षेत्रातलं प्रचंड ज्ञान असलं तरी सगळ्याच क्षेत्रातलं ज्ञान नसत. किंबहुना तुम्हाला जर स्वैपाकातलं काही काळात नसेल तर तुमची आई/बायको किंवा अगदी स्वैपाक करण्यासाठी ठेवलेली मोलकरीण तरी तुम्हाला स्वैपाक कसा करायचा या बद्दल मत विचारेल का आणि तुम्ही जरी स्वतःहून सांगितलं तर लक्ष देईल का?
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.

डॉनल्ड ट्रंप आणि अमेरिकेतील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी हा धागा. फक्त राजकीय घडामोडी आणि त्यांचे परिणाम यांची चर्चा करायला हा धागा वापरा.